- डॉ. भूषण कुमार उपाध्यायभारतीय तत्त्वज्ञानात असे सांगितले आहे की, मूळ ऊर्जा एकच असून ती आपल्या मूळ रूपात पूर्णत: तटस्थ असते. परंतु ती ऊर्जा कशाप्रकारे अभिव्यक्त होते यावरून तिच्या चांगल्या व वाईटाचा विचार केला जातो. जर ऊर्जेची अभिव्यक्ती लोककल्याणासाठी असेल तर ती ऊर्जा चांगली मानली जाते. याउलट जर ऊर्जा नुकसानकारक असेल तर तिला नकारात्मक मानले जाते.डॉक्टर चाकूचा वापर करून शल्यचिकित्सेद्वारे रुग्णांना जीवदान देतात. त्यामुळेच त्यांना यश व संपत्ती दोन्ही प्राप्त होतात. गुन्हेगारसुद्धा चाकूचा वापर करतो. परंतु त्याला शिक्षा भोगावी लागते व समाजात त्याला हीन दर्जा दिला जातो. दोन्ही ठिकाणी चाकूचा वापर होतो परंतु एकाची अभिव्यक्ती लोककल्याणासाठी आहे तर दुसरा नकारात्मक रूपात अभिव्यक्त होतो. म्हणजेच एक चांगला व दुसरा वाईट आहे.हे तथ्य समजून घेण्यासाठी अनेक ग्रंथांमध्ये एखाद्या वृत्ताच्या केंद्र व परिघाचे उदाहरण दिले गेले अ ाहे. केंद्रावर आपल्याला कोणतीही रेषा दिसत नाही परंतु केंद्रापासून या रेषा जस-जशा दूर जातात, तस-तसे त्या दोन रेषांमधील अंतरही वाढत जाते.परिघाला जेव्हा या रेषा छेदतात, तेव्हा त्यांच्यातील अंतर सर्वात जास्त असते. याउलट त्या रेषा जस-जशा विरुद्ध दिशेकडून केंद्राकडे येतात, तस-तसे त्यांच्यातील अंतर कमी कमी होत जाते व त्या केंद्राच्या आकारात पूर्णत: एक होतात.परमचैतन्य आपले केंद्र, विश्व वृत्ताचा परिघ व आपले कार्य वृत्ताच्या रेषा म्हणजेच त्रिज्या होय. आपण जस-जसे सांसारिक वस्तूंमध्ये गुंतत जातो, तस-तसे आपण आपल्या परमचेतनेच्या अवस्थेपासून दूर जातो व आपल्याला या विश्वात अंतरच अंतर व भेदा-भेद दिसतात. हेच भेद काही ठिकाणी जातीचे, काही ठिकाणी धर्माचे, काही ठिकाणी वर्णाचे, तर काही ठिकाणी लिंगाचे रूप घेतात. एकमेकांविषयीचा द्वेष आणि हिंसा हे भेदाचेच कारण आहे.यामुळेच भारतीय योग साधनेत आपल्या ध्यानाला आत घेऊन आपल्या परमचेतनेला स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो.ध्यान जेव्हा केंद्राकडे येते तेव्हा एकत्वाची अनुभूती होते व परमकल्याण आणि दयेचा उदय होतो.
केंद्र व परीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:15 AM