शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

समुद्राचे पाणी आणि मलमूत्रातून वीज तयार करता येईल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 7:58 AM

समुद्रातून घेतलेले अर्धा लिटर खारे पाणी वापरून ४५ दिवस चार्ज न करता प्रकाश देतील असे कंदील बनवण्यात संशोधकांना यश आले आहे. त्या प्रयोगाविषयी...

ऊर्जेचा तुटवडा हे जागतिक वास्तव आहे. विकसित देश अनेक कारणांसाठी ऊर्जेचा अतिवापर करून ग्लोबल वॉर्मिंगसारखी समस्या निर्माण करत आहेत. गेली शंभर वर्षे विकसित देशांचे राहणीमान उच्चच राहिले आहे. त्यांच्याकडील या उच्च जीवनशैलीचे लाड पुरवण्यासाठी मुख्यतः तिसऱ्या जगातील (म्हणजे द. अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडातले काही देश) कच्चा माल मोठ्या प्रमाणात वापरला जातो. शिवाय गेल्या दोन दशकांत जगातल्या विकसनशील देशांतील जीवनमानदेखील एकंदरीने उंचावल्यामुळे तेथेही ही लाट पोहोचली आहे.  विजेची जगभरातील मागणी दरवर्षी वाढत आहे आणि पारंपरिक जीवाश्म इंधन संसाधने कमी होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) असे सूचित केले आहे की, जगभरातील ८४ कोटी लोक सध्या विजेशिवाय जीवन जगत आहेत. आता वेळ आली आहे, ती उपाय शोधायची. यातील एक स्तुत्य उपक्रम दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात राबवला जात आहे. 

दक्षिण अमेरिकेतील अभियंत्यांनी वॉटरलाइट हे अभिनव  उपकरण  विकसित केले आहे- एक हाताने धरलेले उपकरण जे फक्त दोन कप समुद्रातील खाऱ्या  पाण्याने प्रकाश आणि वीज निर्माण  करू शकते. वॉटरलाइट हा एक फिरता कंदील आहे जो अर्धा लिटर खाऱ्या  पाण्याचे अशा ऊर्जेत रूपांतर करतो की, ज्यायोगे  ४५ दिवस  चार्ज न करता प्रकाश देईल. हे उपकरण  आयनीकरणाद्वारे कार्य करते. जेव्हा मिठाच्या पाण्याचे इलेक्ट्रोलाइटस् उपकरणाच्या आत मॅग्नेशियमवर प्रतिक्रिया देतात तेव्हा विद्युत ऊर्जा तयार होते. या प्रक्रियेत मीठ आणि पाणी वेगळे होतात. म्हणून वॉटरलाइट जेव्हा प्रकाश देणे थांबवते तेव्हा उरलेले पाणी स्वयंपाकासाठी वापरले जाऊ शकते. विकासकांनी   दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील टोकावरील किनारी वाळवंट असलेल्या गुआजिरा द्वीपकल्पातील लोकांना हे दिवे प्रदान केले आहेत. तिथे वीज उपलब्ध नाही. हे उपकरण वॉटरप्रूफ आहे आणि पुनर्वापर करता येण्याजोग्या कच्च्या मालापासून  बनवलेले आहे. त्याचे अपेक्षित आयुष्य सुमारे ५,६०० तास आहे; जे २-३ वर्षांच्या वापराएवढे आहे, हे कंदील बनवायची किंमत सध्या पाच हजार रुपये आहे.

हे दिवे रॉकेल किंवा तेल-आधारित कंदिलांना बदलू  शकतात. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून चार्ज केले जाऊ शकतात. उपरोक्त द्वीपकल्पातील वायू  जमातीचे सदस्य त्यांच्या बोटींवर हे कंदील यशस्वीरीत्या वापरत आहेत, ज्यामुळे त्यांना रात्री मासेमारी करता येते. हे कंदील यूएसबी पोर्टद्वारे लहान उपकरणेही चार्ज करू शकतात. आणीबाणीच्या परिस्थितीत जर खारे पाणी उपल्बध नसेल, तर  मानवी लघवीचा वापर ऊर्जानिर्मिसाठी केला जाऊ शकतो. याचाच साधा अर्थ आहे की स्वच्छतागृहातील पदार्थांचा आपण ऊर्जेसाठी सहज वापर करू शकतो. वेस्ट टू वेल्थ हा शब्दप्रयोग अशाच उपायांना वापरला जातो.

- दीपक शिकारपूर, संगणक साक्षरता प्रसारक deepak@deepakshikarpur.com

टॅग्स :electricityवीज