शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

भाजपाचे दुष्काळी दौरे उपचारात्मकच!

By admin | Published: May 14, 2016 1:37 AM

तद्दन उपचार म्हणून केल्या जाणाऱ्या राजकीय दौऱ्यांतून अगर भेटींतून फारसे काही निष्पन्न होत नसते; परंतु तरी ते केले जातात, कारण किमान लोकभावनांशी समरसता साधण्याचा हेतू त्यामागे असतो

तद्दन उपचार म्हणून केल्या जाणाऱ्या राजकीय दौऱ्यांतून अगर भेटींतून फारसे काही निष्पन्न होत नसते; परंतु तरी ते केले जातात, कारण किमान लोकभावनांशी समरसता साधण्याचा हेतू त्यामागे असतो. राज्यातील सत्ताधारी भाजपाने दुष्काळ पाहणीसाठी जे दौरे चालविले आहेत त्याकडेही याच भूमिकेतून पाहता यावे. शिवाय, या दौऱ्यांमागे या पक्षाचा आणखीही एक उद्देश असावा तो म्हणजे सहयोगी शिवसेनेवर मात करण्याचा; जो लपून राहू शकलेला नाही.दुष्काळाच्या वणव्यात होरपळलेल्या ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील वस्तुस्थिती जाणून घेण्याकरिता ‘भाजपा’चे मंत्री, आमदार व अन्य पदाधिकारी नुकतेच नाशिक जिल्हा दौऱ्यावर येऊन गेलेत. नाशकातच झालेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत या संबंधीचा निर्णय झाला होता. कारण या दौऱ्यांमागेही पार्श्वभूमी होती ती शिवसेनेतर्फे करण्यात आलेल्या अशाच दौऱ्यांची. सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्यात दौरे करून दुष्काळी उपाययोजनांसाठी व संपूर्ण कर्जमाफीकरिता प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची इशारेबाजी केली होती. परस्परांमधील वर्चस्ववादात लोकांची सहानुभूती शिवसेनेला कशी लाभेल, याचा विचार त्यामागे होता. विविध आघाड्यांवर भाजपाकडून कशी अन्यायाची भूमिका पार पाडली जाते, हे लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शिवसेनेतर्फे नाशकात महामोर्चाही काढण्यात आला होता. या एकूणच एकतर्फी प्रचारतंत्राचा समाचार घेऊन, आपणही लोकांच्या बरोबर आहोत; भाजपाचे सरकार दुष्काळाच्या प्रश्नी तितकेच संवेदनशील आहे हे दाखवून देण्यासाठी संपूर्ण राज्यातच या दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आता पावसाळा तोंडावर आला आहे. अनेक ठिकाणी तर वळवाच्या पावसाने वर्दीही देऊन झाली आहे. अशात भाजपाचे पदाधिकारी आपले दुष्काळी दौरे पूर्ण करतील कधी आणि त्यांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर होऊन त्यानुसार उपाययोजना साकारतील कधी, याबाबत शंका घेतली जाणे अस्वाभाविक नाही. कारण तसाही राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहेच. भाजपाच्या सदर पाहणी दौऱ्यांकडे केवळ उपचार म्हणून पाहता येणारे आहे ते त्याचमुळे. महत्त्वाचे म्हणजे, उपचाराचा आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार असला तरी, तोदेखील भाजपाला प्रभावीपणे पार पाडता आला नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या दुष्काळाने जो कहर मांडला आहे त्यातून नाशिक जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात तीस शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. दुष्काळाचा दाह किती असहनीय ठरला आहे त्याची या दुर्दैवी घटनांतून प्रचिती यावी. परंतु तालुका-तालुक्यांत दौऱ्यावर येऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून गेलेल्या भाजपाच्या नेत्यांनी जिल्ह्यातील कुणा आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केल्याची अगर त्यांना दिलासा दिल्याची वार्ता वाचावयास मिळू शकलेली नाही. त्याउलट शिवसेनेच्या मंत्री व पदाधिकाऱ्यांनी संबंधितांच्या भेटी तर घेतल्याच, शिवाय आपल्या परीने पक्षस्तरावरून काही जणांना आर्थिक मदतही दिली. जिल्ह्यातील काही भागात शिवसेनेतर्फे पाण्याचे टँकर्स व जनावरांसाठी चारा छावण्याही सुरू करण्यात आल्या आहेत. संवेदनशीलतेची कृतिशील दखल घेतल्याचे त्यातून दिसून आले. तेव्हा भाजपाचा उपचारही परिणामकारकतेची पातळी गाठू शकला नसल्याचेच यातून स्पष्ट व्हावे. दुसरे म्हणजे, जिल्ह्यात अन्यत्र असे दौरे करताना नेमके भाजपाचे आमदार असलेल्या चांदवड तालुक्यालाच त्यातून वगळण्यात आले. त्यामुळे केवळ अन्य पक्षीय आमदारांच्याच कार्यक्षेत्रात दुष्काळी दौरे करून भाजपातर्फे निव्वळ राजकारणच केले गेल्याचे म्हणता येणारे आहे. - किरण अग्रवाल