शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या रुपाचं थैमान, ख्रिसमस रद्द आणि लोकांच्या वाट्याला कठोर घरबंदी

By meghana.dhoke | Published: December 22, 2020 12:46 PM

ख्रिसमसचा सण ऐन तोंडावर असताना लंडनसह सगळ्या देशभरावरच निराशेचं सावट दाटून आलं आहे. आता सगळ्यांसमोर एकच प्रश्न आहे - ‘विल धिस नाइटमेअर एव्हर एण्ड?’

ठळक मुद्देइंग्लंडचा ख्रिसमस रद्द, अटळ घरबंदीचं दु:ख.

‘विल धिस नाइटमेअर एव्हर एण्ड?’ असा ठळक मथळा देत लंडनच्या ‘मेल’ या वृत्तपत्रानं इंग्लंडवासीयांची वेदनाच मांडली आहे. २०२० नावाचं दु:स्वप्न वाटावं असं हे वर्ष आता संपणार आणि निरोप घेणार म्हणून इंग्लंड उत्साहात ख्रिसमस साजरा करण्याच्या तयारीत होता. त्याच काळात इंग्लंडच्या पंतप्रधानांना तिथले आरोग्यतज्ज्ञ सांगत होते की, कोरोना आपलं रंगरूप बदलतो आहे, लवकरच काहीतरी प्रतिबंधात्मक उपाय करावे लागतील. मात्र, अगदी तीन दिवसांपूर्वीपर्यंत पंतप्रधान बोरीस जॉन्सन कोणतेही ‘कठोर’ उपाय करण्याच्या मन:स्थितीत नाहीत असं चित्र होतं. पहिल्या लॉकडाऊनमध्ये बसलेल्या आर्थिक फटक्याने अजून देश सावरलेला नसताना कोरोनाच्या नव्या लाटेमुळे कठोर लॉकडाऊन करणं फार सोयीचं नाही असंच चित्र होतं. मात्र, शनिवारी पंतप्रधान जॉन्सन यांनी अचानक जाहीर केलं की ‘ख्रिसमस इज कॅन्सल्ड.. यंदा देशात ख्रिसमस साजरा होणार नाही!’ त्यातही दक्षिण पूर्व लंडन आणि पूर्व लंडन या ‘टीअर ४’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात तर त्यांनी अत्यंत कठोर निर्बंध जाहीर केले आहेत. या भागात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं हा लॉकडाऊन आपण अनिच्छेने जाहीर करीत आहोत, ख्रिसमस साजरा न करता घरातच बसून राहणं हा ‘त्याग’ आपल्याला करावाच लागेल, असं त्यांनी जाहीर केलं.

ख्रिसमसच्या तयारीत मग्न, सुटीचा मूड असलेल्यांना आपण काय ऐकतोय हेच कळेना अशी एकूण प्रतिक्रिया माध्यमात झळकली. दोन कोटी माणसांचा पराकोटीचा संताप झाला की ऐन ख्रिसमसच्या तोंडावर सरकार आपल्याला घरात कोंडतं आहे आणि नेमकं देशात काय घडतंय, हेही नीट सांगायला तयार नाही. ब्रिटनमधल्या सर्व नामांकित वृत्तपत्रांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. देशात लोक प्रचंड संतापले आहेत आणि सरकारला त्याची जाणीवही नाही असं ही माध्यमं म्हणतात. माध्यमांनी या लॉकडाऊनचं वर्णन ‘नाइटमेअर बिफोर ख्रिसमस’ असं केलं आहे. द डेली स्टार या वृत्तपत्रानं तर सरकारला उघड धारेवर धरून म्हटलंय, ‘मतदारांचा आता पंतप्रधान जॉन्सन यांच्यावरच विश्वास उरलेला नाही, लोक त्यांनी सांगितलेले नियमही झुगारून देतील अशी शक्यता आहे.’ या नव्या लॉकडाऊनमुळे शेअर मार्केट नव्या वर्षीही अजून गर्तेत जाण्याची शक्यता आहे. शिवाय किरकोळ व्यापारात कोट्यवधी पाउंडस्‌चं नुकसान होईल, ते वेगळंच! कॅबिनेट ऑफिस मंत्री मिशेल गोव्ह स्वत: शेवटच्या क्षणी ख्रिसमस खरेदीला धावत गेल्याची छायाचित्रंही ‘द मेल’ने प्रसिद्ध केली आहेत. मंत्र्याची ही अवस्था असेल तर सामान्य माणसांची काय गत झाली असेल असा सवाल माध्यमं करीत आहेत. माणसं सैरभैर झाली आहेत. घरबंदी अटळ झालेल्या ब्रिटिश नागरिकांचा ख्रिसमसही कोमेजून गेला आहे. त्यात या नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा फैलाव वेगात होत असून, आता कोरोनावर आलेली लस या विषाणूवर काम करील की नाही, अशीही शंका आहे.

मुळात सरकारनं इतकी कठोर पावलं का उचलली?- पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी जाहीर सांगितलं की, कोरोनाचं एक नवंच रूप -स्ट्रेन इंग्लंडमध्ये दिसतं आहे. रूप पालटून आलेल्या या विषाणूचं नाव VUi202012/01 आहे. हा विषाणू पहिल्यांदा जगात इंग्लंडमध्येच आढळला आणि गेल्या आठवड्यातच त्यानं बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. कोविड-१९ पेक्षा हा विषाणू ७० टक्के जास्त संसर्गजन्य आहे. त्याचा फैलाव वेगात होतो. काहीच कृती केली नाही तर हा संसर्ग वाढेल, दवाखाने रुग्णांची गर्दी पेलू शकणार नाहीत, अजून काही हजारो माणसांचा जीव जाऊ शकतो, अशी भाकीतं वर्तविली जात आहेत. ‘यंदाचा ख्रिसमस वेगळा असेल, यंदा आपल्या जिवलगांना भेटता येणार नाही; पण त्यांचा जीव वाचावा, पुढच्या ख्रिसमसला त्यांना भेटता यावं म्हणून हा त्याग करावा लागेल! ‘विथ हेवी हार्ट’- अतिशय जड अंत:करणाने मी हे सांगतोय’- असं पंतप्रधान लोकांना वारंवार सांगत आहेत.

नव्या लॉकडाऊनमध्ये टीअर ४ साठीच्या अटीही कठोर आहेत. रविवारपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. ‘घरीच राहा’ असा कठोर संदेश आहे. कुणीही कुणाच्याही घरी मुक्कामाला जायचं नाही. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकानं बदं करण्यात आली आहेत. जीम, सिनेमा हॉल्स, बॉलिंग ॲलीज, कॅसिनो बंद करण्यात आले आहेत. घराबाहेर एका व्यक्तीला फक्त एकाच माणसाला एकावेळी भेटायची परवानगी आहे. आजारी माणसांनी, वृद्धांनी घराबाहेर जायचं नाही. सुटीसाठी बाहेर जायचं नाही.

ख्रिसमसचा सण ऐन तोंडावर असताना लंडनसह सगळ्या देशभरावरच निराशेचं सावट दाटून आलं आहे. आता सगळ्यांसमोर एकच प्रश्न आहे - ‘विल धिस नाइटमेअर एव्हर एण्ड?’

तरुण घरात बसतील का?

ज्या भागात टीअर ४ श्रेणीचं लॉकडाऊन जाहीर झालं, त्या भागात तरुणांची संख्या इंग्लंडमध्ये सर्वाधिक आहे. ही तरुण मुलं ऐन ख्रिसमसच्या काळात घरात कोंडून घातली तर ती ऐकतील का? घरात बसतील का? असे प्रश्न आहेतच. सध्या सरकारवर हा तरुण वर्ग प्रचंड नाराज झालेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंड