प्रकाश मेहता हे बिल्डर-राजकारणी आहेत. मंत्री होण्याच्या आठ दिवस आधी त्यांनी बिल्डरशिप सोडली पण त्यांचे कुटुंबीय बिल्डरच आहेत. अशावेळी ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’ हे येणारच. फेरबदलात असे इंटरेस्ट तपासले जातील, अशी अपेक्षा आहे.शिवसेना-भाजपाचे सरकार असताना एक दिवस मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर एक बडा बिल्डर आपल्या आलिशान गाडीतून आला पण गाडीतून खाली न उतरता तसाच बसून राहिला. त्याने केवळ तो पोहोचल्याचा निरोप पाठविला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्याला तासभर तिष्ठत ठेवले. तासाभराने सीएमच्या कार्यालयाला ‘वरून’ फोन आला. त्या बिल्डरना आत घेऊन जा आणि त्यांचे काम करा. मग मुख्यमंत्र्यांचे पीए त्यांना गाडीपर्यंत घ्यायला गेले...पुढे त्या बिल्डरच्या कामाचे काय झाले कुणास ठाऊक. परवा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे मुंबईतील ज्या एसआरए प्रकल्पात बिल्डरधार्जिण्या निर्णयाबद्दल कमालीचे अडचणीत आले त्या प्रकरणात तेच २१-२२ वर्षांपूर्वी वर्षावर गेलेले बिल्डर आहेत, असा किस्सा एक माजी आमदार परवा सांगत होते.प्रकाश मेहता हे बिल्डर-राजकारणी आहेत. मंत्री होण्याच्या आठ दिवस आधी त्यांनी बिल्डरशिप सोडली पण त्यांचे कुटुंबीय बिल्डरच आहेत. अशावेळी ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’ हे येणारच. आपल्या मंत्रिमंडळात असे इंटरेस्ट असलेले आणखी काही मंत्री आहेत काय, ते आपल्या जवळच्या नातेवाईकांना त्यांच्या खात्यातील कंत्राट वा अन्य निर्णयांद्वारे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष लाभ पोहोचवित आहेत काय याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली तर आणखी काही नावे समोर येतील. मंत्रिमंडळाच्या आगामी फेरबदलात तसे इंटरेस्ट असलेल्या मंत्र्यांची किमान खाती तरी बदलावीत, अशी अपेक्षा आहे. याशिवाय, पुत्रप्रेमाने धृतराष्ट्र झालेल्या काही मंत्र्यांच्या डोळ्यांवरील पट्टी दूर करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावे. त्यात भाजपाचे आहेत तसेच शिवसेनेचेही मंत्री आहेत. आदिवासी विकास खात्यात वर्षभर ‘हेमंत’ ऋतू असतो. परिवहन खात्यात वर्षभर उन्मेषाचे वातावरण का असते हेही तपासले पाहिजे. काही दलाल/कंत्राटदार असे आहेत की एखाद्या वरिष्ठ आयएएस अधिकाºयाचे खाते बदलले की ते त्यांच्या नवीन खात्यात कंत्राट मिळवतात. पूर्वी एसटी महामंडळात उच्चपदस्थ अधिकारी असलेले एक आयएएस हे एमएसआरडीसीमध्ये गेल्यानंतर त्यांचे निष्ठावान एमएसआरडीसीमध्ये प्रचंड मोठे कंत्राट मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.प्रकाश मेहता यांची देहबोलीही एखाद्या सिनेमातील बिल्डरची असते. गुटख्याने तोबरा भरलेला हा माणूस धंदेवाला अधिक अन राजकारणी कमीच वाटतो अन् मंत्री वाटणे तर दूरच राहिले. आपला मंत्रालयातील कारभार सर्वांना दिसावा म्हणून अख्खे केबिन काचेचे (काँच के घर मे बैठनेवाले) करणारे मेहता यांच्यावरील आरोपांमुळे त्यांची प्रतिमा तर डागाळलीच पण त्याचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेलादेखील बसला आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावर एमआयडीसीच्या जमिनी मोकळ्या करताना कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर त्यांची आणि सरकारचीही प्रतिमा निश्चितपणे डागाळली. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री अडचणीत येण्याचीही ही पहिलीच वेळ.वैद्यकीय कक्षातील संघर्षमुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाची धुरा आता वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी सोपविली आहे. आतापर्यंत या कक्षाचे ओएसडी असलेले ओमप्रकाश शेटे तेथेच असतील पण त्यांच्यावर महाजनांना आणले आहे. या बदलाच्या निमित्ताने सोशल मीडियात भरपूर चर्चा झाली वा घडवून आणली गेली. ओमप्रकाश आणि महाजनांसोबत सावलीसारखे राहणारे रामेश्वर यांच्यातील कलगीतुराही चर्चेत राहिला. फ्रेमपेक्षा फोटोने कधीही मोठे होण्याचा प्रयत्न करू नये, हा संदेश या वादातून दोन्ही बाजूंनी आत्मसात केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे काम पूर्वीप्रमाणेच गतिमान राहील; एवढेच. आपल्या घरच्या मुंजीला अमिताभ बच्चन, रतन टाटांना आणून फ्रेमपेक्षा मोठे होणारे आणखीही लोक मुख्यमंत्री कार्यालयात आहेत. तेदेखील हे वाचून सुधारतील असे वाटते.- यदु जोशी
बिल्डरकडेच गृहनिर्माण दिले अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 1:20 AM