शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

थोरात, पटोले; आता शांत होणार बडबोले!

By यदू जोशी | Published: February 17, 2023 10:44 AM

काँग्रेसमध्ये खूप ताणले जाते; पण मग तुटण्याआधी थांबविले जाते. नाहीतर नाना पटोले- थोरातांमधील भांडण आठ दिवसांतच कसे काय शांत झाले असते?

यदु जोशी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ फायदा माध्यमे उचलतात आणि पक्षाचा तमाशा होतो. पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वादळ हे पेल्यातले असेल, दोघांपैकी कोणावरही पक्षश्रेष्ठी तूर्त कोणतीही कारवाई करणार नाहीत, हे गेल्याच आठवड्यात म्हटले होते. त्याचा प्रत्यय आला! दोघांचे मनोमीलन झाले किंवा दाखवले गेले. काल दोघे एकत्रितपणे पत्रकारांशी बोलले. किती छान हसू आणले दोघांनी चेहऱ्यावर? जणू काही जय विरुची जोडीच! पक्षश्रेष्ठींनी पटोलेंचा राजीनामा घेतला असता तर पक्षाला धोका देऊन आमदार झालेले सत्यजित तांबे यांच्या आरोपांवरून पटोलेंना घालवले गेले असा त्याचा अर्थ काढला असता. काँग्रेसश्रेष्ठी तस कधीही होऊ देणार नाहीत. पटोले यांना आज काढले नाही. म्हणून त्यांना कायमचे अभय मिळाले असेही समजू नका. टांगती तलवार कायम असेल. पटोलेंविरोधकांच्या कारवाया कायम सुरुच राहतील. 

काँग्रेसमध्ये खूप ताणले जाते, मग तुटण्याआधी थांबविले जाते. पक्षश्रेष्ठींना थंड करून खायची सवय आहे. पटोले थोरातांमधील भांडण आठ दिवसांतच कसे काय शांत झाले? माहिती अशी आहे की, दिल्लीने दोघांचीही चांगलीच कानउघाडणी केली. 'तुमच्यातील वादाचा पुण्यातील कसब्याची निवडणूक असताना असे भांडत राहिलात तर चुकीचा संदेश जाईल, शिवाय काँग्रेसचे रायपूर अधिवेशन तोंडावर आहे तेव्हा तोंडाला कुलूप लावा,' असे बजावले गेले म्हणतात! बडबोलेपणा थांबवण्याचे आदेश आले. त्यातच पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आदी ज्येष्ठ नेत्यांनी दोघांकडेही नाराजी बोलून दाखवली आणि मनोमीलनाचा देखावा उभा सांगतात, की हे मनोमीलन तात्पुरते आहे. कसब्यातील निवडणुकीनंतर ते पुन्हा उचल नागपुरात अडबाले पाठिंबा मागत असताना दिला? पूर्वी छोटू भोयर प्रकरणातही पटोले कसे चुकले? इथपासूनचा सगळा दारूगोळा पटोलेविरोधकांनी काढून ठेवला आहे. एकट्या तांबे प्रकरणावरून बाळासाहेब थोरात यांचे विधिमंडळ पक्षनेतेपद श्रेष्ठी काढून घेतील, आहे. असेही होणार नाही. एवढ्यात काहीही होणार नाही. सगळे कसे शांत, आलबेल आहे असे वाटत असताना अचानकबदल होतील. ही काँग्रेस आहे, पक्षात चारचार दशके घालवणाऱ्यांना नाही समजली; तर तुमची आमची काय झाला. पटोलेविरोधी नेते खासगीत गोष्ट?

बडबोले नेते, प्रवक्ते यांच्यामुळे बरेचदा तोंडावर पडावे लागते हे लक्षात आल्यानंतर आता भाजपनेही खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. संवेदनशील राजकीय विषयावर केवळ सहाच नेते बोलतील, सरकारमधील एखाद्या वादाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच बोलतील, कोणत्याही नेत्याने वादग्रस्त विधान करायचे नाही, प्रवक्त्यांनी वाद ओढवून घ्यायचा नाही, असे फर्मान काढण्यात आले आहे. बडबडरावांना आतातरी आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. ऊर्फी पॅटर्नवाल्यांना हा इशाराच नीड टू नो फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाह यांनी तो आणल्याचे मानले जाते. लष्करामध्ये अशी पद्धत आहे, की लढणाऱ्या सैनिकांना वा अधिकाऱ्यांना पुढच्या क्षणी काय करायचे आहे तेवढेच सांगतात. ती कामगिरी साधली की मग पुढचे सांगायचे. ते झाले की मग पुढचे सगळे एकाचवेळी सांगायचे नाही. शिवाय गरजेपुरत्याच लोकांकडे वाच्यता करायची. त्यामुळे कमालीची गुप्तता बाळगली जाते. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी याच फॉर्म्युल्याचा अवलंब केला होता. सत्तासंघर्षाच्या काळातही तेच करण्यात आले होते.

 केव्हा काय होईल?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ऐवजी नवे राज्यपाल २७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त सभागृहाला संबोधित करतील, असे २० जानेवारी रोजी लिहिले होते, ते खरे ठरले. कोश्यारी गेले, रमेश बैस आले. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी होईल, असे वाटले होते. पण ते अधांतरी दिसत आहे. सध्या फडणवीस एकतर अर्थसंकल्प तयार करण्यात अन् पुण्यातील निवडणुकीत व्यग्र आहेत. 'नीड टू नो' फॉर्म्युल्यानुसार अचानक काही झाले तरच वेगळे काही होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही ऑगस्टनंतरच होतील, असे वाटते. राज्यात सरकार असल्याने भाजप- शिंदे यांना घाई नाही. तसेही प्रकरण न्यायालयात आहे. मुंबईवरील उद्धव सेनेची पकड ढिली करायची तर काही अवधी जावा लागेल. सध्या तेच सुरू आहे!

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात