शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

आज भारत पुन्हा चंद्राच्या दिशेने झेप घेतो आहे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 11:17 AM

या मोहिमेची मुख्य उद्दिष्टं चंद्रावर सुरक्षितपणे पोहोचणं, तिथं वैज्ञानिक उपकरणं काही काळ सुसज्ज ठेवणं आणि तिथं काही वैज्ञानिक प्रयोग करणं; ही आहेत.

माणसाला पूर्वीपासूनच पृथ्वीपलीकडच्या जगाविषयी विलक्षण कुतूहल आहे. चंद्राविषयी आपल्या सगळ्यांनाच खूप आकर्षण असतं. विज्ञान-तंत्रज्ञान या अंगांनीसुद्धा चंद्राविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.  काव्यात्मक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टिकोनांमधून चंद्र महत्त्वाचा! या पार्श्वभूमीवर चंद्रयान-३ या भारताच्या नव्या चंद्र मोहिमेविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. 

चंद्रयान मोहिमेचं महत्त्व काय? चंद्राच्या पृष्ठभागावर अपघात होऊ न देता यशस्वीपणे यान उतरवण्याची  अवघड कामगिरी आजवर फक्त सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच करून दाखवलेली आहे.  ही कामगिरी करून दाखवणारा चौथा देश म्हणून आपली ओळख निर्माण करण्याची भारताची धडपड सुरू आहे.  चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण होऊन भारताच्या पदरी अपयश आलं. यामुळे नाऊमेद न होता नव्यानं प्रयत्न केला जात आहे. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान चंद्राभोवतीच्या कक्षेच्या दोन किलोमीटरपर्यंत तेव्हाचं यान पोहोचलं होतं; पण त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचा मार्ग बदलला आणि चंद्रावर अलगदपणे न उतरता ते तिथे जोराने आदळलं.  मोहीम अपयशी ठरली. चंद्रयान-३ साठी आज, १४ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमाराला यान चंद्राकडे झेपावणार आहे. यासाठी मध्यम क्षमतेच्या एलव्हीएम-थ्री रॉकेटची मदत घेतली जाणार आहे.  हे काम अर्थातच इस्रोकडून केलं जाणार आहे.

१९६९ मध्ये इस्रोची स्थापना होण्यापूर्वीच १९६३ मध्ये भारतानं चंद्रासंबंधीची मोहीम हाती घेतली होती. गेल्याच महिन्यामध्ये भारतानं नासाबरोबर अंतराळ संशोधनासंबंधीचा शांतता करार केलेला आहे. म्हणजेच या संशोधनाचा उपयोग फक्त उपकारक कामांसाठीच केला जाईल. चंद्रयान-३ मुळे भारताला चंद्रासंबंधीच्या अनेक गोष्टी समजतील; तसंच पुढच्या चंद्र मोहिमांसाठीसुद्धा याची बरीच मदत होईल. या मोहिमेची मुख्य उद्दिष्टं चंद्रावर सुरक्षितपणे पोहोचणं, तिथे वैज्ञानिक उपकरणं काही काळ सुसज्ज ठेवणं आणि तिथे काही वैज्ञानिक प्रयोग करणं; ही आहेत.  चंद्राच्या पृष्ठभागाच्या साधारण १०० किलोमीटर परिसरात पोहोचल्यानंतर चंद्रयानामधले दोन भाग सुटे होतील आणि चंद्रावरच राहणारा भाग चंद्रावर अलगदपणे उतरण्यासाठी सज्ज होईल. इस्रोच्या म्हणण्यानुसार यासाठी अत्यंत आधुनिक प्रकारचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे. यामध्ये चंद्रावर अलगदपणे उतरण्याची व्यवस्था आहे.  तसंच वाटेत येणारे अडथळे टाळणं आणि त्यापासून आपल्याला इजा होऊ न देणं अशी व्यवस्था या यानामध्ये असेल.  चंद्रावर नेमकी कशी परिस्थिती असेल यासाठीच्या अनेक चाचण्या इस्रोनं घेतल्या आहेत.

उदाहरणार्थ चंद्रावरच्या अति शीतल वातावरणासारखं वातावरण कृत्रिमरीत्या निर्माण करणं; तसंच चंद्राच्या पृष्ठभागासारख्या पृष्ठभागावर यान उतरवल्यानंतर नेमकं काय होईल; यासंबंधीचे प्रयोग अशा गोष्टी इस्रोनं तपासल्या आहेत. चंद्रयान-३ यंत्रणेचे तीन मुख्य भाग आहेत. पहिला रोव्हर, दुसरा लँडर आणि तिसरा प्रपोल्शन इंजिन.  रोव्हर यंत्रणा चंद्राच्या पृष्ठभागाचा अंदाज घेणं, त्याची वैज्ञानिक मोजमापं करणं, पृष्ठभाग तपासणं अशा सगळ्या गोष्टी करेल. पृथ्वीकडे ही माहिती पाठवण्यासाठी  लँडरचा वापर होईल. प्रपोल्शन इंजिन अर्थातच यानाला गती देण्यासाठी वापरलं जाईल. चंद्रावर बर्फ आढळतो हे शोधून काढणं हे चंद्रयान-१ मोहिमेचं सगळ्यात मोठं यश मानलं जातं.  त्यानंतर २०१९ मध्ये चंद्रयान-२ मोहीम राबवण्यात आली.  या मोहिमेदरम्यान आलेल्या अपयशातून शिकलेले धडे चंद्रयान-३ मोहिमेत कामाला येतील; असं या मोहिमेशी संबंधित असलेले तज्ज्ञ म्हणतात. याचं एक ठळक उदाहरण म्हणजे चंद्रयान-३ मोहिमेमध्ये ऑर्बिटर ही यंत्रणाच नाही.  ती आधी वापरली जात असे.

दुसरं म्हणजे चंद्रयान-२ मध्ये चंद्राच्या पृष्ठभागाच्या परीक्षणासाठी तब्बल नऊ वेगवेगळी वैज्ञानिक उपकरणं बसवण्यात आली होती; पण चंद्रयान-३ मध्ये मात्र यासाठी केवळ एकच उपकरण आहे. यामुळे चंद्रयान-३ मधली तांत्रिक क्लिष्टता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. चंद्रयान-२ च्या मानानं चंद्रयान-३ मध्ये आपल्या मार्गात येत असलेले संभाव्य अडथळे हुडकणं आणि त्यांच्यावर तातडीनं मार्ग काढणं यासाठीची यंत्रणाही  अद्ययावत आहे. भारताच्या वैज्ञानिक तसंच अवकाशासंबंधीच्या प्रगतीसाठी चंद्रयान-३ मोहिमचं महत्त्व म्हणूनच खूप जास्त आहे. साहजिकच या मोहिमेकडे आपल्या सगळ्यांचंच नव्हे तर अख्ख्या जगाचं लक्ष लागून राहणं स्वाभाविकच आहे!

अतुल कहाते, माहिती तंत्रज्ञान अभ्यासक akahate@gmail.com

टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रो