शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

मध्यमवर्गाला स्वस्थतेमधून बाहेर ओढले पाहिजे; तरच काहीतरी घडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 6:05 AM

उत्पन्न वाढलेल्या नव्या राष्ट्रवादी मध्यमवर्गीयांना आता भूतकाळच विसरायचाय. स्वातंत्र्य चळवळही विसरायची आहे. त्यांच्यावर ‘स्वस्थते’ची साय धरली आहे!

कुमार केतकर, ख्यातनाम पत्रकार-संपादक, राज्यसभेचे खासदार

‘आपला समाज इतका असंवेदनशील आणि स्वस्थ का झाला आहे?’ असा प्रश्न हल्ली मला सतत पडतो. सध्या आपल्या देशातली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. यापुढील काळात आपण आणखी वाईट परिस्थितीमधून जाऊ; तरीही आपल्या समाजात अस्वस्थता दिसत नाही. हे स्वास्थ्य कसे आणि कुठून आले? मुख्य प्रश्न असा, की दयनीय परिस्थिती असूनही समाजात अस्वस्थता का दिसत नाही? आपल्यापुरता विचार केला, तर आपण ज्यांच्या अस्वस्थतेबद्दल बोलत आहोत  ते कोण आहेत? - तर  साहित्यात ज्यांचा अधिकांश दबदबा आहे असे मध्यमवर्गीय!  पन्नास वर्षांपूर्वी दलित पँथर जन्माला येण्याआधी  हा दबदबा सर्वव्यापी होता; ज्याला पुण्या-मुंबईचा मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय चेहेरा होता. त्यात विदर्भ-मराठवाड्याला स्थान नव्हते.  हळूहळू परिस्थिती बदलत गेली; ती पुढे इतकी बदलली, की या मध्यमवर्गावर स्वस्थतेची साय धरली.

सहज  विचार करा, १९८१ मध्ये आपल्या कुटुंबाचे उत्पन्न किती होते? १९९१ ला ते किती झाले आणि पुढे ते कसे, किती वाढत गेले? १९८१ मध्ये कोणत्याही सोसायटीमध्ये कार पार्किंगवरून भांडणे होत नव्हती. कारण तेव्हा लोकांकडे गाड्याच नव्हत्या. १९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतरही हा प्रश्न आला नाही कारण तितक्या प्रमाणात गाड्यांची निर्मितीच झाली नाही. जागतिकीकरणामागोमाग तंत्रज्ञानही आले. त्याच्या परिणामस्वरूप मध्यमवर्गीयांमध्ये १९९१ ते २००१ च्या काळात थक्क व्हायला होईल असे बदल झाले. संगणकामुळे असे काय होणार आहे? शाळा सुरू होणार आहेत का? विहिराला पाणी येणार आहे का, असे म्हणणाऱ्या, बँक- रेल्वेत काम करणाऱ्या मध्यमवर्गीयांनी संगणकाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर संप केले. 

त्यांना विचारले की, तुमचा मुलगा काय करतो? - तर ते सांगतील अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, कुणी सांगेल नासामध्ये आहे. त्यांना माहितीही नसेल की आपल्या वडिलांनी संगणकाविरोधात कधी काळी संप केला होता! सध्याचा काळ हा सर्वच अर्थांनी आणि सर्वच स्तरांवर इतिहासाला विस्मृतीत लोटण्याचा आहे. ही मतलबी आयडॉलॉजी आहे. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी फक्त  वल्लभभाई पटेल किंवा सुभाषचंद्र बोस यांना नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही आपलेसे केले आहे. पूर्वी सर्वांनाच वाटायचे, की मध्यमवर्गीय हा अपरिहार्यपणे सवर्ण आणि शहरी भागातला असतो. नवी वस्तुस्थिती ही आहे की, जागतिक-आर्थिक बदलानंतर आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रामीण मध्यमवर्ग तयार झाला.  केवळ शहरी, सुशिक्षित  तोच मध्यमवर्ग असे आता म्हणता येणार नाही.  हा नवा मध्यमवर्ग जाणीवपूर्वक स्वास्थ्याचा प्रचार करीत आहे. मध्यमवर्गीयांच्या फ्लॅटची संख्या, फार्महाऊसेस वाढायला लागली आहेत. 

उत्पन्न आणि उत्पादन वाढत नाही तरी शेअर बाजारात  इतक्या उसळ्या कशाच्या जोरावर असतात?  हे पैसे केवळ अदानी, अंबानींचे नव्हेत, तर पाचवा आणि सहावा वेतन आयोग लागू झाल्यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशातले हे पैसे आहेत! अनेकांचे निवृत्ती वेतनच ४० ते ८० हजारांच्या घरात असते, त्यामुळे मुलांना आई-वडिलांवर अवलंबून राहावे लागते असे चित्र. यामुळे समाजात स्वस्थता पसरली. आर्थिक उत्पन्न वाढलेल्या नव्या राष्ट्रवादी लोकांना आता दुसरीकडे पाहायचेच नाहीये. त्यांना भूतकाळच विसरायचाय. स्वातंत्र्य चळवळही विसरायची आहे. गेल्या पाच वर्षांत मध्यमवर्गीयांमध्ये नथुराम गोडसे यांच्याबद्दल अचानक  वाढलेले प्रेम धक्कादायक आणि धोकादायक आहे. लोकशाहीत दोन्ही बाजू यायला हव्यात असे सांगून खरा इतिहास पुसून टाकायची ही धडपड! पाठ्यपुस्तकातील इतिहास बदलत चालला आहे. इतिहासातून गांधी-नेहरू लुप्त होत आहेत.  खोटे नायक निर्माण केले जात आहेत. 

या वातावरणात संघर्ष आणि अस्वस्थता टिकवून ठेवावी लागेल. मध्यमवर्गाला स्वस्थतेमधून बाहेर ओढून काढावे लागेल, तरच काहीतरी घडेल! दक्षिणायनच्या वतीने पुण्यात ‘लेखक का बोलतो’? या विषयावर आयोजित चर्चासत्रात केलेल्या तपशीलवार मांडणीचे संपादित

शब्दांकन : नम्रता फडणीस