- उमेश शर्मा, सीएअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सीबीआयसीने १४ नोव्हेंबर २०१९ रोजी नवीन अधिसूचना जारी केली आहे, त्याबद्दल काय?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, सरकारने जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९ सीच्या सरलीकरणाची प्रतीक्षा संपवली आहे. जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९ सी फॉर्म दाखल करण्याची शेवटची २0१७-१८ साठी तारीख ३१ डिसेंबर २०२९ करण्यात आली आहे़अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ च्या फॉर्म जीएसटीआर-९ मध्ये बाह्य पुरवठ्याशी संबंधित काय बदल करण्यात आले?कृष्ण : अर्जुना, आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ च्या जीएसटीआर-९ मध्ये असे बदल आहेत :१. करपात्र बाह्य पुरवठा : आता करदात्यांना करपात्र बाह्य पुरवठा नेट आॅफ क्रेडिट नोट आणि डेबिट नोट नोंदविण्याचा पर्याय दिला आहे. करपात्र बाह्य पुरवठा तक्ता ४ बी ते ४ इ मध्ये दुरुस्तीचा अहवाल देता येईल़२. बाह्य पुरवठा ज्यावर देय नाही : आता तक्ता ५ अ आणि ५ एफ मध्ये बाह्य पुरवठा नेट आॅफ डेबिट आणि क्रेडिट नोटद्वारे नोंदविण्याचा पर्याय दिला आहे.३. करदाते तपशील प्रदान करू शकतात़अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ च्या फॉर्म जीएसटीआर-९ मध्ये आवक पुरवठ्याशी संबंधित काय बदल करण्यात आले?कृष्ण : अर्जुना, २0१७-१८ आणि २0१८-१९ च्या फॉर्म जीएसटीआर-९ मध्ये आवक पुरवठ्याचे बदल़१. आवक पुरवठा : तक्ता ६ सी आणि ६ डी मधील आयटीसी तक्ता ६ डी मध्ये नोंदविता येईल़२. वस्तूंची आयात : संपूर्ण आयटीसी ‘इनपूट’ पंक्तीत नोंदविण्याचा पर्याय करदात्यांना दिला आहे.३. आयटीसीच्या रिव्हर्सलचे तपशील : ट्रान्स १; हे तक्ता ७ एफ आणि ट्रान्स २; हे तक्ता ७ जीचे रिव्हर्सल नोंदविणे अनिवार्य आहे.४. जीएसटीआर २ ए : आर्थिक वर्ष २0१८-१९ साठी १ नोव्हेंबर २0१९ रोजी तयार केलेला फॉर्म जीएसटीआर २ ए हा स्वयंचलित नोंदणीकृत झाला पाहिजे. आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ मध्ये नोंदणीकृत व्यक्तीकडे जीएसटीआर फॉर्म सी; सीए प्रमाणपत्राशिवायद्ध पीडीएफ स्वरूपात तक्ता ८ ए ते तक्ता ८ डी मध्ये स्वाक्षरी केलेल्या नोंदणीसाठी तपशील अपलोड करू शकतात़५. मागील वर्षाचे व्यवहार त्यानंतरच्या आर्थिक वर्षात नोंदविले गेले : करदात्यांना तक्ता १२ मध्ये मागील वर्षाच्या रिव्हर्सलची माहिती न देण्याचा पर्याय दिला आहे.अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ फार्म जीएसटीआर-९सी मध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत?कृष्ण : अर्जुना, २0१७-१८ आणि २0१८-१९ साठीचे जीएसटीआर-९ सी मध्ये झालेले बदल खालीलप्रमाणे :१. करदात्यास तक्ता ५ बी ते तक्ता ५ एनमध्ये कोणताही डेटा न भरण्याचा पर्याय आहे.२. चालू आणि पुढील वर्षात पूर्वीच्या वर्षातील बुक केलेल्या आयटीसीचा दावा केला असेल तर त्याची माहिती करदात्यांना पुरवण्याची गरज नाही.३. करदात्यास आयटीसीचा खर्च तक्ता १४ मध्ये न पुरवण्याचा पर्याय दिला आहे.अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, फॉर्मच्या सरलीकरणामुळे करदात्यांना सुलभता आली आहे. आता करदात्यांनी जीएसटी वार्षिक परतावा व लेखापरीक्षण अहवाल वेळेवर दाखल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेत मुदतवाढ करण्यात आली आहे आणि फॉर्मसुद्धा सोपा करण्यात आला आहे तर करदात्यांनी रिटर्न वेळेवर भरण्याचा प्रयत्न करावा.
‘जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९सी मधील बदल’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 4:00 AM