शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

budget 2018 : उत्कर्षाची पहाट उगवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:50 IST

डिजिटल इंडिया, त्यातून आलेली पारदर्शकता व गतिमानता या देशातल्या शेवटच्या रांगेतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत उत्कर्षाची पहाट घेऊन येतील, असा ठाम विश्वास मला वाटतो.

- पूनम महाजन(खासदार तथा अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा)अर्थसंकल्प आज सादर झाला. लोकशाहीत पूर्णपणे अपेक्षित असलेल्या अनेक अपेक्षा आठवडाभर आधीपासून व्यक्त होतच होत्या. करातून सूट मिळाली तरच लोक उत्साहात मतदान करतील, असा एक सूर आळवला जात होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे पडघम आताच वाजू लागले आहेत. कुठलाही राजकारणी आधी निवडणुकीचा विचार करतो, कारण त्या जिंकणे हा त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न असतो. अनेक राजकारण्यांना हा चकवा टाळता येत नाही. मात्र नरेंद्र मोदींनी त्यांच्या धाडसी स्वभावाप्रमाणेच वेगळी वाट धरली. त्याचेच प्रतिबिंब या अर्थसंकल्पाकडून पाहायला मिळाले.अर्थमंत्र्यांची मांडणी उत्तरार्धाकडे यायला लागली तसे लक्षात यायला लागले की हा सवंग लोकप्रियतेकडे झुकलेला अर्थसंकल्प नाही. हा अर्थसंकल्प एका द्रष्ट्या नेत्याच्या दूरदृष्टीचा परिचय देणारा अर्थसंकल्प आहे. निवडणुका येतात, जातात. मात्र राष्ट्र कायम असते. पंतप्रधानांनी आधुनिक भारताचे एक स्वप्न पाहिले आहे. स्वप्न अनेक लोक पाहतात, मात्र ती पूर्ण करायला जे द्रष्टेपण लागते ते या अर्थसंकल्पात दिसले.जगाच्या नकाशावर झळकणारा भारत हे सर्वांचे स्वप्न आहे. हे स्वप्न आर्थिकदृष्ट्या सक्षम राष्ट्रालाच पाहता येऊ शकते. येत्या काळात जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारत पुढे येईल. पायाभूत सुविधांच्या विकासाशिवाय हे शक्य नाही. कृषी आधारित उद्योगांच्या भरभराटीसाठी पंतप्रधानांनीच आग्रह धरला आहे. कृषी उत्पन्नांची साठवणूक, प्रक्रिया व मार्केटिंग यांवर त्यांनी केलेले भाष्य कृषीक्षेत्राला दिलासा देणारे आहे. शहरे फोफावत आहेत आणि वाढत्या लोकसंख्येबरोबरच अन्नधान्याच्या मागण्याही वाढत आहेत. आपला शेतकरी या मागण्या पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. मात्र साठवण, प्रक्रिया व मार्केटिंग या सुविधा त्याच्या ठिकाणीच उपलब्ध झाल्या तर त्यातून भविष्यात आनंदी शेतकरीच पाहायला मिळेल. कृषी उत्पन्न संघटनांना यापुढे सहकारी संस्थांचा दर्जा देऊन त्यांनाही आयकराच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आले. कृषीला आधारभूत ठरणाºया पशुपालनाचाही तपशीलवार विचार करण्यात आला आहे. यातून शेतकरी व पशुपालक यांचा आर्थिक स्तर उंचावला जाणार आहे. एकंदरीतच लहान शेतकºयांच्या आयुष्यातून दारिद्र्य हद्दपार करणारे पाऊल म्हणूनच याकडे पाहिले पाहिजे. ‘इज आॅफ लिव्हिंग’चा उल्लेख झाला. उज्ज्वला योजनेने या देशातल्या ग्रामीण महिलांसमोरचा मोठा प्रश्न सोडविला. पाच कोटी घरे चुलीपासून मुक्त झाली आणि चुलीच्या धुरातून ग्रामीण महिलांची सुटका झाली.विकसनशील देशातील नागरिकांसमोर वैद्यकीय खर्चाचा प्रश्न मोठ असतो. पाच कोटी कुटुंबांना पाच लाख रुपयांचे विमा कवच देण्याची योजना यात मोठा बदल घडवून आणेल. उच्चविद्याविभूषित युवावर्ग जो थेट पंतप्रधानांशी जोडलेला असेल तो नक्कीच देशाच्या हिताचा विचार करेल आणि राष्ट्रीय हितासाठीच आपल्या ज्ञानाचा उपयोग करेल. या सरकारने आपली पारदर्शकता आणि गतिमानता यापूर्वीच स्पष्ट केली आहे. जीएसटी, जनधन योजना, बँक खात्यांमध्ये थेट जमा होणाºया विविध योजनांच्या रकमा या त्याचेच प्रतीक आहेत. आॅलनाइन व्यवहार, डिजिटल इंडिया यातून आलेली पारदर्शकता व गतिमानता या देशातल्या शेवटच्या रांगेतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत उत्कर्षाची पहाट घेऊन येतील, असा ठाम विश्वास मला वाटतो.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्पArun Jaitleyअरूण जेटलीPoonam Mahajanपूनम महाजन