शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

कॅलेंडर आर्टमधील तारा निखळला

By admin | Published: July 31, 2016 3:32 AM

चित्रकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ चित्रकार एस. एस. शेख यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले आणि कॅलेंडर आर्टच्या सुवर्णयुगातला शेवटचा दुवा निखळला.

कॅलेंडर आर्टच्या क्षेत्रात १९६० ते १९९० या चार दशकांत आपल्या चित्रकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ चित्रकार एस. एस. शेख यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले आणि कॅलेंडर आर्टच्या सुवर्णयुगातला शेवटचा दुवा निखळला. डॉ. एस. एम. पंडित, रघुवीर मुगावकर, दीनानाथ दलाल, जे. पी. सिंघल यांसारख्या दिग्गज चित्रकारांच्या तोडीचे काम करणाऱ्या चित्रकारांपैकी ते एक होते. भारतीय ग्रामीण जीवनावर अभ्यासपूर्ण चित्रकाम करणाऱ्या शेख यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा..२७ आॅगस्ट १९३९ रोजी कोकणातल्या सावंतवाडी येथे मुस्लिम कुटूंबात सत्तार एस. शेख यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कमावणारे एकटेच असल्याने आणि खाणारी तोंडे अधिक असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती. कोकणातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या भूमीत सत्तार यांचे बालपण गेले. कोकणच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे लहानग्या सत्तारची नजरही सौंदर्याने ओतप्रोत भरलेली असल्यामुळे त्याला कलात्मकतेची जोड देऊन चित्रकार व्हावे असा निश्चित विचार सत्तार यांनी केला होता.तत्कालीन चित्रकार एस. एम. काझी आणि जी. डी. त्यागराज यांच्या निसर्ग चित्रणाचा गहीरा प्रभाव शेख यांच्यावर होता. परंतु कुटूंबातल्या वडीलधाऱ्यांना सत्तारने नोकरी करावी व कुटूंबाच्या घरखर्चाला हातभार लावावा,असे वाटे. तसे त्यांनी शाळेत शिकत असतांनाच दरमहा ७५ रूपये महीन्याच्या पगाराची नोकरी एका चित्रकाराकडे पत्करली होती. कारण त्यांचा पुस्तकी अभ्यासापेक्षा चित्र काढण्याकडेच कल होता. शेख १९५७ च्या एस. एस. सी परिक्षेत चित्रकला पारितोषिक मिळवून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर ते मुंबईत आले. त्यांनी सर जे.जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये डी. टी.सी. साठी प्रवेश घेतला. शेख यांचेकुंचल्यावरील प्रभुत्व व रंगलेपनातील बारकावे पाहून जे.जे. मधील लशिक्षकही आश्चर्यचकीत झाले! प्रा. प्रल्हाद धोंड, प्रा. बी. डी. शिरगावकर यांच्यासारख्या दिग्गज चित्रकार शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्याने त्यांची कलासाधना बहरत गेली. त्यांना पहील्यांदाच १९६२ साली ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ चे कास्यपदक आणि रावबहाद्दुर धुरंधर रोख पारितोषिक ‘सण्डे’ या चित्रासाठी मिळाले होते. त्यानंतर १९६८ साली ‘रॅश फॉर लंच’ या निसर्गचित्रासाठी रोख पारितोषिक व प्रमाणपत्र मिळाले. १९८६ साली जलरंगातील ‘हील स्टेशन आॅफ इंडिया’ या निसर्गिचत्राला उत्कृष्ट कॅलेन्डरसाठी ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला होता. १९८८ मध्ये ‘द व्हिलेज मदर’ या भारतीय चित्रशैलीतील वास्तववादी निसर्ग चित्रासाठी ‘आर्ट सोसायटी आॅफ इंडिया’ चे पारितोषिक मिळाले होते. १९९४ मध्ये ‘द बोट’ या जलरंगातील निसर्गिचत्राला ‘रतनकुमार जैन रोख पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले, तर रवी परांजपे फाऊंडेद्ब्रानतर्फे‘गुणीजन कला पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले होते. २०१० च्या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. तरही उत्साहाने आपल्या गुरूजनांविषयी ते आदराने बोलत होते. मला अजून खूप करायचे आहे. व्यावसायिक कामे मी खूप केली. परंतु गुरूंनी शिकवलेली कलात्मक कामे मला करायची आहेत असे ते म्हणत. हळूहळू त्यांची प्रकृती मात्र ढासळत गेली आणि त्यातच या जुलै महिन्यात त्यांचे निधन झाले. केलेंडर आर्टसमध्ये ज्यांना करिअर करायचे आहे अशांसाठी त्यांच्या चित्रकृती जतन करून ठेवल्या तर ती त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल.-प्रा. डॉ. सुभाष पवार>शेख यांनी भारतीय दऱ्याखोऱ्यातील डोंगर प्रदेश, निसर्ग आपल्या आपल्या कुंचल्यातून साकारला आहे. आदिवासी, डोंगर भागातील व ग्रामीण लोकजीवनाचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांनी चित्रात उतरवला. आदिवासी स्त्री-पुरुषांचे पेहराव, त्यांची समूहनृत्ये, त्यांची दैनंदिनी, जीवनशैली, घरे अशांचे बारीक निरीक्षण करून साकारलेली चित्रे जनसामान्यांना आवडत असत. त्यांनी साकारलेली कॅलेंडर विशेषत: टेबल कॅलेंडर विशेष असत.