- धर्मराज हल्लाळेदेशभरात राष्ट्रवाद, सर्जिकल स्ट्राईक, राफेलसारख्या विषयांवर निवडणूक प्रचार केंद्रित झाला. मात्र तेलंगणातील निजामाबादमध्ये शेती आणि हमीभाव हाच मुद्दा प्रचारात वरचढ ठरला. ज्यामुळे तेलंगणा राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविता यांना निजामाबाद मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा करणाºया सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीला हा मोठा धक्का आहे़ त्याहीपेक्षा शेतकऱ्यांनी ठाम राजकीय भूमिका घेऊन सत्ताधाºयांना शेती प्रश्नावर कोंडीत पकडले, ही बाब दिशा देणारी आहे़रयतू बंधू अर्थात शेतकरी मित्र ही योजना आणून वर्षामध्ये दोन वेळा प्रत्येक शेतकºयाला ४ हजारप्रमाणे एकूण ८ हजार रूपये बी-बियाणे व खते खरेदीसाठी देण्यात आले़ केंद्र सरकारच्या आधी राबविलेली योजना देशभर चर्चेत राहिली़ ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत टीआरएस ६३ जागांवरून ८८ जागांवर पोहोचली़ २०१४ च्या निवडणुकीत १७ पैकी ११ मतदारसंघात टीआरएस खासदार निवडून आले. मात्र २०१९ च्या लढाईत टीआरएसचे संख्याबळ घटून ९ वर आले़।निजामाबादचे उदाहरणदेशभरात लाटेनंतर आलेली दुसरीसुप्त लाट ही चर्चा अनेक दिवसहोत राहील़ जय-पराजयाची अनंत कारणे सांगितली जातील़ परंतु, शेतकºयांनी भूमिका घेऊन एखाद्या मतदारसंघात तेथील मुख्यमंत्र्यालाच आव्हान देऊन सत्ता उलथवून टाकल्याचे निजामाबादचे उदाहरण इतिहासात नोंदविले जाईल़>अत्यंत प्रतिष्ठेच्या निजामाबादमधील लढाईत मुख्यमंत्र्यांची कन्या कविता पराभूत झाली़ तिथे १८५ उमेदवार रिंगणात होते़ त्यापैकी १७८ शेतकरी होते़एकीकडे रयतू बंधू योजना साकारणाºया टीआरएसला मोठ्या संख्येने असलेल्या हळदी उत्पादक शेतकºयांना दिलासा देता आला नाही़ अशावेळी शेतकºयांनी राज्यात प्रभाव असलेल्या टीआरएसला केवळ जाब विचारला नाही तर राजकीय भूमिका घेतली़ हजारावर शेतकºयांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़ त्यातील १७८ शेतकरी शेवटपर्यंत रिंगणात राहिले़ तर अन्य पक्ष मिळून एकूण उमेदवारांची संख्या १८५ होती़केवळ शेतकरी असलेल्या १७८ उमेदवारांनी ९८ हजार ७३१ मते घेतली़ ज्यामुळे टीआरएसच्या कल्वाकुंतला कविता ७० हजार ८७५ मतांनी पराभूत झाल्या़ तिथे पहिल्यांदाच भाजपाचे अरविंद धर्मापुरी निवडून आले़विशेष म्हणजे २०१४ च्या मोदी लाटेच्या निवडणुकीत कविता १ लाख ६७ हजार १८४ इतके मताधिक्य घेऊन निवडून आल्या होत्या़
तेलंगणात शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 3:55 AM