शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

'कैरी' आणि करी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2016 2:18 AM

एप्रिल-मे महिन्यात कैऱ्या दिसायला लागतात. या कैऱ्यांचा भरपूर वापर महाराष्ट्राप्रमाणेच भारतातल्या विविध राज्यांत खूप वेगवेगळ््या प्रकारे होतो, पण अगदी कमी प्रमाणात का

- भक्ती सोमणएप्रिल-मे महिन्यात कैऱ्या दिसायला लागतात. या कैऱ्यांचा भरपूर वापर महाराष्ट्राप्रमाणेच भारतातल्या विविध राज्यांत खूप वेगवेगळ््या प्रकारे होतो, पण अगदी कमी प्रमाणात का होईना, थाई पदार्थांमध्येही कैरी वापरली जाते. या उन्हाळ्यात कैरीचा वेगळ््या पद्धतीने उपयोग करून पाहू या...उन्हाळा सुरू झाल्यावर साधारण एप्रिलच्या मध्यावर पुढचे दोन-तीन महिने बाजारात कैऱ्या मोठ्या प्रमाणात येतात. साठवणीचे, वाळवणाचे पदार्थ करण्यासाठी योग्य वेळ असलेल्या या काळात कैरीचे वर्षभर टिकणारे लोणचे हमखास होतेच. या लोणच्याबरोबरच गोड-तिखट छुंदा, कांदा-कैरी लोणचे, टक्कू असे प्रकारही होतात. यात महत्त्वाचा भाग हा की, उन्हाळा जरी जास्त असला, तरी त्याचा फायदा गृहिणी या अशा प्रकारे साठवणीचे पदार्थ करण्यासाठी करतात. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर भारताच्या वेगवेगळ््या राज्यातही कैरीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर प्रदेश, दक्षिणेत तर लोणचे करण्याच्या वेगवेगळ््या पद्धतीही आहेत. त्याचबरोबर, कैरीचे रस्सम, सांबार, कैरीची कढी, कैरी भात असे अनेक पदार्थ इथे केले जातात. आता तर वाहिन्यांमुळे हे पदार्थ घराघरात केले जाऊ लागले आहेत. लोणचं, टक्कूबरोबरच कैरीचा थोड्या वेगळ््या प्रमाणात उपयोग करता येऊ शकतो. अनेकदा आंबटपणासाठी आपण लिंबाचा उपयोग करतो. त्याऐवजी एखाद्या पदार्थाला वेगळा टच देण्यासाठी लिंबाऐवजी कैरीचा उपयोग करता येईल. मॅक्सिकन सालसात या मोसमात आंबटसर चव आणण्यासाठी कैरी अगदी बारीक चिरून वापरता येईल. कैरीचा असा थोड्या प्रमाणात उपयोग हा थाई पदार्थांत केला जातो. थाई पदार्थांमध्ये नारळ हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्याविषयी पुढे येईलच, पण या थाई पदार्थांमध्ये सलाद वा काही ग्रॅव्हीजमध्ये कच्ची पपई वापरली जाते. त्याऐवजी कैरी वापरता येऊ शकते, असे या पदार्थांचे तज्ज्ञ शेफ दुर्गे खडका यांनी सांगितले. थाई पदार्थांमध्ये ज्या वेगवेगळ््या रंगाच्या 'करी' असतात. त्यातल्या लाल आणि हिरव्या रंगाच्या करीमध्ये कैरीचा चांगल्या प्रकारे वापर करता येईल, पण लेमन ग्रास, कोथिंबीर, कांदा, लसूण, आले, जीरे पावडर, काळीमिरी, लिंबाचा रस असे काही पदार्थ मिक्सरमधून काढून एकत्र करायचे. ते नारळाच्या दुधात शिजवताना त्यात आपल्याला आवडणाऱ्या भाज्या घालायच्या की, झाली हिरवी करी तयार. अशा या हिरव्या रंगाच्या करीमध्ये लिंबाच्या रसाऐवजी कैरी घातली, तरी चालू शकते. फक्त ती घालताना ठेचून घातली की, तिचा रस जास्त चांगल्या प्रमाणात करीत उतरेल. त्यामुळे खाताना येणारी आंबट चव वेगळीच मजा आणेल. याशिवायही लिंबाच्या रसाच्या वापराऐवजी वेगळा स्वाद देण्यासाठी कैरीचा वापर करता येईल. हे झाले करीचे, पण थाई पदार्थांत जी वेगवेगळी सलाद असतात, त्यात थाई ग्रीन मँगो सॅलेड हा प्रकार असतोच. याशिवाय वेगवेगळ््या भाज्या, आइसबर्ग लॅट्यूस (कोबीचा पाश्चिमात्य प्रकार) बिन्स, शुगर सीरप एकत्र करून त्यात कैरीचे बारीक तुकडे करूनही सलाद बनवता येते. म्हणजेच, कैरीचा भरपूर प्रमाणात वेगवेगळ््या पद्धतीने चांगला उपयोग करता येऊ शकतो. थाई पदार्थांप्रमाणेच इतर कोणकोणत्या पदार्थांत पर्याय म्हणून कैरीचा वापर होऊ शकतो, याचा विचार व्हायला हवा. एक वेगळा प्रयत्न म्हणून कैरी आॅरेगानो, चिली फ्लेक्स आणि चीज लावून एकत्र करायची आणि मायक्रोव्हेववर गरम करायची. कैरीचा आंबटपणा आणि चीझ मेल्ट झाल्यावर त्याचा फ्लेवर वेगळा नक्कीच लागेल असे वाटते. पुढचे दोन महिने कैरीची फ्लेवर तोच ठेवत, तिचा वेगळा प्रयोग कसा करता येईल, याचा प्रयत्न नक्कीच करायला हवा, नाही का?थाई ग्रीन मँगो सलाद!घरी अगदी सहज उपलब्ध असणारे पदार्थ या सलादसाठी लागतात. यासाठी एका बाउलमध्ये कैरीचे पातळ लांबट काप करायचे. त्यात बारीक उभा चिरलेला कांदा आणि भाजून भरडलेले शेंगदाणे, मोड आलेले कोणतेही कडधान्य घालायचे. त्यावर आवश्यकतेप्रमाणे मिक्सरमध्ये बारीक केलेला आल्याचा छोटा तुकडा, लसूण, लाल मिरच्या(ठेच्यासाठी वापरल्या जातात त्या), मध, सोया सॉस, कोथिंबीर हे करून वरून मीठ घालायचे. आंबट, गोड, तिखट चवीचे हे बनलेले सलाद खूप वेगळी चव देते.