शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Atal Bihari Vajpayee : साधे जीवन, उच्च विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 03:38 IST

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील तितकेच प्रभावी होते. आयुष्यभर सर्वसामान्यत्व जपलेला हा मनुष्य ‘साधे जीवन, उच्च विचार’ या उक्तीप्रमाणेच जगला.

- मा.गो. वैद्य, ( माजी प्रवक्ते, रा.स्व. संघ)अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील तितकेच प्रभावी होते. आयुष्यभर सर्वसामान्यत्व जपलेला हा मनुष्य ‘साधे जीवन, उच्च विचार’ या उक्तीप्रमाणेच जगला. अगदी खासदार असतानादेखील स्वत:चे कपडे ते धुवत असत. जिव्हेवर सरस्वती अन् मनात भारतमाता घेऊन जगणारे अटलजी अलौकिकच होते. नागपुरात अटलबिहारी वाजपेयी यांनी संघ तृतीय शिक्षा वर्गात प्रशिक्षण घेतले होते.या शिक्षा वर्गात अटलजींची वक्तृत्वावरील पकड, कवितेची जाण आणि लाघवी व्यक्तिमत्त्व अनुभवयाची पहिल्यांदा संधी मिळाली. अनेक स्वयंसेवक त्यांच्यापासून प्रभावित झाले होते.अटलबिहारी वाजपेयी १९६१ ते १९६६ या कालावधीत जनसंघाच्या कामाने अनेकदा नागपूरला आले. एरवी ते महानगर अध्यक्ष सुंदरलाल रॉय यांच्या घरी थांबत. मात्र रॉय शहरात नसल्यामुळे अटलबिहारी वाजपेयी एकदा माझ्या निवासस्थानी थांबले. त्यावेळी खासदार असूनदेखील त्यांनी खाली बसूनच जेवण करणे पसंत केले व कपडेदेखील स्वत: धुतले.विनोदी ‘काले’ कविता१९४५ च्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी मल्हारराव काळे हे होते. अटलजी हिंदी भाषेत त्यांना ‘काले’ असे म्हणत. शिक्षा वर्गात सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत अटलजींनी ‘रेशमबाग की मिट्टी काली, नाग नदी का पानी काला और...हमारे सर्वाधिकारी भी काले’ अशी कविता म्हणून सर्वांनाच पोट धरुन हसायला भाग पाडले होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी