शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

‘छिंदम’ (का) आवडे सर्वांना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 5:23 AM

समाजकारणाला पुन्हा एकदा तणावाची फोडणी दिली. छत्रपती शिवरायांबद्दल त्याने जी बेताल विधाने केली त्यामुळे महाराष्टÑ संतापला आहे. हा जनक्षोभ भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

अहमदनगरच्या श्रीपाद छिंदमने महाराष्टÑाच्या समाजकारणाला पुन्हा एकदा तणावाची फोडणी दिली. छत्रपती शिवरायांबद्दल त्याने जी बेताल विधाने केली त्यामुळे महाराष्टÑ संतापला आहे. हा जनक्षोभ भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्याच्या वाचाळपणामुळे भाजपची आणि राष्टÑीय स्वयंसेवक संघाचीही वाचा बसून ते उघडे पडले आहेत.मुळात ‘छिंदम’ ही कुठलीही एक व्यक्ती नाही, ही विकृती आहे. ती एका दिवसात जन्माला आलेली नाही. काही संघटनांनी व पक्षांनी आपले घोडे पुढे दामटण्यासाठी इतिहासाची ज्या पद्धतीने मोडतोड केली त्यातून जात-धर्म-महापुरुष यांच्याबाबत विद्वेषाचे विष पसरले. संघाने या विषाला कायम खतपाणीच घातले. जेम्स लेन महाराष्टÑात येऊन शिवरायांची बदनामी करून गेला. त्याला सगळे कुचाळखोर संदर्भ पुरविणारे मेंदू महाराष्टÑातील होते. त्यामुळे दोष एकटा छिंदमचा नाही. नगरच्या छिंदमचा दुसराही एक दृश्य चेहरा आहे. बळजबरीने भूखंड खाली करणे, धमकावणे, विनयभंग अशाप्रकारचे गंभीर गुन्हे तो व त्याच्या भावावर दाखल होते. तरीही या मंडळींना राजकारणात पावन करून घेण्यात आले. भाजपच्या खासदारांनी तर त्याचा खास सन्मान करीत उपमहापौरपद दिले. आता भाजप व संघावरही इज्जत वाचविण्याची वेळ आली. छिंदम मूळचा संघाचा नाही, असे भलेही भाजप व संघ आता म्हणेल. पण, त्याची व त्याच्या भावाची पार्श्वभूमी आम्हाला माहिती नव्हती, असे त्यांना म्हणता येणार नाही.असे छिंदम आता सगळ्याच राजकीय पक्षांना हवे आहेत. आजचे राजकारण हे बहुमताचे व पैशाचे आहे. वारेमाप पैसा उधळून येनकेनप्रकारेण निवडून येणारे लोक पक्षांना लागतात. नगर महानगरपालिकेची निवडणूक यावर्षी होऊ घातली आहे. त्यासाठी ‘लक्षाधीश’ उमेदवारांची चाचपणी राजकीय पक्षांनी आतापासून सुरू केली आहे. नगरचे काही नेते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांचे ‘प्री-इलेक्शन’ बजेटच काही कोटींचे आहे. या ‘श्रीमंत’ राजकारणाची ‘छिंदम’ ही गरज आहे. डोक्यात कुठलेही शहाणपण, तार्किक विचार न ठेवता केवळ ‘जिंदाबाद’ म्हणणारे कार्यकर्तेच पक्षांना हवे आहेत. ‘केडर’बेस कार्यकर्ता घडविण्याची प्रक्रियाच आता थांबली आहे. विधिमंडळातील ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख एस.टी. बसने प्रवास करीत असल्याचे एक छायाचित्र मध्यंतरी समाजमाध्यमांत व्हायरल झाले. छिंदम आणि त्याच्या नेत्यांना असे ‘गणपतराव’ होणे आता मंजूर नाही.छिंदमने जी चूक केली, त्यात त्याच्या समाजाचा काहीही दोष नाही. मात्र, त्याची जात शोधली जात आहे. त्याला शिव्याशाप देणाºया काही ‘क्लिप’ व्हायरल झाल्या. यात काही ठिकाणी महिलांबद्दल अपशब्द आहेत. तेही अयोग्य आहे. शिवरायांनाच हे मंजूर नव्हते. छत्रपतींनी स्त्रीचा सातत्याने आदर केला. त्या तत्त्वालाच यातून बाधा येते. छिंदमला कायद्याने शिक्षा होईल. त्यासाठी कायदा हातात घेणे योग्य ठरत नाही.- सुधीर लंके

sudhir.lanke@lokmat.com