शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

स्वत:पासून बदल हीच क्रांती!

By admin | Published: August 09, 2015 1:31 AM

वैद्यकीय क्षेत्र बदनाम होते आहे. त्या क्षेत्रात काम करू पाहणारी मुलेच काहीतरी चांगले काम करतील, म्हणून मी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. आजदेखील वैशंपायन स्मृती वैद्यकीय

- राजा माने

वैद्यकीय क्षेत्र बदनाम होते आहे. त्या क्षेत्रात काम करू पाहणारी मुलेच काहीतरी चांगले काम करतील, म्हणून मी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. आजदेखील वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांनी कार्यक्रम घेतलेला आहे. त्यांच्याशी हितगुज करण्यात मला आनंद वाटतो. ही मुलेच चांगले बदल घडवून आणू शकतात, असे डॉ. आमटे म्हणाले.आॅगस्ट क्रांती दिनाचा संदर्भ देऊन आपण काही बोलावे, असे सांगताच ते म्हणाले की क्रांती म्हणजे तरी काय हो़ स्वत:मध्ये बदल करणे ही क्रांती. ही माझी साधी-सोपी क्रांतीची व्याख्या आहे. काही सांगण्याचा आमचा पिंड नाही. आम्ही साधी माणसं आहोत. आदिवासींसाठी मनापासून काम करीत राहिलो. तुम्ही लोकांनी (माध्यमांनी) प्रसिद्धी दिली. प्रसिद्धीमुळे जाईल तिथे लोकांना आम्ही बोलावे, असे वाटते़ पण न बोलण्याचा अधिकारही आम्हाला द्या, असे हसत हसत बोलते झाले. त्यांच्यासमवेत असलेल्या त्यांच्या पत्नी मंदाकिनीताईही केवळ स्मितहास्यानेच डॉ. आमटे यांच्या प्रत्येक वाक्याला सहमती देत होत्या.मंदाकिनी आमटे यांच्यासोबत सोलापूर भेटीवर आलेल्या डॉ. आमटे यांच्याशी बोलण्याचा योग आला. ‘मार्गदर्शन’ आणि ‘संदेश’ हे शब्द आपल्याला आवडत नसल्याचे ते मिश्कीलपणे म्हणाले. मार्गदर्शन करण्यासारखी परिस्थिती नाही; कारण मार्गदर्शन करू ते त्या मार्गावरून चालतीलच याची खात्री नाही, असे आपल्या खास शैलीत हास्यासह ते बोलते झाले.(लेखक ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत़)