शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

बँकिंग व्यवस्थेचे शुद्धीकरण होणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 6:05 AM

गेल्या काही वर्षांपासून तणावाखाली असलेली भारतातील बँकिंग व्यवस्था थकीत कर्जाच्या प्रश्नाने अडचणीत आली आहे. पूर्वी ही थकीत कर्जे एकूण मालमत्तेच्या ३ टक्के एवढी होती, आता ती १५ टक्क्यांवर पोहोचली आहेत.

- डॉ. एस. एस. मंठामाजी चेअरमन, एआयसीटीई,सदस्य, कौशल्य विकास प्राधिकरणभारतातील बँकिंग व्यवस्थेचे दुखणे काय आहे हे जाणून घेण्यासाठी जॉन मेनार्ड केन्स यांनी लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स येथे १९०८ साली दिलेल्या भाषणाचा पुन्हा एकदा मागोवा घेणे गरजेचे ठरते. जॉन केन्स हे इंडिया आॅफिसच्या मिलिटरी आणि रेव्हेन्यू विभागात १९०६ साली काम करीत होते. १९०८ साली त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसचा त्याग केल्यानंतर हे भाषण दिले होते. त्यातील आशय आजच्या बँकिंग व्यवस्थेसाठी उपयुक्त ठरणारा आहे.गेल्या काही वर्षांपासून तणावाखाली असलेली भारतातील बँकिंग व्यवस्था थकीत कर्जाच्या प्रश्नाने अडचणीत आली आहे. पूर्वी ही थकीत कर्जे एकूण मालमत्तेच्या ३ टक्के एवढी होती, आता ती १५ टक्क्यांवर पोहोचली आहेत. त्यासाठी काही बाह्य घटक कारणीभूत आहेत. त्यात जागतिक वस्तूंचे दर घसरल्याने निर्यातीत घट हाही एक भाग आहे. बाकीचे घटक हे अंगभूत आहेत. टेलिकॉम, ऊर्जा, रिअल इस्टेट आणि पायाभूत सोयी यांच्यामुळेही थकीत कर्जे प्रभावित आहेत. बँकांच्या एकूण कर्जदारांपैकी ४१६ कर्जदारांची थकीत कर्जे २४.८ बिलियन डॉलरची असून, ती वसूल न होण्याजोगी आहेत. त्यामुळे बँकांच्या पुनर्वापर होणाऱ्या निधीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी अधिक कर्जे देण्याची बँकांची क्षमताही कमी झाली आहे. तसेच त्यावरील संभाव्य व्याजाच्या उत्पन्नातही घट झाली आहे.थकीत कर्जांची समस्या शेड्युल्ड बँकांना आणि सहकारी बँकांना जशी आहे त्याहून अधिक नागरी सहकारी बँकांना भेडसावते आहे. द पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पी.एम.सी.) पेचप्रसंगामुळे लाखो गुंतवणूकदारांची आयुष्यभराची कमाई धोक्यात आली आहे. त्यामुळे अन्य बँकांच्या ठेवीदारांतही घबराट पसरली आहे. या बँकेने हाउसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. या रिअल इस्टेट क्षेत्रातील संस्थेला दिलेल्या कर्जातील अनियमितपणाची चौकशी सध्या सुरू आहे.इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील प्रकल्पांना वित्तपुरवठा करणाºया इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अँड एफएस) या संस्थेची स्थापना ३० वर्षांपूर्वी झाली असून तिच्या भागधारकांमध्ये आयुर्विमा, स्टेट बँकेसह अनेकांचा समावेश आहे. या संस्थेने दिलेली कर्जेही थकीत कर्जे म्हणून ओळखली जात असून ती ८० हजार कोटींच्या घरात आहेत. गहाण मालमत्तांची विक्री करून पैसा कसा परत मिळेल असा त्यांचा प्रयत्न आहे. आता येस बँकेची पाळी आहे. खासगी क्षेत्रातील ही पाचव्या क्रमांकाची बँक असून रिझर्व्ह बँकेने तिचा कारभार स्वत:च्या हाती घेतला असून बँकेच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रणे आणली आहेत. बँकांच्या भांडवलाच्या योग्य व्यवस्थापनासाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांच्या विलिनीकरणातून सरकारी मालकीच्या चार मोठ्या बँकांची निर्मिती झाली. त्यात मजबूत आर्थिक स्थितीत असलेल्या काही बँकांमध्ये थकीत कर्जे असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल बँकांच्या विलिनीकरणामुळे मजबूत बँकांची अधोगती झाली, की दुबळ्या बँका मजबूत झाल्या, हे कालांतरानेच कळणार आहे. या बँकांचे सामिलीकरण झाले नसते तर त्या स्वत:च्या बुडीत कर्जापायी कोलमडल्या असत्या का? येस बँकेच्या तुलनेत वाईट अवस्थेत असलेल्या पंजाब नॅशनल बँक किंवा युनायटेड बँक आॅफ इंडिया यांचे सरकारच्या मालकीच्या अन्य बँकांमध्ये विलिनीकरण का करण्यात आले? या कृत्यामुळे ठेवीदारांच्या पैशाच्या सुरक्षिततेची हमी कितपत मिळणार आहे?कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बँकांना वाचविण्यासाठी सरकारने कोट्यवधी डॉलरची मदत या बँकांना केली; तरीसुद्धा या बँकांच्या ठेवीदारांना बँकांच्या थकीत कर्जाला सामोरे जावेच लागणार आहे. येस बँकेवर पैसे काढण्याच्या बाबतीत निर्बंध लागू केल्याचा परिणाम खासगी क्षेत्रातील सर्व बँकांना भोगावा लागला. यातून जे प्रश्न निर्माण झाले आहेत त्याची विश्वासार्ह उत्तरे मिळायला हवीत. येस बँकेच्या वार्षिक अहवालातून कर्जाच्या प्रमाणात २०१४ ते २०१९ या कालावधीत ४३४ टक्के वाढ झाल्याचे दिसते. त्यांची परतफेड होत नसताना बँक स्वस्थ कशी राहिली? कर्जफेड होत नसेल तर ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचा परतावा कसा मिळणार होता?येस बँकेच्या गुंतवणूकदारांच्या रक्षणासाठी सरसावलेल्या रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील राघवेंद्र सहकारी बँक आणि पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक यांना सापत्न वागणूक का द्यावी? येस बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने स्टेट बँक आणि आयुर्विमा महामंडळ यांना सांगणे कितपत शहाणपणाचे आहे? त्यांच्या रेटिंगवर त्याचा परिणाम होणार नाही का? ही स्टेट बँकेवर सरकारतर्फे करण्यात आलेली जबरदस्तीच आहे.सरकारने नेहमी ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करायला हवे, भागधारकांचे नव्हे! स्टेट बँकेतील पैसेदेखील करदात्यांचेच आहेत ना! म्हणजे करदात्यांना एक प्रकारे ही शिक्षा दिली जात आहे. अशा स्थितीत बँकिंग व्यवस्थेचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे, अन्यथा त्याचा निर्धारित परिणाम आर्थिक विकासावर होईल. पाच टक्क्यांहून अधिक विकास दर झाला तर नवे रोजगार निर्माण होतील. रिझर्व्ह बँकेच्या माजी गव्हर्नरांनी म्हटले होते की, बँकांचे पुनर्भांडवलीकरण व्हायला हवे. पण ते प्रामुख्याने बिगर बँकांच्या वित्तीय क्षेत्रात व्हायला हवे, अन्यथा कर्ज देण्याचे तसेच सरकारी रोखे खरेदी करण्याचे काम एकदम बंद पडेल!

टॅग्स :bankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र