शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

आता मागचं दार नाही, पंकजाताई थेट मैदानात! 

By यदू जोशी | Published: October 08, 2022 8:14 AM

‘राहाल वरळीत तर जिंकाल कशा परळीत?’ अशी टीका पंकजा मुंडेंवर झाली होती. आता परळीच्या मैदानात शड्डू ठोकून उभी राहणार, असं त्यांनी जाहीर केलं आहे.

- यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

दसऱ्याला मुंबईत दोन मेळावे होते, तिकडे मुंबईपासून साडेतीनशे किलोमीटरवर पंकजाताईंचा दणकेबाज मेळावा झाला. त्यांनी कोणासाठी खुर्च्या लावल्या नाहीत, नाश्त्याची व्यवस्था केली नाही, पण तरीही हजारो लोक आले. उन्हातान्हात बसून त्यांनी पंकजाताईंना ऐकलं. वाचून नाही दाखवलं त्यांनी, पण ठरवून बोलल्या. ताईंचा सूर या वेळी बदललेला होता, राजकीयदृष्ट्या अधिक सावध वाटल्या त्या. ‘जितना  बदल सकते थे खुद को बदल दिया हमने, अब जिनको शिकायत है वह बदले’ असं त्या कोणाला उद्देशून म्हणाल्या असतील?  त्यांच्याविषयी ज्या नेतृत्वाला तक्रार आहे आणि ज्या नेतृत्वाविषयी पंकजाताईंना तक्रार आहे, अशा दोघांनी तक्रार निवारण केंद्र लवकर तयार करून गैरसमजांची भिंत लवकरच पाडली तर ते दोघांच्याही फायद्याचं होईल.

गेल्या काही सभा, पत्रपरिषदांमध्ये असलेला मूड पंकजाताईंनी  मेळाव्यात बदलला. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयीच्या त्यांच्या आधीच्या कापून दाखविलेल्या व्हिडिओचाही त्यांनी खुलासा केला. ‘मी बदलले आहे, तुम्हीही  जरा बदला’ असं त्या अर्थातच  पक्षांतर्गत विरोधकांना म्हणाल्या असाव्यात. पंकजाताई भाजपच्या असेट आहेत. त्यांच्याइतकी तुफान भाषण देणारी एकही महिला नेता एकाही पक्षाकडे आज नाही; पण त्या नाराज आहेत! भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबईत अलीकडेच त्यांच्या घरी गेले, तास दीड तास चर्चा केली. परवा बावनकुळेंच्या कोराडी देवीचे दर्शन घ्यायला पंकजाताई गेल्या, तेव्हाही दोघांची चर्चा झाली. ओबीसींची ताकद पुन्हा एकदा भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभी करण्यासाठी  पंकजाताईंची साथ बावनकुळेंना हवी आहे. 

देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताईंमध्ये पडलेलं अंतर कमी करण्याचा बावनकुळेंचा हेतू दिसतो. पंकजाताई काही नेत्यांचं वैयक्तिक भेटीत कौतुक करतात, पण जाहीरपणे खोचक बोलतात, असा त्यांच्यावरचा मोठा आक्षेप! त्याच्या अगदी उलट केलं, तर  फायदाच होईल हा राजकारणातील व्यवहार उशिरा का होईना ताईंना समजल्याचं परवाच्या भाषणावरून वाटलं. मध्यंतरी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पंकजाताईंनी सगळी व्यथा मांडली तेव्हा जे. पी. नड्डा त्यांना म्हणाले, ‘गर्दी हीच तुमची ताकद आहे, तिची काळजी करा.’ पंकजा यांनी लोकांमध्ये अन् लोकांमधूनच पुढे जावं, असा संदेश पक्षनेतृत्वानं यानिमित्तानं दिला आहे.

पक्षानं तिकीट दिलं तर मी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत परळीतूनच लढणार, असं पंकजाताईंनी जाहीर केलं हेही बरंच झालं. मागच्या दाराने जाण्यापेक्षा थेट मैदानात उतरणं कधीही चांगलं. मागे त्या हरल्या तेव्हा, ‘राहाल वरळीत तर जिंकाल कशा परळीत?’ अशी टीका झाली होती. आता परळीच्या मैदानात शड्डू ठोकून उभी राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. पक्षानं तिकीट दिलं तर... हे बोलायला मात्र त्या विसरल्या नाहीत.  अन्यायाबद्दल रडत बसण्यापेक्षा लढत पुढे जाण्याचा निर्णय घेतला हे चांगलंच आहे. पंकजाताईंना राज्यसभा, विधान परिषद मिळाली नाही याचं वाईट वाटण्यापेक्षा ती न देण्याची समाधानकारक कारणं नेतृत्वाकडून सांगितली गेली नाही, हा त्यांचा आणि समर्थकांचा मोठा रोष आहे. मुंडे साहेबांना मानणारी माणसं ताईंनी मुंडे साहेबांसारखंच वागावं, आपल्यात राहावं अशी अपेक्षा करीत वाट पाहत होती. पंकजांनी त्यांच्याशी पुन्हा एकदा कनेक्ट साधला. २०२४ मध्ये पुन्हा पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना पुन्हा होईल. राज्यसभा, विधान परिषदेसाठी माझ्या नावाची चर्चा करू नका, असं त्या का म्हणत असतील? 

- आपल्याला संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यानं तर त्या बोलल्या नसतील? की आपली जागा जनतेतून निवडून जाण्याचीच आहे याचं भान पुन्हा गवसलं असावं? हकीकत को तलाश करना पडता है, अफवाए तो घर बैठे मिल जाती है, असंही ताई म्हणाल्या. याचा अर्थ, नवीन हकीकत लिहिण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडे