शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘अफवाअफवी’च्या खेळातली ‘खपवाखपवी’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 11:28 AM

बारामतीच्या वाटेत मुनींना पाटी दिसली : ‘अफवा प्रॉडक्शन हाउस’! मनासारख्या फायली हलेना झाल्या की धाकले दादा न् थोरले काकाही इथं येतात असं कळलं!! - 

सचिन जवळकोटे, निवासी संपादक, लोकमत, सोलापूर -

भूतलावरचे म्युटेटेड विषाणू शेवटी इंद्र दरबारापर्यंत पोहोचले, ही ‘ब्रेकिंग न्यूज’ कर्णोपकर्णी पसरताच हलकल्लोळ झाला. भाल्यावर अमृत शिंपडून-शिंपडून द्वारपाल थकले. पायातल्या पैंजणांनाही हात लावायला अप्सरा तयार होईनात. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर वस्त्र लपेटलं गेलं. कोण रंभा अन्‌ कोण उर्वशी, कुणालाच काही समजेना. अस्वस्थ इंद्रांनी ताबडतोब नारदांना बोलावून खातरजमा केली. तेव्हा शोध लागला की, ‘विषाणू स्वर्गात पोचले, ही तर केवळ अफवा होती.’ महाराजांनी चिडून फर्मावले, ‘भूतलावर विषाणू पसरताहेत तर आपल्याकडं अफवा. तेव्हा त्वरित ही अफवा शोधून तिला पकडून आणा.’..मग काय, मुनी भूतलावर पोहोचले. एका कोपऱ्यात रौतराव अन्‌ आशिषभाऊ यांची गुफ्तगू चाललेली. मुलं जशी चिंचोक्यांची वाटणी करतात, तसं ते एकमेकांना काहीतरी वाटत होते. ‘या दोन अफवा तुमच्याकडं ठेवा. उरलेल्या तीन माझ्याकडे. एक दिवस मार्केटमध्ये तुम्ही खपवा. दुसऱ्या दिवशी मी खपवतो.’ असं रौतांनी सांगताच शेलार खूश होत म्हणाले, ‘होय.. होय.. तुमच्या अफवेमुळं पटोले नाना टेन्शनमध्ये येतील तर आमच्या अफवेमुळं थोरले काका डिस्टर्ब होतील.’त्यांच्या हातातल्या अफवेवर झडप घालण्यासाठी मुनी पुढं सरसावले, मात्र तोपर्यंत आपापल्या खिशात या अफवा टाकून दोघेही दोन वेगवेगळ्या दिशेला गायब झाले. या ‘अफवाअफवी’च्या खेळात कोण कुणाला ‘खपवाखपवी’ करतंय, हे मुनींना काही समजलंच नाही. ते पुढे निघाले. वाटेत रामदास भेटले. मंत्रिमंडळ विस्तारात गच्छंतीच्या अफवेमुळं तेही जरा शांतच वाटले. मुनींना पाहताच त्यांना नवीन कविता सुचली, एकही खासदार नसताना मी कायमचाच मंत्री.. आतापर्यंत कैक अफवा पचविल्या, आता खातो नागपूरची संत्री!सरकार कुणाचंही येवो, हे महोदय लाल दिव्याच्या गाडीत फिरतात कसे..? अशी कोणती अफवा यांच्याकडे आजपावेतो शाबूत आहे, या प्रश्नाचं उत्तर काही मुनींना सापडलं नाही.ते अफवेच्या शोधात पुढं सरकले. त्यांना देवेंद्र नागपूरकर भेटले. ‘तुम्हाला अफवा दिसली का हो?’ मुनींनी विचारताच डोके खाजवून ते एकच वाक्य बोलले, ‘दीड वर्षापूर्वी पहाटेच्या साखरझोपेत एकदा दिसली होती होऽऽ. त्यानंतर तिनं जो चकवा दिलाय की बस्स्‌’. नारद चमकले. गेल्या दीड वर्षात रोज एका अफवेचं पिल्लू सोडणाऱ्या नेत्यांच्या चतुरपणाला दाद देत ते मातोश्रीवर गेले.‘तुम्ही म्हणे गेल्या महिन्यात दिल्लीला जाताना रिकामे गेला होता. येताना मात्र अफवांची करंडी भरून आणलीत. खरंय का?’ -  ‘उद्धों’नी नारदांचा प्रश्न ऐकून न ऐकल्यासारखं केलं. नेहमीप्रमाणं चेहऱ्यावरची एक रेषाही न हलवू देता ते एवढंच म्हणाले, ‘मी नाही आणली हो, दिल्लीकरांनी नंतर हळूच पाठवून दिली.’हे ऐकून मुनी घाईघाईनं म्हणाले, ‘कुठाय ती? द्या बघू मला,’ तेव्हा नार्वेकरांनी त्यांना नीट समजावून सांगितलं, ‘अहो, आमचे साहेब दिल्लीवरून आल्यानंतर दोन-तीन वेळा थोरले काका बारामतीकर वर्षा बंगल्यावर येऊन गेले. त्या वेळी त्यांनी तिची तुकड्या-तुकड्यांत पार विल्हेवाट लावून टाकली.’ अखेर मुनी थेट बारामतीत पोहोचले. वाटेत त्यांना एक पाटी दिसली. ‘अफवा प्रॉडक्शन हाउस’. मुनींच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून तिथल्या वॉचमननं सांगितलं, ‘या कंपनीचे दोन मालक. थोरले काका अन्‌ धाकटे दादा. सरकारमध्ये मनासारख्या फायली हलेना झाल्या की दादा या कंपनीत येतात. कधी-कधी मूड आला की काकाही यातले काही प्रॉडक्टस्‌ घेऊन दिल्लीला जातात. तिथं विरोधकांच्या मीटिंगमध्ये सर्वांना ते वाटतात.’ ‘पण मग ही शेजारची नवी बिल्डिंग कशाची?’-  मुनींच्या गोंधळलेल्या प्रश्नावर वॉचमन गालातल्या गालात हसला, ‘आता ही नवीन कंपनी सुरू केलीय काकांनी. अफवा डिस्ट्रॉय हाउस. रोज निर्माण होणाऱ्या अफवा गाडून टाकण्यातच आमच्या दोन्ही मालकांचा दिवस चाललाय. लय बिझी हायतीऽऽ दोगं बी आजकाल.’ नारायणऽऽ नारायणऽऽ sachin.javalkote@lokmat.com 

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा