शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

औरंगाबादेत केली कचऱ्याने अडचण अन् पाण्याने फजिती

By सुधीर महाजन | Published: April 06, 2019 2:47 PM

लोक उमेदवारांना थेट तोंडावर सवाल करीत आहेत.

- सुधीर महाजन

मुकी बिचारी कोणीही हाका, अशी जनता राहिली नाही. आपल्या हक्कांसाठी जागरूक असणारा प्रसंगी रस्त्यावर उतरणारा आजचा सामान्य माणूस आहे. भलेही तो फाटका असेल; पण हक्कासाठी तेवढाच जागरूक दिसतो. तसा तो सोशीक आहे. सरकार, प्रशासन, राज्यकर्ते या सर्वांची मनमानी तो एका मर्यादेपर्यंत सहन करतो. भ्रष्टाचाराकडे कानाडोळा करतो. रोजच्या संघर्षातून इकडे लक्ष द्यायला त्याला वेळ मिळत नाही; पण वेळेवर जाब विचारायला तो कचरत नाही आणि निवडणुकीच्या काळात तर राजकारण्यांच्या बेमुरवतपणाचे सगळे माप त्याच्या पदरात टाकायला तो विसरत नाही.

औरंगाबादमध्ये सध्या अशीच वेळ राजकारण्यांवर आली आहे. गेल्या वर्षभरापासून कचऱ्याचे शहर, असे बदनामीचे बिरुद मिरवून देशभरात या शहराची मानहानी झाली. त्याला जबाबदार या शहराची महानगरपालिका आणि राज्यकर्ते. प्रत्येक गोष्टीत टक्केवारीची संधी शोधणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे साटेलोटे यामुळे या शहराचे न भरून निघणारे नुकसान झाले. कचऱ्यावरून शहरात दंगल झाली; पण हा प्रश्न अजून सुटला नाही. इतकेच नव्हे स्वच्छ भारत अभियानात दिल्लीत काम करणारे सनदी अधिकारी डॉ. निपुण विनायक यांना येथे खास बाब म्हणून आणले. आता शहर स्वच्छ होणार, अशी आशेची लहर शहरभर पसरली; पण त्यांनी येऊन काय केले, हाही प्रश्नच आहे. शिवसेनेने सगळ्या शहराचाच ३० वर्षांत कचरा केला. याची अनुभूती आजवर या पक्षांची पाठराखण करणाऱ्या लोकांनाच झाली आणि थेट प्रश्न विचारायला लागले.

आज शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची प्रचार रॅली कांचनवाडीत गेली. त्यावेळी तेथील नागरिकांनी त्यांना प्रवेश नाकारला. आमच्या भागात तुम्ही शहराचा कचरा आणून टाकला. आमचा परिसर घाणेरडा केला, असा सवाल करीत त्यांना परत पाठवले. ३० वर्षांत  शिवसेनेला असे परत पाठविण्याचा हा शहरातील पहिलाच प्रसंग. यावरून जनतेच्या मनातील असंतोष किती मोठा आहे, हे दिसते. असंतोष फक्त कचऱ्यापुरता मर्यादित नाही. राज्य सरकारने १०० कोटी देऊन वर्ष उलटले. तरी रस्ते झाले नाहीत. शहरात सातव्या दिवशी पाणी मिळते. रस्त्यावर दिवे नाहीत. सर्वच उद्याने बकाल झाली. अतिक्रमणांनी शहरभर पाय पसरले ते यांच्याच आशीर्वादामुळे. नियम, कायदा नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. कोणतीही शिस्त नाही. सर्वसामान्य माणसाला सुरक्षित वाटत नाही. त्यातून हा असंतोष तयार झाला.

शुक्रवारी सकाळी जशी खैरेंची प्रचार रॅली प्रचार न करता परतली. तीच वेळ जालना मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवेंवर आली. शहराचा मुकुंदवाडी हा भाग त्यांच्या मतदारसंघात येतो. आज सायंकाळी त्यांच्या प्रचार कार्यालयाने उद्घाटन होते. लोक जमले. ऐन कार्यक्रम सुरू होण्याच्या वेळेस पाणी आले. तसे लोक सभा सोडून उठले. एक वेळ नेत्यांचे भाषण नाही ऐकले तर चालेल; परंतु सात दिवसांनंतर आलेले पाणी भरले नाही तर... लोक गेल्यामुळे कार्यक्रम उशिरा सुरू झाला. येथे पुन्हा दानवेंच्या जिभेची घसरगुंडी झाली आणि त्यांनी सोलापूरची पुनरावृती केली. येथे पुन्हा ‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले,’ असे वक्तव्य केले, तर निवडणुकीत कचरा आणि पाणी हे विषय औरंगाबादमध्ये या दोघांसाठी ज्वालाग्रही बनले आहेत. लोक उमेदवारांना थेट तोंडावर सवाल करीत आहेत. लोकांनी आतापर्यंत चंद्रकांत खैरेंना प्रश्न विचारले नव्हते; पण आता विचारायला कोणी घाबरत नाही. हाच मोठा बदल औरंगाबादमध्ये दिसतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकaurangabad-pcऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबाद