शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

बंगालची वाघीण कचाटय़ात!

By admin | Published: December 12, 2014 1:17 AM

भाजपा नेत्यांवर आगपाखड करताना ममता बॅनर्जी यांनी सभ्यतेच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत.

भाजपा नेत्यांवर आगपाखड करताना ममता बॅनर्जी यांनी सभ्यतेच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यातील अशा उल्लेखामुळे ममता बॅनर्जी या असभ्य बोलण्यात आघाडीवर असणा:या नेत्या ठरल्या आहेत. 
 स्वत:ला सामान्य समजते आणि आयुष्यभर सामान्यच राहीन. मी अगदी तळागाळातून वर आले आहे. गोरगरिबांचा मला कळवळा आहे, त्यांच्याशी माङो नाते कधीच तुटणार नाही. हे उद्गार आहेत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे. ममता बॅनर्जी आणि साधेपणा यांचे नाते आहे. साधीसुधी सुती साडी, पायात रबरी स्लीपर आणि खांद्याला लटकवलेली शबनम पिशवी, अशी त्यांची वेशभूषा आणि चेह:यावर आक्रमक भाव. साधेपणा आणि आक्रमकता यांचे असे अनोखे मिश्रण क्वचितच कुठे आढळावे. 
या साधेपणाला लाभलेली एक सोनेरी किनारही आहे. ममता बॅनर्जी यांच्या नावावर 2क् पुस्तके आहेत आणि त्यात कवितासंग्रहही आहेत. पोरीबर्तन, कविता आणि माय अनफर्गेटेबल मेमरी ही काही पुस्तकांची नावे. कवितेवर ममता बॅनर्जी यांचे विलक्षण प्रेम! तर चित्रकला हा छंद! त्यातूनच निर्मिती 5 हजार तैलचित्रंची.  आपला फावला वेळ लेखणी आणि ब्रश हातात घेऊन सत्कारणी लावणा:या ममता हे संवेदनशील भारतीय स्त्रीचे प्रतीक आहे. या चित्रंची विक्री करून येणारा पैसा ममता गोरगरिबांना मदत करण्यासाठी वापरतात. ही उजळ बाजू आणि आक्रमक स्वभाव ही नैसर्गिक देणगी. 5 जानेवारी 1955 मध्ये जन्मलेल्या ममता बॅनर्ज्ीचे वडील वयाच्या 9 व्या वर्षी गेले. लहानपणापासून कदाचित संघर्ष करावा लागला असेल, तो आज आक्रमकतेच्या रूपात चेह:यावर दिसत असेल. विवाह केला नाही. आई गायत्रीदेवी यांचेच प्रेम आणि जिव्हाळा. आईलाही लेकीचा अभिमान वाटावा असे हे व्यक्तिमत्त्व! 
 197क् पासून काँग्रेसच्या कार्यकत्र्या. 1997 साली तृणमूल काँग्रेस हा स्वत:चा पक्ष स्थापन केला. स्वत:च वाढविला आणि विरोधी पक्षनेत्या म्हणून लढता, लढता, गेली निवडणूक 34 वर्षे सत्तेवर असणा:या माकपाचा पराभव करून बंगालची सत्ता मिळवली. बंगालची वाघीण असे नामाभिधान झाले ते याच काळात. यशाची कमान अशी उंच उंच जात असताना,  त्याला दृष्ट लागावी असे घडले. सुरुवात झाली ती शारदा चिटफंड घोटाळ्याने. 4 लाख गुंतवणूकदार असणा:या या घोटाळ्याचे एक एक पैलू उघडकीस येऊ लागले आणि हातातोंडावर पोट असणारे गरीब लोक उघडय़ावर पडले. एका रात्रीत सर्वस्व गमावून बसणा:यांतील अनेकांनी आत्महत्या केल्या. तृणमूल काँग्रेस आणि शारदा कंपनी यांचे नाते अगदी जवळचे. एकाला झाकावे आणि दुस:याला काढावे तसे. शारदा कंपनीचा प्रमुख सुदीप्तो सेन याच्या मालकीची वृत्तपत्रे तृणमूल समर्थक, त्याच्या टीव्ही वाहिन्यांवर ममतांचे गुणगान. सामान्य माणूस चक्रावला. सीबीआयनेही या संबंधावर मोहोर उठविली. या घोटाळ्याने बंगालमध्ये तृणमूल पक्षाच्या सत्यतेवर आणि ममता बॅनर्जी यांच्या प्रामाणिकतेवर संशय उमटवला. गोरगरिबांच्या कळवळ्याची भाषा बोलणा:या ममता बॅनज्रीना शारदा घोटाळ्यामुळे आर्थिक डबघाईला आलेले गोरगरीब दिसले नाहीत काय, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. 
हे पुरेसे नव्हते की काय म्हणून 2 ऑक्टोबर रोजी बरद्वान येथे जबरदस्त स्फोट झाला. हा स्फोट गॅस सिलिंडरचा असल्याचे प्रथम सांगण्यात आले; पण नंतर  बॉम्ब तयार करीत असताना हा स्फोट झाल्याचे उघडकीस आले. स्फोट ज्या घरात झाला ते घर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकत्र्याचे! या घरातून तृणमूलचे स्थानिक कार्यालयही चालवले जायचे. या स्फोटात तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचे सत्य ढळढळीतपणो समोर आले. स्फोटानंतर जप्त झालेल्या साहित्यात 55 आयईडी, मनगटी घडय़ाळांचे डायल्स व सिमकार्डे यांचा समावेश होता. पोलिसांना रोखणा:या महिलांनी व घरात असणा:या लोकांनी पुरावा ठरणारी कागदपत्रे आधीच जाळून टाकली होती. या स्फोटाप्रकरणी अनेकांची धरपकड झाली. नुकतेच या प्रकरणी 12 वाँटेड आरोपींपैकी एक असणारा शहानूर आलम याला आसामच्या नलबारी जिल्ह्यात अटक करण्यात आली. शहानूर आलम (32) ऊर्फ डॉक्टर इलियास हा जमातूल मुजाहिदीन बांगलादेश या दहशतवादी संघटनेचा कार्यकर्ता.  
वातावरण असे गढूळ बनलेले असतानाच भाजपाचे अध्यक्ष अमित शहा चाचपणीसाठी 
प. बंगालमध्ये येऊन धडकले. आपल्या आक्रमक भाषणात शहा यांनी शारदा घोटाळा व बरद्वान स्फोट यांचा संबंध असल्याचा आरोप केला. शारदा घोटाळ्यात जमवलेला पैसा, तृणमूल पक्षाने बरद्वान येथील स्फोटासाठी दिला, असा सणसणीत आरोप अमित शहा यांनी बंगालच्या सभेत केला. यामुळे संपूर्ण देशभर खळबळ माजली असता, सरकारनेच शारदा घोटाळा व बरद्वान स्फोट यातील संबंधांचे पुरावे मिळालेले नाहीत, असा खुलासा केला. अमित शहा यांचे आरोप फुस्स झाले; पण  तृणमूलच्या बदनामीत पडायची ती भर पडलीच. यामुळे ममता बॅनर्जी यांना तर स्फुरणच चढले. काही लोक आपल्याला पाहिजे ते बोलतात, असा आरोप ममता यांनी केला. कोळसा उगाळावा तितका अधिकच काळा, तसे या प्रकरणाचे झाले आहे. ममता बॅनर्जी यांचे धैर्य म्हणावे की अविचार, त्या एकापेक्षा एक अशी बेलाग वक्तव्ये करीत आहेत. भाजपा नेत्यांवर आगपाखड करताना ममता बॅनर्जी यांनी सभ्यतेच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यातील अशा उल्लेखामुळे ममता बॅनर्जी या असभ्य बोलण्यात आघाडीवर असणा:या नेत्या ठरल्या आहेत. आज असे वाटते कवयित्री, चित्रकार आणि लेखिका असणा:या या नेत्याचे ते सोज्वळ रूप खरे की आजचे आक्रस्ताळी, बेलाग रूप खरे! 
गोरगरिबांचा कळवळा असणारी आणि त्यांच्यासाठी संघर्ष करणारी ती ममता खरी की आपली चित्रे विकून येणारा पैसा बरद्वान स्फोटासाठी वापरल्याचा आरोप होणारी ममता खरी! काय खरे?
 
अंजली जमदग्नी
सहायक संपादक लोकमत 
औरंगाबाद (मराठवाडा) आवृत्ती