शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

२०२९ मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल? विरोधकांनी ‘शत्रू’ उभे केले, तेही भाजपच्या सोयीचेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 8:24 AM

मोदींप्रमाणेच केजरीवाल यांनीही आकांक्षा चुचकारण्याचेच राजकारण केले. कोणी सांगावे, उगवता प्रतिस्पर्धी म्हणून भाजपला आपचे भय वाटतही असेल!

- राजदीप सरदेसाई, ख्यातनाम पत्रकार

भारतीय राजकारणात एखादा आठवडा हाच  खूप मोठा काळ असतो, त्यामुळे दहा वर्षे म्हणजे तर अनंतकाळच झाला!  २०१२ मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला अवघ्या ४७ जागा, १५ टक्के मते मिळाली होती आणि समाजवादी पक्ष स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेत आला. आजचे पंतप्रधान मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि उत्तर प्रदेशात त्यांनी प्रचारही केला नव्हता. का? तर संघातले त्यांचे जुने प्रतिस्पर्धी संजय जोशी यांना भाजपने निवडणुकीत संघटन सचिव केले होते, त्याचा निषेध म्हणून! त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी भाजपने लागोपाठ निवडणूक जिंकून उत्तर प्रदेशात चौकार लगावला. पक्षाने तब्बल ४५ टक्के मते मिळवली. भारतीय राजकारणात मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कसे घट्ट पाय रोवले आहेत, यासाठी हा एवढा पुरावा पुरेसा झाला! 

दुसरीकडे भारतीय राजकारणात महत्त्वाच्या असलेल्या या राज्यात समाजवादी पक्ष हा प्रमुख विरोधी शक्ती म्हणून उदयाला आला आहे. भारतीय राजकारणाचा नकाशा इतका नाट्यपूर्णरीत्या कसा बदलला? त्याचे उत्तर अगदी थोडक्यात द्यायचे तर हा ‘नव्या’ भारतात काम करत असलेला ‘नवा’ भाजप आहे. अडवाणी-वाजपेयी काळातला सभ्य वर्तनमूल्यांचा मुखवटा फेकून देऊन हा पक्ष आता निवडणूक जिंकून देणारा रोंरावत येणारा गाडा झाला आहे. कसलीही तमा न बाळगता मुसंडी मारून विरोधकाना संपवणारे हे यंत्र आहे. शासनाची ताकद आणि माध्यम व्यवस्थापन एकत्र आणून विरोधकांना बापूडवाणे करून अदृश्यही करण्याची जादू या राजकीय यंत्राला करता येते. या प्रक्रियेत भाजपने भारतातील निवडणूक राजकारणाचे नवे नियम लिहिले. जातीवर आधारित राजकारणाचा पारंपरिक फंडाही मोडीत काढला. पक्षाने  जातीय ध्रुवीकरणाची अशा रीतीने पुनर्मांडणी केली की कोणत्याही विशिष्ट जातीबरोबर भाजपची खास जवळीक असल्याचा शिक्का बसू नये. हिंदुत्वाचा बिल्ला दिमाखात मिरवताना पक्षाने हिंदू राष्ट्रवाद आणि कट्टर मुस्लीमविरोधी विचारांची मोट बांधून धर्म राजकारणाचा नवा नजारा दाखवला. केवळ राजकीय ओळखीच्या पलीकडे जाणारा हिंदुत्वाच्या बेरजेचा मतदारसंघ निर्माण करून पक्षाने आपला सामाजिक पाया विस्तारला आहे. भाजपच्या या सगळ्या विस्तारीकरणाच्या केंद्रस्थानी आहेत त्या गरिबांना समोर ठेवून आखलेल्या कल्याणकारी योजना! सरकारी योजनांच्या लाभार्थींचा मोठा समुदाय पक्षाने तयार केला आहे. आधीच्या सरकारांनी अशा योजना दिल्या नव्हत्या असे नव्हे. २०१४ च्या आधी यशस्वी झालेली रोजगार हमी योजना होतीच की! परंतु भाजपाने शौचालय असो वा गॅस सिलिंडर, मोफत रेशन असो वा घरे; या सरकारी सुविधा बेमालूमपणे राजकीय कार्यक्रमाशी जोडल्या. त्यातून सगळा खेळ बदलला. 

अर्थात, नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रमुख संदेशवाहक पक्षाकडे होता म्हणून हे जमले, हे विसरता येणार नाही. पुन्हा निवडून आलेल्या चारही सरकारांनी उत्तम कारभार केला होता, अशातला भाग नाही. पोलिसिंग कडक करून योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था पक्की केली, याचे समर्थन ते नक्की करू शकतील; पण ‘यूपी शायनिंग’चा जो गाजावाजा त्यांनी चालवला होता, तसे काही घडल्याचे दाखवता येईल? ते खरे असते, तर राज्यात लाखो बेरोजगारांच्या झुंडी दिसल्या नसत्या. गेल्या पाच वर्षांत तुलनात्मकदृष्ट्या मणिपूरमध्ये शांतता नांदली असेल; पण राज्याचे दरडोई उत्पन्न अजूनही देशात सर्वात कमी आहे. उत्तराखंडात भाजपला मुख्यमंत्री तीनदा बदलावा लागला, याचा अर्थ राज्यात चांगल्या नेतृत्वाची वाणवा आहे, असाच होत नाही का? गोव्यातही कोविड व्यवस्थापनात आणि भ्रष्टाचार निपटण्यात सावंत सरकार अपयशी ठरले होते आणि तरीही भाजपला चालू सरकारांबद्दल अनुकूल मत तयार करता आले. कारण या सर्व गोष्टींवर ‘मोदी मंत्र’ मात करून जातो. प्रामुख्याने कर्मभूमी असलेल्या उत्तर प्रदेशात मोदी यांनी ही जादू कशी विणली, हे पाहण्यासारखे आहे. हिंदी पट्ट्यात ग्रामीण भागात एखादी महिला कोविड काळात उपचाराअभावी आपला नवरा गेला, मुलगा बेकार आहे हे रडत रडत सांगेल; पण ‘मी मत मात्र मोदींनाच देणार’ हेही तीच सांगेल. पंतप्रधानांनी या लोकांशी इतके खोल नाते जोडले आहे, ‘मोदी है तो मुमकीन है,’ असे त्यांना खरेच वाटते. 

मोदी स्वत:साठी वापरत असलेल्या प्रधानसेवक, कर्मयोगी अशा संबोधनांची विरोधक भले टर उडवत असतील; पण विचारांच्या लढाईतून केव्हाच बाहेर काढल्या गेलेल्यांना मोदी आधीच्या भ्रष्ट दिशाहीन राजवटी घालवणारा महान नेता वाटतात. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपसमोर विरोधकांनी ‘शत्रू’ उभे केले, तेही भाजपच्या सोयीचेच! मग ते उत्तर प्रदेशातले अखिलेश यादव असोत की देश पातळीवरचे राहुल गांधी, दोघेही घराणेशाहीचे वारस, स्वकर्तृत्वावर पुढे आलेले नाहीत. भूतकाळाचे ओझे टाकून न देऊ शकणाऱ्या या जुन्या मांडणीबद्दल नव्या भारताच्या मनात अढी आहे. ‘राजकीय गुंडांना आसरा देणारा पक्ष’ असा टोमणा सपाला मारणे किंवा ‘काँग्रेसने भ्रष्टाचार सहन केला,’ असा आरोप जाता- येता करणे  भाजपला फारच सोपे गेले. याच परिप्रेक्ष्यातून पाहिले, तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा झालेला विजय हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. भ्रष्टाचारविरोधी व्यासपीठ पुढे करून केजरीवाल यांनीही पंजाबातील प्रस्थापित मांडणीला आव्हान दिले. मोदी यांच्याप्रमाणेच केजरीवाल यांनी आकांक्षा चुचकारल्या. आशा, बदलाचे राजकारण केले. भाजपइतके साधनसामग्रीचे बळही पक्षाकडे नव्हते, म्हणूनच तर कदाचित भाजपला उगवता प्रतिस्पर्धी म्हणून ‘आप’चे भय वाटले असेल. - सात वर्षांत इतक्या हादरे देणाऱ्या घटना घडल्या असतील तर भविष्यात काय घडेल कोणी सांगावे? २०२९ मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल असा सामना होईल? 

काही अपरिहार्य कारणास्तव ‘विदाबुद्धी’ हे सदर आज प्रसिद्ध होऊ शकले नाही. - संपादक 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाNarendra Modi Stadiumनरेंद्र मोदी स्टेडियम