शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

लेख: महायुतीत एकमेकांनाच फटके आणि चटके, भांड्याला भांडी लागणार, डोकेदुखी होणार!

By यदू जोशी | Published: August 17, 2024 10:27 AM

निवडणुकीच्या तोंडावर एकाच मतदारसंघात दोन दोन तगडे नेते असल्याने कटकटी आणखी वाढणार.

- यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे दोन मित्र गेल्या अडीच वर्षांत भाजपने जोडले आणि सत्तेच्या गाडीत तिघेही बसले. दोनशेच्या वर आमदार असल्याने महायुती मजबूत आहेच, पण आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही ती तशीच मजबूत राहील की नाही, याची शाश्वती आजतरी देता येत नाही. राज्यावर नजर टाकली तरी महायुतीसमोर महाविकास आघाडीचे आव्हान आहेच, पण अनेक ठिकाणी आपल्याच लोकांची डोकेदुखी अधिक आहे. ‘हमे तो अपनों ने लुटा, गैरों मे कहां दम था’ अशी महयुतीची अवस्था होऊ शकते. एकाच मतदारसंघात दोन तगडे नेते असल्याने कटकटी वाढणार आहेत. 

कोल्हापूर म्हटले की लगेच कागल, हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे अशी नावे येतात. मंत्री मुश्रीफ हे अजित पवार गटाचे, तर घाटगे हे भाजपचे अन् त्यातही देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती. आता ‘सिटिंग-गेटिंग’ फॉर्म्युल्यानुसार मुश्रीफ लढणारच असतील तर घाटगेंनी आपल्या राजकीय विरोधकाच्या प्रचाराची पालखी वाहायची का? हा प्रश्न आहेच. फक्त कागलच नाही, तर चंदगडमध्ये काय होणार? तिथे अजित पवार गटाचे राजेश पाटील आमदार आहेत, भाजपचे शिवाजी पाटील गेल्यावेळी क्रमांक दोनवर होते.  इकडून तिकडून दोन उमेदवार उभे करून शिवाजी पाटलांचा तेव्हा पराभव केला गेला, तो कोणी केला हे सगळ्यांनाच ठावूक आहे.

आता शिवाजी पाटील पुन्हा मैदानात असतील असे दिसते. अशावेळी फडणवीस-अजित पवार यांचा त्रास वाढणारच. राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर हे शिंदे गटात आहेत आणि त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी माजी आमदार के. पी. पाटील हे अजित पवार गटात. मात्र, परवाच्या अजित पवारांच्या दौऱ्यापासून दूर राहत के. पी. पाटील यांनी महाविकास आघाडीतर्फे लढण्याचे संकेत दिले आहेत. दोन धुरंधरांपैकी एकाला संधी देताना दुसरा महाविकास आघाडीच्या गळाला लागणार असे बऱ्याच ठिकाणी होण्याची शक्यता आहे. वरच्या नेत्यांनी राजकीय तडजोडी स्वीकारून राज्यात सत्ता आणली, पण माझ्या मतदारसंघात माझीच सत्ता असली पाहिजे, असा विचार करून एखाद्या बलाढ्य उमेदवाराने त्याच्या राजकीय सोयीसाठी नवीन पर्याय निवडला तर त्याला दोष कसा देणार? राजकीय महत्त्वाकांक्षेतून वरच्या नेत्यांनी राज्यात सरकार आणले; आता विधानसभेची लढाई ही प्रत्येक मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी नेत्यांची असेल आणि त्यात आपलेच आपल्याविरुद्ध उभे ठाकतील. 

परभणीच्या गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे हे रासपचे (भाजपचे सहयोगी सदस्य) आमदार आहेत, पण भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे लढायची तयारी करताहेत. तिथे दोघांपैकी एकाला बसवताना वरच्यांची कसरत होईल. नांदेडच्या मुखेडमध्ये भाजपचे डॉ. तुषार राठोड आमदार आहेत आणि तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीएस बालाजी खतगावकर हे तगडे दावेदार मानले जातात. खतगावकर हे शिंदेंचे एकदम खास आहेत. अलीकडेच त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मंत्री शंभूराज देसाई आले होते.  

लातूरच्या अहमदपूरमध्ये अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील आमदार आहेत आणि भाजपचे जुनेजाणते दिलीपराव देशमुख स्वत:ची वाट शोधत आहेत. उद्गीरमध्ये संजय बनसोडेंचे कट्टर विरोधक सुधाकर भालेराव भाजपमधून आधीच शरद पवार गटात गेले आहेत.   नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर शिंदे सेनेचे आहेत, पण तिथे भाजपचे मिलिंद देशमुख यांनी शड्डू ठोकला आहे. भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया उमेदवार असू शकतात, तिथे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार दंड थोपटू शकतात. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल सध्या भाजपमध्ये आहेत. पण नायगावमध्ये याच पक्षाचे राजेश पवार आमदार आहेत. मीनल यांना लोकसभा मिळाली नाही, तर विधानसभेला त्या काय करतील याची उत्सुकता आहे. 

अशी बऱ्याच ठिकाणी भांड्याला भांडी लागतील.  नाशिकचे गणितही सोपे नाही. नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या आमदार देवयानी फरांदेंसमोर शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्तेंचे आव्हान आहे. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ हे अजित पवार गटात आहेत, पण शिंदे सेनेत असलेले धनराज महालेही तेथे दावेदार आहेत. नांदगावमध्ये शिंदे सेनेचे सुहास कांदे आमदार आहेत, पण भुजबळ परिवाराला तिथे उमेदवारी हवी आहे. पुण्याच्या इंदापूरमध्ये अजित पवार गटाचे आताचे आमदार दत्ता भरणे आणि भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील उमेदवारीचा तिढा सोडविणे ही मोठी डोकेदुखी आहे. कोथरूडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना संधी द्या म्हणून दबाव येईल. सोलापूर मध्य मतदारसंघात भाजप, शिंदे सेना अन् अजित पवार गट असे तिघेही दावेदार आहेत. सातारच्या वाईमध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील अन् मदन भोसले (भाजप) यांची दावेदारी आहे. फलटणमध्येही वादाची चिन्ह आहेत. 

रत्नागिरीत लोकसभेतील नारायण राणेंचा विजय,  महायुतीतील काही नेत्यांनी त्यांचा मनापासून प्रचार न केल्याच्या तक्रारी यामुळे धुसफूस वाढली आहे. त्याचे पडसाद रत्नागिरी, चिपळूण, दापोलीत विधानसभेचे उमेदवार ठरविताना उमटतील. भाजप व शिंदे सेनेत संघर्ष उफाळू शकतो. आपसातील वादाचे बाकी बरेच टापू आहेत.  आठदहा मतदारसंघांमध्ये महायुतीत लोकसभेच्या पराभवाचे हिशेब विधानसभेला काढले जातील.  महायुतीला उमेदवारी वाटपात सर्वांत कमी त्रास विदर्भात होईल. तिथे भाजपकडे जास्त जागा जातील, रामटेकसारखे दोन-तीन अपवाद सोडले तर आपसात वाद नसतील.  महाविकास आघाडीतही राडे होतीलच अन् तेही पुढे येतीलच.

- yadu.joshi@lokmat.com

टॅग्स :Mahayutiमहायुतीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024