शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

सिबिल लावताय? आधी शेतीचा धंदा फायद्याचा तर होऊ द्या!

By राजेश शेगोकार | Published: October 12, 2022 10:04 AM

केवळ सिबिलची सक्तीच नव्हे, शेती व्यवसायावर आयकरही लावावा; पण त्याआधी शेती व्यवसायामध्ये भांडवल, गुंतवणूक व नफा येऊ द्या !

- राजेश शेगोकार, उपवृत्तसंपादक लोकमत, अकोला

शेतीसंदर्भातील सरकारी धोरणांच्या अपयशाचा परिपाक म्हणजे शेतकरी आत्महत्या ! खर्च अन् उत्पन्न यामधील तफावतीमुळे शेतीकडे वळण्यास युवक इच्छुक नाहीत. त्याचा फायदा राजकीय पक्ष घेत आहेत. भावनिक मुद्दे समोर करून युवकांची ऊर्जा भलत्या कामांसाठी वापरली जाताना दिसत आहे. त्यामुळेच पीक कर्जाच्या मंजुरीसाठी सिबिलची लावलेली अट सध्या राज्यभरातच गांभीर्याने घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

‘डोळे मिटायच्या आधी मला शेतकरी कर्जमुक्त झालेला पाहायचा आहे’, असे शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी म्हणायचे. त्यांनी सांगितलेल्या कर्जमुक्तीला अर्थशास्त्रीय सिद्धांतांची व व्यवहार्यतेची जोड होती. शेती कर्जमुक्त होणे म्हणजे संपूर्ण सात-बारा कोरा होण्यासोबतच शेतमालाच्या भावांवरील आवश्यक वस्तू कायदा, एपीएमसी ॲक्ट यासारख्या किमती नियंत्रित करणाऱ्या असंख्य कायद्यातून शेतकऱ्यांना मोकळीक मिळणे हे त्यांना अभिप्रेत हाेते. 

कर्जमुक्ती, बाजारपेठा, तंत्रज्ञान, संरचना या गोष्टी शेतकरी सरकारकडून घेणे लागतो. त्या मिळाल्यावरच शेती व्यवसाय व्यवहार्य होईल व त्याला आर्थिक व्यवहाराच्या अटी लागू होऊ शकतील, अशी शेतकरी संघटनेची भूमिका हाेती; मात्र धाेरणकर्त्यांनी आपल्या साेयीने शेतीच्या प्रश्नांचे राजकारण केले. त्यातूनच शेतीची अधाेगती थांबता थांबत नाही.सध्या राज्यभरात खरिपाचा हंगाम काढणीला आला आहे. रब्बीची तयारी महिनाभरात सुरू हाेईल, त्यासाठी पीक कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सिबिलची माेठी आडकाठी झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार आता पीक कर्ज वा मध्यम तसेच दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी ‘सिबिल’चा अर्थातच ‘क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’चा निकष लागू करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर किमान ६०० ते ७००पर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांनाच बँका पीक कर्जाचे वाटप करत आहेत. सिबिलमुळे पीक कर्जाला आडकाठीच्या घटना कानावर येऊनही शेतकऱ्यांमध्ये फारशी हालचाल, सामूहिक असंतोष दिसत नाही. हे चित्र शेतीच्या प्रश्नांवरची गांभीर्यता संपली तर नाही ना, अशी अस्वस्थता निर्माण करते. 

खरेतर पीक कर्ज हे कर्ज नसून, उत्पादनासाठी दिलेली अग्रीम रक्कम आहे. त्यामुळे त्याला तशीही सिबिलची अट लागू करणे योग्य व नैतिक नाही; मात्र यानिमित्ताने शेती व्यवसायावर व शेती अर्थशास्त्रावर समग्र चिंतन हाेऊन युवा पिढीसमोर एक अर्थशास्त्रीय विचार पुढे येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा जागर करणाऱ्यांना कर्जमुक्तीच्या घाेषणांच्या पावसात शेतकऱ्यांचे अश्रू दिसले नाहीत. शेतमालाचे भाव नियंत्रित केले. त्यातून झालेल्या आर्थिक नुकसानामुळे कर्ज परत करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये येऊ दिली जात नाही. शेती व्यवसायातून व्यवहार्य उत्पादन खर्च निघून कर्ज परत करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये येते का, याचे चिंतन कुठेही हाेत नाही.शेतीमालाचे भाव पडतात. उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. ओला किंवा कोरडा दुष्काळ, वादळ, गारपीट अशा अनेक संकटांमुळे खासगी किंवा सहकारी बँकांची कर्जफेड वेळेत होत नाही. मग सिबिलचा स्काेअर चांगला येईल तरी कसा? त्यामुळे किमान पीक कर्ज व शेतीउद्योग कर्जांना सिबिलची अट नको. 

पीक कर्जासाठी सिबिलच्या अटीमुळे संबंधित शेतकऱ्याची कर्ज परतफेडीची मानसिकता तपासली जात आहे. खुशाल तपासा, हरकत नाही, पण जगाचा पोशिंदा, संपत्तीचा निर्माता करबुडवा, कर्जबुडवा आहे का? या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारीही राज्यकर्त्यांना घ्यावी लागेल. केवळ सिबिलची सक्तीच नव्हे, शेती व्यवसायावर आयकरही लावावा; पण त्याआधी शेतीमध्ये भांडवल, गुंतवणूक व नफा येऊ द्या! असे झाले नाही अन् केवळ अटी, शर्तीमध्ये शेतकऱ्यांची काेंडी झाली तर नजीकच्या काळात शेतीचे भविष्य अधिक धूसर हाेईल. सिबिलची अट ही त्याची पहिली पायरी ठरेल!

टॅग्स :Farmerशेतकरी