शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

निवडणुकांच्या तोंडावर विदर्भाचे स्मरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 6:07 AM

भारतीय जनता पक्षाने गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोन्ही भागांच्या विकासाचे आश्वासन दिले होते. ते कितपत पूर्ण केले, याचीही आकडेवारी राज्य शासनाने दिली असती तर बरे झाले असते.

- रवी टालेमहाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक साहाय्याची मागणी केली आहे. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी हे विशेष साहाय्य हवे असल्याचे राज्याच्या अर्थ खात्याने केंद्राला कळविले आहे. केंद्र सरकार निधी देईल की नाही, हे यथावकाश कळेलच; पण राज्य सरकारला या निमित्ताने विदर्भ व मराठवाड्याचे स्मरण झाले हेदेखील नसे थोडके!नियोजित वेळापत्रकाचे पालन झाल्यास, लोकसभेच्या निवडणुकीस आता अवघ्या सात महिन्यांचा, तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीस उणापुरा वर्षभराचा अवकाश आहे. त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यासाठी विशेष निधीच्या मागणीस तोंडावर येऊन ठेपलेल्या निवडणुकांची किनार आहे, असे कुणी म्हटल्यास त्याला चूक म्हणता येणार नाही.विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे मानव विकास निर्देशांकात पिछाडले असल्याचे कारण विशेष निधीची मागणी करताना पुढे करण्यात आले आहे. राज्य सरकारने अशा प्रकारे विशेष निधीची मागणी करण्यात काहीही वावगे नाही. केंद्र व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असल्याने समजा ही मागणी पूर्ण झालीच तर विदर्भ व मराठवाड्याचे थोडेफार भलेच होईल; पण प्रादेशिक असमतोल दूर करण्यात या सरकारलाही अपयश आल्याची ही एकप्रकारे कबुलीच नव्हे का?विदर्भ व मराठवाडा राज्याच्या उर्वरित भागांच्या तुलनेत पिछाडलेले आहेत, हे सर्वविदित सत्य आहे. केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोन्ही भागांच्या विकासाचे आश्वासन दिले होते. ते कितपत पूर्ण केले, याचीही आकडेवारी राज्य शासनाने दिली असती तर बरे झाले असते.राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानव विकास निर्देशांकात राज्यातील १२५ तालुके माघारले असून, त्यापैकी तब्बल १०० विदर्भ व मराठवाड्यातील आहेत. अर्थमंत्र्यांनी दिलेली माहिती नक्कीच अचूक असेल; पण त्यांचे सरकार सत्तेत आले तेव्हा हे १०० तालुके मानव विकास निर्देशांक तालिकेत कुठे होते आणि आता कुठे आहेत, ही आकडेवारीदेखील त्यांनी दिली असती तर अधिक बरे झाले असते.भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा सोयीनुसार वापर केला, हे एक उघड सत्य आहे. विरोधी पक्षात असताना विदर्भ राज्याच्या गठनास पाठिंबा द्यायचा आणि सत्तेत पोहोचताच त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करायचे! विदर्भवासीयांनी आजवर दोनदा हा अनुभव घेतला आहे. भाजप राज्यात पहिल्यांदा सत्तेत आला तेव्हा केंद्रात आमचे सरकार नसल्याने अडचण होते, हा सुटकेचा मार्ग तरी होता; यावेळी तर ती अडचणदेखील नव्हती. भाजपच्या एकाही नेत्याने गत चार-साडेचार वर्षात विदर्भ राज्याच्या गठनासंदर्भात चकारही काढला नाही आणि आता निवडणुका तोंडावर येताच विशेष निधीची चर्चा सुरू करण्यात आली आहे. हा निधी राज्याची सत्ता मिळताच का मागण्यात आला नाही, या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायला विदर्भातील जनतेला नक्कीच आवडेल!(लेखक लोकमतच्या अकोला आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVidarbhaविदर्भLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९