शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

शुभ काळ, अवघ्या दिशा

By admin | Published: March 03, 2017 11:57 PM

सकाळी सहा-साडेसहाची प्रसन्न वेळ होती. अवघा तो शकुन .... तुका म्हणे हरिच्या दासा।

सकाळी सहा-साडेसहाची प्रसन्न वेळ होती. अवघा तो शकुन .... तुका म्हणे हरिच्या दासा। शुभ काळ अवघ्या दिशा।। (तु.गा. २१७६) संत तुकारामांच्या कालातीत काव्याने आणि किशोरी आमोणकरांच्या सुरांनी मन चकित झाले तर नवल कसले? आजच्या विज्ञानयुगातसुद्धा आपण शुभ-अशुभ दिवस, लाभी दिशा, मुहूर्त यांचा हळूच शोध घेत असतो. समाजाला या गैरसमजुतींच्या जंजाळातून बाहेर काढण्यासाठी सतराव्या शतकात लिहिलेल्या या ओळी आहेत. तुकाराम बीजेची पहाट या शब्दांनी अधिक उजळ झाली.जप-तप, भगवी वस्त्रे, कर्मकांड ही भक्तीची वरवरची साधने आपण महत्त्वाची मानतो. यापेक्षा ‘क्षुधेलिया अन्न’ म्हणजे भुकेनी कळवळणाऱ्याची जात, राहणी न पाहता आधी त्याला अन्न द्यायला हवे. जर ‘ईश्वराचा अंश प्रत्येक जिवात आहे’ असे शास्त्रे-पुराणे सांगतात तर हा प्रत्येक जीव समाजाच्या किंवा विश्वाच्या एकाच देहाचा भाग-अंश-अवयव आहे. मग त्यातील एकाला दु:ख, पीडा, वेदना असेल तर ते साऱ्यांचेच दु:ख नाही का? सामाजिक समतेचा हा विचार त्याकाळी संत तुकारामांनी सांगितला. पण प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या आजच्या मानवजातीलाही सामाजिक समता पेलत नाही हे कटुसत्य आहे. संस्कार संपन्न, सदाचारी माणूस घडवण्याचे कार्य निरपेक्षपणे संत करीत होते. सावळ्या, सुंदर विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जाणारे संत अद्वैत तत्त्वज्ञान जाणत होते. ‘कासयाने पूजा करू केशीराजा’ (तु.गा. ३७६८) हा त्यांचा बोलका अभंग पहा. संत तुकाराम यात म्हणतात- तीर्थक्षेत्री स्नान केले; पण मनप्रक्षालन झालेच नाही. केशीराजा ! तुझी पूजा मी कोणत्या साधनांनी करावी? पाण्याने तुला स्नान घालावे तर जीवनाचा निर्माता तूच आहेस. या फुलांच्या सौंदर्याचा आणि सुगंधाचा कल्पक निर्माताही तूच. नागवेलीची सुबक नक्षीदार पाने, क्षत नसणारे धान्य, गळलेल्या मोहरातून वाचलेली फळे, साऱ्यांचे सृजन तर तूच करतोस. राजमुद्रा असणाऱ्या शिक्क्यांची धातू, शेतातील सोनसळी धान्यराशी यांचेही निर्माण त्या जगनियंत्याचेच. संत तुकाराम महाराज म्हणतात, हाती चिपळ्या, गळ्यात वीणा घेऊन नामघोष करत ज्या भूमीवर आम्ही फेर धरतो ती धरती धारण करणाराही तोच. तेव्हा टाळ्या वाजवणारे दोन हस्तक आणि झुकलेले मस्तक याआधारे मी तुझी मानसपूजा करतो. आपल्या पोटच्या मुलांवर जसे आणि जेवढे प्रेम आपण करतो तेवढेच आपल्याकडे सेवारत असणाऱ्यांवर करावे हा माणुसकीचा अमोल संदेश नित्य व्यवहारात आणण्यासारखाच आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात ‘ज्ञानदेवे रचिला पाया....’तुका झालासे कळस’ हा बहिणाबार्इंनी केलेला गौरवपूर्ण उल्लेख संत तुकारामांच्या अमोल कार्याची ग्वाही देणारा आहे. -डॉ. सौ. प्रज्ञा आपटे