शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
3
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
4
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
6
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
7
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
8
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
9
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
11
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
12
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
13
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
14
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
15
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
16
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
17
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
18
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
19
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
20
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात

चिनी हॅकर्सनी उडवली अमेरिकेची झोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 9:02 AM

संपूर्ण जग आज त्याचा अनुभव घेत आहे.

जमीन, पाणी आणि आकाश.. या सर्वच ठिकाणी आपलीच सत्ता असावी, संपूर्ण जगावर आपलंच अधिराज्य असावं, या हव्यासानं चीनला अगदी पछाडलं आहे. त्यामुळेच या तिन्ही ठिकाणी आपले हातपाय पसरताना सगळाच विधिनिषेध चीननं गुंडाळून ठेवला आहे. त्यासाठी कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळायलाही त्यांनी कमी केलेलं नाही. सगळ्याच ठिकाणी आपला हक्क दाखवताना ‘माझं ते माझंच, पण तुझं तेही माझंच’ अशी हडेलहप्ती त्यांनी सुरू केली आहे.

संपूर्ण जग आज त्याचा अनुभव घेत आहे. चीननं आजवर अनेक ठिकाणी इतर देशांच्या जमिनीवर आक्रमण करून तो भाग बळकावला, समुद्राच्या पाण्यावर आणि हद्दीवरही आपल्याच सीमारेषा आखायला सुरुवात केली. त्या प्रत्येक ठिकाणी इतरांना न जुमानता त्यांनी आपले सवतेसुभे तिथे उभे केले. जमीन आणि पाण्यावर तर त्यांनी आक्रमण करून तो प्रदेश बळकावलाच, पण हे कमी म्हणून की काय, अवकाशातही त्यांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. 

‘बसमध्ये ज्या सीटवर रुमाल टाकला, ती जागा माझी’ या न्यायानं त्यांनी आता अंतराळातही घुसखोरी सुरू केली आहे. सर्वांत आधी आपण अंतराळात गेलो आणि तिथे आपले ‘रुमाल’ टाकून ठेवले तर ती जागाही कायमची आपलीच होईल, या ‘दूरदृष्टीनं’ आपल्या अंतराळ माेहिमा त्यांनी अलीकडच्या काळात प्रचंड वाढवल्या आहेत. 

चीनचा सर्वांत मोठा स्पर्धक आहे अमेरिका. त्यामुळे प्रत्येक बाबतीत अमेरिकेला कसं मागे टाकता येईल, त्यांच्या पुढे जाताना त्यांच्यावर कसं वर्चस्व गाजवता येईल, यासाठी चीनचा आटापिटा चालला आहे. अमेरिका त्यांचं प्रमुख लक्ष्य असलं तरी इतर देशांकडेही त्यांचं लक्ष आहे आणि जगातल्या जणू सर्वच मोठ्या राष्ट्रांवर त्यांनी आपली जासुसी सुरू केली आहे. त्यासाठी सॅटेलाइटचाही उपयोग केला जात आहे. 

अलीकडेच चीननं आपल्या गुप्तहेरांचं जाळं आणखी लांबवलं असून, त्यासाठी त्यांनी आता आपल्या ताफ्यात ‘हॅकर्स’चीच भरती केली आहे. देशोदेशीची गुप्त, संवेदनशील माहिती मिळवायची, ती करप्ट करायची किंवा नष्ट करायची.. असे उद्योग त्यांनी चालवले आहेत. चिनी हॅकर्सनं आता अमेरिकन दूरसंचार कंपन्यांना आपलं लक्ष्य बनवलं असून, अमेरिकेच्या अनेक दूरसंचार कंपन्यांची गुप्त माहिती त्यांनी हातोहात लांबवली आहे. यामुळे अमेरिकाही हादरली आहे. या माहितीचा उपयोग चीन कसा करतो याची त्यांना चिंता लागून राहिली आहे. अमेरिकेच्या अनेक संवेदनशील स्थळांची इत्यंभूत माहिती तर त्यांच्याकडे आहेच, शिवाय तिथपर्यंत कसं पोहोचायचं, त्यासाठी कोणते ‘मार्ग’ अवलंबायचे यासाठीची त्यांची तयारीही पूर्ण झाली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे, पण अमेरिकेलाही त्याची खबर लागली नाही. जेव्हा अमेरिकेला हे कळलं, तोपर्यंत अनेक प्रकारची गुप्त माहिती चीनच्या हाती गेलेली होती. अमेरिकेनं आपली सायबर सुरक्षा आणखी कडक करायला सुरुवात केली असली तरी नेमकी कोणती माहिती चीनच्या हॅकर्सनी लांबवली आहे, या भीतीनं त्यांच्या पोटात गोळा आला आहे. अमेरिकन तज्ज्ञांच्या मते, या हॅकर्सनी अमेरिकेच्या अनेक दूरसंचार कंपन्यांच्या वायरटेप वॉरंट रिक्वेस्टचा ॲक्सेस मिळवला आहे. अमेरिकेच्या बड्या ब्रॉडबँड कंपन्या आणि इंटरनेट सर्व्हिसला त्यांनी आपला निशाणा बनवलं आहे. त्यात एटी ॲण्ड टी, वेरोजिन, लूमेन यासारख्या बड्या नावांचाही समावेश आहे. 

चीननं मात्र या साऱ्या प्रकाराबाबत कानावर हात ठेवले आहेत. याच्याशी आमचा काहीही संबंध नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेनं तेथील चिनी दूतावासाला याबाबत विचारणा केली तर त्यांनीही याविषयी अनभिज्ञता दर्शवली. तज्ज्ञांच्या मते मात्र अमेरिकेची खूप मोठी माहिती चोरीला गेली आहे. अमेरिकन दूरसंचार उद्योग हा तेथील इंटरनेट आणि स्मार्टफोनचा कणा आहे. तोच तोडायचा चीनचा इरादा आहे. यामागे आणखीही एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. चीननं समजा तैवानमध्ये आपलं सैन्य घुसवलंच, तर अमेरिकेनं तिथे लुडबुड करू नये. समजा त्यांनी काही आडकाठी केलीच तर चोख प्रत्युत्तर देता यावं यासाठीच मुख्यत्वे हा डाव आखला गेला, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

एफबीआयला लक्ष्य हे ध्येय

चिनी हॅकर्सनं अमेरिकन ट्रान्सपोर्टेशन आणि कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. अमेरिकन एफबीआयचे संचालक ख्रिस्तोफर रे यांचं तर म्हणणं आहे, चीनने भले कानावर हात ठेवले असतील, पण हे हॅकर्स चीनचे ‘पगारी’ कर्मचारी आहेत. एफबीआयच्या अनेक लोकांना लक्ष्य बनवणं हेही त्यांचं ध्येय आहे. या हॅकर्सचा त्वरित बंदोबस्त केला नाही, तर अमेरिकेला ते खूपच महागात पडेल.

 

 

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीAmericaअमेरिकाchinaचीन