माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस, येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवशी यावा हा एक चांगला, पथदर्शक व सेक्युलर योगायोग आहे. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी किंवा प्रत्यक्ष महात्मा गांधी यांच्या जयंतीचे वा पुण्यतिथीचे स्मरण न करणारे मोदींचे सरकार वाजपेयींचा जन्मदिवस थाटाने साजरे करायला पुढे आले असेल तर तोही एक चांगला व परिवर्तनशील योग मानला पाहिजे. त्यांच्या नावाचे शंभर रुपयांचे नाणे काढून ते तीनशे रुपयांना विकण्याचा सरकारचा व्यवसाय हाही त्यामुळे एक लाभयोग समजला पाहिजे.वाजपेयी यांची पंतप्रधानपदाची कारकिर्द त्यांच्या कामांमुळे जशी देशाच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारी तशीच ती त्यांच्या सौम्य, गंभीर, विनम्र व लोकशाही वृत्तीमुळेही लोकांच्या आदराचा व प्रेमाचा विषय असणार आहे. ते संघाचे होते, परंतु संघाने चालविलेल्या धर्मद्वेष्टेपणापासून स्वत:ला दूर राखणारे होते. लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथपासून अयोध्येपर्यंत जी रथयात्रा नेली तिच्यापासूनही ते दूर होते. त्या यात्रेचा आरंभ राम मंदिरासाठी दिसत असला तरी तिचा शेवट बाबरी मशिदीच्या विध्वंसात होईल व त्यामुळे देशात धार्मिक दुही निर्माण होईल हे ते जाणत होते. संघाला व भाजपाला चढलेल्या तेव्हाच्या राजकीय उन्मादामुळे त्यांनीही वाजपेयींच्या दूर असण्याला फारसे महत्त्व दिल्याचे तेव्हा दिसले नाही. १९९९ मध्ये वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांची कारकिर्द लोकप्रियतेच्या ऐन शिखरावर असताना गुजरातेत दोन हजार मुसलमानांची कत्तल करणारे व त्या समाजाच्या अनेक स्त्रियांवर सामूहिक बलात्कार करणारे अत्यंत हिडीस असे हत्याकांड घडविले गेले. त्या वेळी त्या राज्यात वाजपेयींच्याच पक्षाचे नरेंद्र मोदी यांचे सरकार होते. त्यांच्या सरकारातील अनेकांनी त्या हत्याकांडात सक्रिय भाग घेतला व काहींनी त्याला आपला पाठिंबाच असल्याचे अप्रत्यक्षरीत्या देशाला सांगितले.त्या धार्मिक दंगलीने देशाची प्रतिमा जगात मलिन केली व ती तशी होऊ दिल्याबद्दल जगातील अनेक संघटनांनी व देशांनी वाजपेयींनाच त्याचा दोष दिला. या प्रकाराने वाजपेयी एवढे वैतागले की त्यांनी अडवाणी व पक्ष यांचा सल्ला झुगारून गुजरातेतील दंगलग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट दिली. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात सामील व्हायला मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी तेव्हा नकार दिला ही गंभीर गोष्ट आजही साºयांनी लक्षात घ्यावी अशी आहे. वाजपेयींनी तेव्हा गुजरात सरकारला सल्ला देताना ‘राजधर्माचे पालन करा’ असा उपदेश जाहीरपणे केला. तेवढ्यावर न थांबता वाजपेयींनी मोदींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा पक्षात आग्रह धरला. परंतु लालकृष्ण अडवाणी आणि त्यांचे कडवे हिंदुत्ववादी सहकारी यांनी त्याला विरोध करीत मोदींना संरक्षण दिले. मात्र नंतरच्या काळातही वाजपेयींचा मोदींवर असलेला रोष कधी कमी झाला नाही. गुजरात दंगलीतून निर्माण झालेले खटले अनेक वर्षे चालले व अजूनही ते चालत आहेत. त्या सरकारातल्या अनेकांना २५ ते २८ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. प्रत्यक्ष त्याचे गृहराज्यमंत्री काही काळ अटकेत होते. मात्र त्या दंगलीनी वाढविलेला धार्मिक उन्माद एवढा मोठा होता की त्या बळावर मोदी यांनी आपला पक्ष पुन्हा अहमदाबादेत सत्तेवर आणला. नंतरच्या काळात वाजपेयींचेच सरकार काँग्रेसकडून पराभूत झाले.राजधर्म पाळा असे म्हणणारे वाजपेयी पडद्याआड तर तो न पाळणारे मोदी राजकारणाच्या केंद्रस्थानी आले व त्यांनी त्यांचे पाठीराखे अडवाणी यांनाच अडगळीत टाकल्याचे नंतरच्या काळात देशाने पाहिले. आज वाजपेयींच्या नावाने मोदी आणि त्यांची माणसे जोरजोरात जयजयकार करीत असतील तरी त्यांचे वाजपेयींच्या हयातीत असलेले नाते ते विसरले नाहीत व देशही विसरला नाही. वाजपेयींनी सतरा पक्षांचे आघाडी सरकार चालविले. ते चालविताना आपल्या धोरणाला धर्मद्वेषाचा साधा स्पर्शही होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. सर्वच धर्मांच्या व वर्गांच्या जनतेत ते लोकप्रिय होते़ त्यांच्याएवढी लोकप्रियता भाजपाच्या दुसºया कोणत्याही नेत्याला त्याआधी वा त्यानंतर