शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

भाजपाचे दांभिक दलितप्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 11:53 PM

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीचे एक वैशिष्ट्य असे की, सदर बैठक भाजपाने दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात घेऊन दलित समाजास आपण दलितहितैषी, दलितप्रेमी मित्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो दांभिक आहे.

- बी.व्ही. जोंधळे(आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक)भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीचे एक वैशिष्ट्य असे की, सदर बैठक भाजपाने दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात घेऊन दलित समाजास आपण दलितहितैषी, दलितप्रेमी मित्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो दांभिक आहे.या बैठकीत भाजपा अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, ‘भाजपा दलित-आदिवासीविरोधी असल्याचा अपप्रचार विरोधी पक्ष करीत असतात. विरोधकांचे हे भाजपाविरोधी मनसुबे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडले पाहिजेत.’ याच बैठकीत दलित-आदिवासी-ओबीसी वर्गांची मते खेचून आणण्यासाठी दलित-अदिवासी-ओबीसी समाजाची संमेलने भरविण्याचाही घाट घातला गेला. एकूणच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने २०१९ ची लोकसभा आणि दिवाळीनंतर होणाऱ्या चार-पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून दलित-आदिवासी समाजास भुलविण्याचे षड्यंत्र आखण्याचे निश्चित केले आहे, हे उघड आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’चा वादा करून केंद्रात आणि देशाच्या दोन डझन राज्यांत सत्ता मिळविली; पण गेल्या साडेचार वर्षांत लोकांचे ‘अच्छे दिन’ तर दूरच राहिले; मात्र त्यांचे ‘बुरे दिन’ जरूर आले. भयभीत झालेल्या दलित-आदिवासी-अल्पसंख्याक समाजाची तर भाजपाच्या राज्यात खूपच वाईट अवस्था झाली. भाजपा एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांचे भावनात्मक राजकारण करून बाबासाहेबांच्या राज्यघटनेचा आम्हाला अतीव आदर आहे, अशा घोषणा करीत आला. मात्र, दुसरीकडे बाबासाहेबांची राज्यघटना न बदलताही घटनाविरोधी वर्तन करीत आला, याचा भरपूर वाईट अनुभव गेल्या साडेचार वर्षांत दलित-आदिवासी-अल्पसंख्याक समाजाने घेतला आहे.भाजपाच्या सत्ताकाळात गोरक्षणाच्या नावाखाली दलित-मुस्लिमांच्या हत्या करण्यात आल्या. सनातन धर्माच्या प्रस्थापनेसाठी हिंसक मार्गांचा अवलंब करण्यात येऊ लागला. देशाच्या राजधानीत राज्यघटना जाळताना मनुस्मृतीच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. घटनेतील लोकशाही, धर्मनिरपेक्षता या सेक्युलर संकल्पना मोडीत काढण्यासाठी आध्यात्मिक पायावरील लोकशाही आणि आध्यात्मिक पायावरील धर्मनिरपेक्षता या पर्यायी संकल्पनांचा बडेजाव माजविण्यात येऊ लागला. विविधतेच्या नावाखाली विषमता जोपासली जाऊ लागली. विवेकवादी विज्ञाननिष्ठ मतांना हिंस्र विरोध होऊ लागला. हिंदू राष्ट्रास नकार देणा-या पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यासारख्या नेत्यांचा ‘सेक्युलर’ वारसा मिटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाबासाहेबांचे क्रांतिदर्शी सामाजिक विचार दडपून हिंदुत्वाच्या प्रतिक्रांतीचे कारस्थान रचण्यात येत आहे. म. गांधींच्या नावे स्वच्छता अभियान चालवायचे; मात्र गांधीजींचे अहिंसक-सत्याग्रही-मानवतावादी विचार नाकारायचे. धार्मिक बाबा, बुवा, मठाधिपतींना सत्तेत सहभागी करून घ्यायचे, असा सारा घटनाविरोधी प्रकार आज देशात सुरू आहे. या अशा मळभ दाटून आलेल्या पार्श्वभूमीवर म्हणूनच बाबासाहेबांची लोकशाही धर्मनिरपेक्षता वाचविण्यासाठी आंबेडकरवादी पक्ष-संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :BJPभाजपाSocialसामाजिकnewsबातम्या