शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

भाजपा ‘ट्रेलर’ने शिवसेना घायाळ

By admin | Published: September 03, 2016 5:30 AM

नाशिक महापालिका पोटनिवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाने शिवसेना अधिक घायाळ होणे स्वाभाविक आहे, कारण येऊ घातलेल्या निवडणुकीत विजय आपलाच असल्याचा

- किरण अग्रवालनाशिक महापालिका पोटनिवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाने शिवसेना अधिक घायाळ होणे स्वाभाविक आहे, कारण येऊ घातलेल्या निवडणुकीत विजय आपलाच असल्याचा त्यांचा भ्रम यामुळे निकाली निघाला आहेमहापालिकेच्या एक-दोन प्रभागातील पोटनिवडणुकीच्या निकालावरून शहरवासीयांच्या सार्वत्रिक मानसिकतेचा अंदाज बांधता येऊ नये हे खरेच, पण निवडणुकांचे पाणी कुठल्या वळणावरून वाहू शकेल याचा संकेत मात्र त्यातून जरूर घेता यावा. नाशकातील हे असे संकेतच शिवसेना व ‘मनसे’ला घाम फोडणारे ठरले आहेत.नाशिक महापालिकेतील दोन प्रभागांसाठी जी पोटनिवडणूक झाली, तीत या दोन्ही जागा आपल्या हातून गेल्याचे दु:ख सत्ताधारी ‘मनसे’ला होणे अपेक्षित असताना पराभवाचा बाण शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे, कारण यंदा महापालिका आपल्याच ताब्यात आल्याच्या आविर्भावात आतापासून हा पक्ष वागतो-वावरतो आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या जानेवारी वा फेब्रुवारीमध्ये येऊ घातल्याने अवघ्या पाच-सहा महिन्यांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ‘मनसे’ने अगर राष्ट्रवादीने तसाही जोर लावलाच नव्हता. त्यामुळे या पक्षांचे उमेदवार तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर राहिले.मात्र केंद्रात तसेच राज्यातही एकत्रितपणे सत्ता उपभोगणाऱ्या भाजपा व शिवसेना या पक्षांनी प्रथमपासून ही पोटनिवडणूक ‘पोटतिडकी’ची केली होती. त्याचसाठी तर स्वकीयांचा विरोध डावलून वा त्यांना अंधारात ठेवून भाजपा शहराध्यक्ष, आमदार बाळासाहेब सानप यांनी पोलीस हत्त्येपासून ते दरोडा व खंडणी उकळण्यापर्यंतच्या विविध गुन्ह्यात नामांकित असलेल्या पवन पवार यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन पावन करून घेतले होते. शुचितेचा व ‘पार्टी विथ डिफरन्ट’चा टेंभा मिरवणाऱ्या भाजपाचे सोवळे त्यामुळे सुटून पडल्याची टीका झाली आणि खुद्द पक्षाच्याच अन्य स्थानिक आमदारांसह काही पदाधिकाऱ्यांनीही या प्रवेशाबद्दल आक्षेप नोंदविले होते. त्यामुळे या पवन‘पात्रा’च्या भरवशावर का होईना, पोटनिवडणूक जिंकून आगामी निवडणुकीतील विजयाची नांदी प्रदर्शिणे भाजपा शहराध्यक्षासाठी गरजेचे बनले होते. पक्षाची बदनामी स्वीकारूनही यश लाभले नसते, तर शहराध्यक्ष म्हणून सानप यांच्या यापुढील वाटचालीवर प्रश्न उपस्थित झाले असते. म्हणूनच भाजपासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती.भाजपाचे असे राजकीयदृष्ट्या प्रवाहपतीत होणेच शिवसेनेला लाभदायी वाटत होते. भाजपातील गुंड-पुंडांच्या भरतीबद्दल गळे काढून शिवसेनेने रान पेटविण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय, गेल्या काही महिन्यांपासून अन्य पक्षीय नेत्या-कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेशाला अधिक पसंती दिल्याचे दिसून येत होते. त्यामुळे महापालिकेत यापुढील सत्ता आपलीच, असा समज शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी करून घेतला होता आणि दुसरे म्हणजे, ज्या नाशिकरोड परिसरात सदर दोन प्रभागांची पोटनिवडणूक झाली, त्याकडे शिवसेनेचे प्रभाव क्षेत्र म्हणूनही पाहिले जाते. या साऱ्याच्याच परिणामी पोटनिवडणुकीतील यशही आपलेच, अशा भ्रमात या पक्षाचे पदाधिकारी होते. परंतु एके ठिकाणी दुसऱ्या, तर दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना राहिली. त्यामुळे जागा ‘मनसे’च्या गेल्या असल्या तरी शिवसेनेच्या दु:खाची जखम भळभळून वाहणे क्रमप्राप्त ठरले.अर्थात, भाजपाने ही पोटनिवडणूक जिंकली म्हणून या यशाला उद्याच्या विजयाची नांदी ठरविणेही घाईचेच ठरेल. कारण, अजून पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणे बाकी आहे. पण, निव्वळ मोठ्या प्रमाणातील पक्ष भरतीच्या बळावर किंवा पूर्ण करता न येणाऱ्या स्वप्नवत प्रकल्पांच्या घोषणांवर महापालिका निवडणुकीचे मैदान मारता येणार नाही, असा संकेत मात्र या पोटनिवडणुकीच्या निकालाने नक्कीच दिला असून, तो विशेषत: शिवसेना व ‘मनसे’ या दोन्ही पक्षांची काळजी वाढविणाराच ठरावा.