शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

लेख: वादात सापडलेला कांदा महाबँक प्रकल्प नको, कांदा चाळीला अनुदान द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:20 AM

विकिरण तंत्राने कांदा साठवणूक करण्यासाठी जाहीर केलेला कांदा महाबँक प्रकल्प वादात सापडला आहे. तो खर्चीक व अव्यवहारी असल्याची टीका होत आहे.

- योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई

पृथ्वीवर साधारणपणे पाच हजार वर्षांपासून कांदा शेती केली जाते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कांदा उत्पादकांच्या रोषामुळे सात लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी खासदारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यामुळे कांद्याला भाव मिळण्यासाठी सरकार काहीतरी करेल, अशी आशा होती. कांद्याला  मिळणाऱ्या मातीमोल भावाने संतापलेल्या शेतकऱ्यांच्या भावनेवर फुंकर घालण्यासाठी सरकारने कांदा महाबँकेचा अजब उतारा शोधला आहे.

विकिरण तंत्राने कांदा साठवणूक करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेला कांदा महाबँक प्रकल्प वादात सापडला आहे. कोणत्याही शेतमालाचे देशांतर्गत दर हे पुरवठ्याच्या तुलनेत होणारे उत्पादन आणि निर्यात दरावर ठरत असते.

गेल्यावर्षी सुरुवातीला पावसाची ओढ आणि नंतर अवेळी झालेला पाऊस यामुळे कांद्याचे उत्पादन घसरले. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर वाढू नये यासाठी केंद्र सरकारने आधी कांदा निर्यातबंदी केली. मात्र, त्यावरून लोकसभेत फटका बसण्याच्या भीतीने निर्यात खुली केली. मात्र, निर्यातशुल्क लादले. परिणामी, निर्यातीला ब्रेक लागला. पुरवठ्याच्या तुलनेत उत्पादन फारसे जास्त नसतानाही वर्षभरापासून कांद्याला भाव नाही. कांद्याला भाव मिळण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सरकारने अणुऊर्जेवर आधारित विकिरण करून साठवणुकीसाठी कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक कांद्याची आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथील अणुऊर्जा आयोगाच्या विकिरण केंद्राकडे कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांनी पाठ फिरविली आहे. 

हे केंद्र आता खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर चालवायला दिले आहे. येथे कांद्यावर नव्हे, तर कोकणातून निर्यातीसाठी पाठविल्या जाणाऱ्या हापूस आंब्यावर विकिरण प्रक्रिया होते. येथे २५० टनाचे शीतगृह आहे. २००२ मध्ये सुरू झालेल्या या केंद्राची कथाही सुरस आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरने या केंद्राची उभारणी करताना ते शेतकरी सुलभ कसे होईल, याचा कोणताही विचार केला नाही. स्थानिक शेतकऱ्यांना हे केंद्र कांदा विकिरण करण्यासाठी आहे, हेसुद्धा माहिती नव्हते. शेतकऱ्यांना फक्त विकिरण घातक नसल्याची माहिती देण्यात आली. त्यावेळी क्विंटलमागे ६० ते ६५ पैसे विकिरणाचा खर्च होता. मात्र, विकिरणासाठी बॉक्स पॅकिंगची डोकेदुखी नको म्हणून व्यापाऱ्यांसह शेतकरी इकडे फिरकले नाहीत.

आता कांदा महाबँकेबाबतही तेच झाले आहे. राज्यातील कृषी संशोधन संस्था,  कृषी विद्यापीठे यांनी केलेल्या संशोधनाची या प्रकल्पाला जोड दिलेली नाही.  विकिरण प्रकल्प खर्चिक व आर्थिकदृष्ट्या व्यवहारी नसल्याचे राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधक मंडळ केंद्राचे माजी संचालक डॉ. किसन लवांडे यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. लवांडे हे कांद्याच्या क्षेत्रातील कृषी, शीतगृह व विकिरण तंत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांच्या शब्दाला महत्त्व आहे. कांदा व लसूण संशोधन केंद्रात त्यांनी कांदा उत्पादन व साठवणुकीवर महत्त्वाचे संशोधन केले. कांदा विकिरण करून, तो साठविण्याचा खर्च किलोमागे सहा ते सात रुपये असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे ते सांगतात, तर कांदा महाबँक म्हणजे कांद्याचे दर पाडण्याचा प्रकल्प असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केला आहे. 

कांदा हे अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. भारतात एप्रिल ते ऑगस्ट हे पाच महिने सोडले तर वर्षभर ताजा कांदा उपलब्ध असतो, त्यामुळे विकिरणाचा मोठा खर्च करून छोटा शेतकरी कांद्याची साठवणूक करेल, अशी शक्यता नाही. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे तातडीने कांदा बँक सुरू होणार आहे, तर कांद्याचे कमी उत्पादन होत असलेल्या समृद्धी महामार्गालगत १०  ठिकाणी कांदा महाबँक उभारणे म्हणजे जनतेच्या पैशांची नासाडीच आहे. त्यापेक्षा रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचाळ अनुदान सुरू करण्याची गरज आहे. त्यातून शेतकऱ्यांची कांदा साठवणूक क्षमता वाढेल आणि योग्य वेळी ते कांद्याची विक्री करून चार चांगले पैसे मिळवतील.

योगेश बिडवई ( yogesh.bidwai@lokmat.com )

टॅग्स :onionकांदा