शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
5
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
6
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
7
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
8
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
9
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
10
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
11
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
12
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
13
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
14
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
15
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
16
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
17
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
18
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
19
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
20
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

वर्गात ‘स्मार्ट स्क्रीन’ नको; पाटी-पेन्सिल परत आणा! आपल्या शाळा ‘या’ शहाण्या वाटेने जाव्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:15 IST

स्वीडन या प्रगत देशाने शाळेच्या वर्गातून ‘डिजिटायझेशन’ हद्दपार केलेय. आपल्या शाळांसाठी आपण काय करणार?

डॉ. भूषण शुक्ल, बालमानसोपचार तज्ज्ञ

शिक्षण आणि आयुष्य यांची सांगड असणे अपेक्षित आहे. व्यावसायिक शिक्षणाचा प्रत्यक्ष आयुष्याशी संबंध टिकून आहे; पण शालेय शिक्षणाची मात्र खऱ्या आयुष्यापासून जवळजवळ पूर्णच ताटातूट झालेली आहे, याबद्दल आता कोणाच्या मनात फारशी शंका नसावी. घरापासून शाळेचे अंतर, शाळेमध्ये घालवावा लागणार वेळ, अभ्यासाचा ताण, शिक्षक व इतर लोकांकडून मिळणारी वागणूक या सर्व गोष्टी मुलांचा शालेय अनुभव चांगला की वाईट हे ठरवतात. शाळेमध्ये निदान वाईट सवयी लागू नयेत, अशी पालकांची रास्त अपेक्षा असते.

कोरोनाच्या जागतिक साथीमध्ये घडलेला एक मोठा बदल म्हणजे सर्व गोष्टींचे डिजिटायझेशन करण्याला आलेला वेग. या डिजिटायझेशनचे शालेय शिक्षणावरचे परिणाम आता स्पष्ट दिसू लागले आहेत. यात अनेक गोष्टी येतात:

१. शाळा व पालक यांच्यातील सर्व संवाद हा कोणत्या ना कोणत्या ॲपतर्फे होणे.२. शाळेचा गृहपाठ ॲपच्या मदतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे.३. वर्गात शिकवलेल्या गोष्टी आणि नोट्ससुद्धा त्याच ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोहोचविणे.४. वर्गामध्ये फळ्याबरोबर मोठी स्क्रीन लावून शिक्षकांनी समजावून सांगण्याच्या गोष्टी या पॉवर पॉइंटच्या स्लाइड्स किंवा थेट शैक्षणिक व्हिडीओ याप्रकारे मुलांना दाखविणे.

या साऱ्यांमुळे मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन आणि घरी कॉम्प्युटरची अपेक्षा निर्माण झालेली आहे. प्रत्यक्ष शैक्षणिक दर्जामध्ये कोणताही सुधार झालेला नाही, उलट मुलांची शिक्षण क्षमता कमी होते आहे का? असा प्रश्न अनेक शोधनिबंधांमध्ये उपस्थित केला गेला आहे. सतत स्क्रीन वापरण्याच्या घातक परिणामांचा तपशीलही उपलब्ध आहे.

एवढे सारे असूनही जवळजवळ सर्वच विद्यार्थी शाळेनंतर खासगी शिकवणीसाठी जातात. मुलांचे खरे शिक्षण हे या शिकवण्यांमध्येच होते असा सर्व पालकांचा, मुलांचा आणि शिकवण्या घेणाऱ्या शिक्षकांचा दावा आहे. त्यात तथ्यही असावे. या शिकवण्या मात्र पूर्णपणे जुन्या पद्धतीने घेतल्या जातात. शिक्षक विद्यार्थ्यांना समोर बसवून प्रत्यक्ष शिकवतात. त्यांच्याकडून गणिते, प्रमेय सोडवून घेतात. उत्तरे लिहून घेतात. तोंडी घोकून घेतात. शिकवणीमध्ये डिजिटायझेशन जवळजवळ नसतेच. याउलट शाळेच्या निमित्ताने हातात आलेला फोन आणि कॉम्प्युटरचा उपयोग मुले सतत मनोरंजनात्मक कार्यक्रम बघणे, मित्रांशी २४ तास गप्पा मारणे, अभ्यास व शिक्षणाशी कणभरही संबंध नसलेल्या गोष्टी तासनतास बघणे यासाठी करतात.

मुलांचा वाढता स्क्रीन टाइम, त्यांचे घराशी तुटत असलेला संवाद आणि एकंदरीतच प्रत्यक्ष आयुष्याशी तुटत असलेले नाते हा आता पालकांचा काळजीचा विषय झालेला आहे. मुलाच्या हातात स्क्रीन दिला नाही तर त्याचे शाळेचे काम हे मुळीच होऊ शकत नाही, या नाईलाजाने पालकांना मुलांच्या हातात सतत स्मार्टफोन ठेवावा लागतो. मुलांचा सततचा स्क्रीन टाइम, एकमेकांना सोशल मीडियावर त्रास देणे, विकृत बोलणे-छळणे आणि एकंदरीतच शाळेचा अनुभव नासवणे यावर अनेक देशांमध्ये कमालीची काळजी व्यक्त केली जाते आहे. स्वीडन या अत्यंत प्रगत देशाने ‘आपल्याला आता डी-डिजिटायझेशन ऑफ एज्युकेशन करण्याची गरज आहे’, असा स्वच्छ पवित्रा घेतलेला आहे.

मुलांना शाळेमध्ये फोन वापरायला परवानगी नाही, अभ्यास आणि गृहपाठसुद्धा प्रत्यक्ष कागद-पेन वापरूनच पूर्ण केला जाईल, शिक्षकांचे मुलांबरोबरचे संवाद हे शिक्षणासाठी पोषक असतील. इंटरनेटचा वापर शक्य तेवढा वजा करून प्रत्यक्ष प्रयोग करणे आणि एकमेकांबरोबर शिकणे यावर भर दिला जाईल. मुलांच्या मानसिक-सामाजिक आरोग्यासाठी आणि प्रत्यक्ष शिक्षणासाठी घातक असलेली स्क्रीन निदान शिक्षणातून तरी बंद करण्याचा हा ठाम निर्णय आहे.

आपल्या देशात मात्र सरकारी, निमसरकारी आणि खासगी शाळांमध्ये पूर्ण वेगाने डिजिटायझेशन चालू आहे. प्रगत देशांमध्ये झालेले प्रयोग आणि त्याचे मुलांवर झालेले दुष्परिणाम याचा कुठलाही विचार न करता, प्रत्येक शाळा जास्तीत जास्त गोष्टी या डिजिटाइज करण्याचा प्रयत्न करते आहे.काही बाबतीमध्ये पालकही जबाबदार आहेत. वर्गामध्ये भला मोठा स्क्रीन आणि त्यावर सतत दाखवले जाणारे व्हिडीओ यालाच उत्तम शिक्षण समजणारा पालकांचा भला मोठा दबाव गट भरमसाठ फी भरायला तयार आहे. त्यांच्या पैशासाठी शाळाही त्याच दिशेने जात आहेत. खासगी शाळांमध्ये चाललेला हा वेडेपणा सरकारी शाळांमध्येसुद्धा करणे म्हणजे सरकारी शिक्षणाचा दर्जा सुधारणे असा सरकारचा समज असावा.पालक याबद्दल ठाम भूमिका घेण्यास तयार आहेत का? आपल्या मुलांचे खरे शिक्षण व्हावे, यासाठी थोडा त्रास सहन करायला तयार आहेत का? प्रत्येक गोष्टीसाठी ॲप आणि शाळेत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची सतत व्हॉट्सॲपवर माहिती हा दुराग्रह सोडायला तयार आहेत का? शाळेतले डिजिटायझेशन कमी करा आणि शिक्षक व मुलांचा प्रत्यक्ष संवाद वाढवा, असा आग्रह धरायला पालकसभा तयार आहेत का? 

सतत मुलांच्या भवितव्याची चिंता करणारे पालक या सकारात्मक पायऱ्या चढतील का? हट्ट धरून शाळांमध्ये हे बदल घडवून आणतील का?

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षण