शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

थाळ्या-टाळ्या... आणि ऑक्सिजनच्या नळ्या!

By किरण अग्रवाल | Published: April 23, 2021 5:02 AM

तांत्रिक चुकीपायी रुग्ण दगावल्याचे पाहून ओकसाबोकशी रडणारे नाशिकच्या रुग्णालयातले डॉक्टर्स - हे दृश्य विदीर्ण करणारे होते!

- किरण  अग्रवाल, निवासी संपादक, लोकमत, नाशिकआपत्ती कोणतीही असो, ती धडा घालून देत असते वा काहीतरी शिकवून जातेच जाते. पण आपल्याकडे हल्ली हरेक आपत्तीचे भांडवल आणि त्या भांडवलातून मग राजकारण करण्याचा प्रघात रूढ झाला आहे.  नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना याला अपवाद नाही.  एकीकडे कोरोनाबाधितांना रुग्णालयातील ऑक्सिजन बेड‌्स उपलब्ध होत नसल्याची सार्वत्रिक ओरड असताना दुसरीकडे नाशकात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती होऊन तब्बल २४ रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ आली. या आपत्ती काळात मरण कसे स्वस्त होऊ पाहते आहे याचेच हे भयकारी चित्र !ही दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. रुग्णालयाच्या बाहेर गळती झाल्याने प्राणवायूचा पूर उफाळला असताना  आतले रुग्ण मात्र श्वासासाठी तडफडत गेले. विदीर्ण करणारी अशीच ही घटना. तिला कारणीभूत आहे ती व्यवस्थांची बेपर्वाई ! अवघ्या महिनाभरापूर्वीच बसविण्यात आलेल्या ऑक्सिजन टाकीत द्रवरूप प्राणवायू भरला जात असताना त्या टाकीच्या जोडणीमधून गळती होतेच कशी, गळती सुरू झाल्यानंतर ती रोखण्यासाठी दीड ते दोन तासांची यातायात करण्याची वेळ का यावी, यंत्रणेच्या नियमित तपासणीची काहीही व्यवस्था, निकष नसावेत का, असे अनेक प्रश्न यातून समोर आले आहेत. 

नाशकातील ज्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही दुर्घटना घडली ते महानगरपालिकेचे रुग्णालय पूर्णतः कोरोनाबाधितांसाठी वाहिलेले आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच तेथे ऑक्सिजन टाकीची उभारणी करण्यात आली आहे. या टाक्या स्वतः बसविण्याऐवजी महापालिका प्रशासनाने त्या भाड्याने घेतल्या आहेत, त्यामुळे त्यासंबंधीची हाताळणी करण्याचा ठेका, त्यातील अटी शर्ती आणि ठेकेदारीची गणिते यानिमित्ताने चर्चेत येऊन गेली आहेत. व्यवस्थेची हाताळणी ही जर ठेकेदाराची जबाबदारी असेल तर या गळतीची व त्यातून जीव गमावलेल्यांची जबाबदारी कोणाची?- या प्रश्नाचे उत्तर वेगळे शोधण्याची गरज नाही. राज्य शासनाने व महापालिकेनेही जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या आहेत, परंतु पैशाने संबंधितांचा जीव परत येणार नाही. झालेली हानी भरून निघणे शक्य नाही, त्यामुळे या संदर्भातील बेपर्वाईची सखोल चौकशी झाली पाहिजे!

सदर दुर्घटनेच्या निमित्ताने एकूणच आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करून आरोपांची राळ उडवणे सुरू झाले आहे. व्यवस्थेत काही दोष नक्कीच आहेत, साधनांची कमतरता जाणवते आहे हेदेखील खरे; परंतु म्हणून या क्षेत्रात काम करणाऱ्या सेवार्थींच्या परिश्रमांवर पाणी फेकणे हे आपल्याला शोभणारे नव्हे. कोरोना संसर्गाच्या धास्तीने जिथे रक्ताचे नाते असलेली हक्काची माणसे प्रत्यक्ष मदतीला न येता चार हात लांबूनच वावरतात, तिथे डॉक्टर्स, नर्सेस, वाॅर्डबॉय, मावश्या, रुग्णवाहिकांचे चालक  स्वतःचा जीव धोक्यात घालून अविरत सेवा बजावत आहेत. ज्या रुग्णालयात सदर दुर्घटना घडली तेथील डॉक्टर्स लिफ्ट बंद असताना ऑक्सिजनचे सिलिंडर्स आपल्या खांद्यावर घेऊन रुग्णांसाठी धावल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेले आहे. गेल्या वर्षभरापासून अविश्रांतपणे  आपले कर्तव्य बजावणारे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी यांना सध्या कोणत्या तणावातून जावे लागते आहे, याची कल्पनाही सामान्यांना करता येणार नाही. या डॉक्टरांना केवळ कोरोनायोद्धे म्हणून त्यांच्या हातात आपण सत्काराचे पुष्पगुच्छ देणार असू आणि त्यांचे रुग्ण ज्या नळीतून येणारा ऑक्सिजन श्वासात भरून मृत्यूशी  झगडा मांडून बसले आहेत, त्या नळ्याच  कोरड्या पडणार असतील, तर अख्खी व्यवस्था या डॉक्टरांची गुन्हेगार आहे असेच म्हणावे लागेल. भ्रष्टाचाराचा, बेपर्वाईचा, अनास्थेचा भुंगा लागलेली ही व्यवस्था अशीच खिळखिळी राहिली, तर डॉक्टरच काय खुद्द ईश्वरसुद्धा रुग्णांचे प्राण वाचवू शकणार नाही.

राज्य शासनाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल काय यायचा तो येईलच; परंतु वैद्यकीय तांत्रिक सज्जता व तज्ज्ञता याकडे  लक्ष देणे किती गरजेचे असते, हे या घटनेने स्पष्ट केले आहे. एका तांत्रिक चुकीपायी कोरोना संसर्गातून सावरणारे रुग्ण डोळ्यादेखत दगावल्याचे पाहून अक्षरशः ओकसाबोकशी रडणारे या रुग्णालयातले डॉक्टर्स आणि कर्मचारी ‘लोकमत’च्या सहकाऱ्यांनी पाहिले आहेत. हे दृश्य विदीर्ण करणारे होते. डॉक्टरांसाठी थाळ्या - टाळ्या वाजवू नका, त्यांना हवी ती साधनसामग्री मिळेल एवढे फक्त पाहिले तरी पुरे आहे!वायू गळतीची घटना हा अपघात होता हे मान्य ! पण प्रशासन त्यातून काही धडा घेणार का हे महत्त्वाचे ! नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात ही दुर्घटना घडली.  महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने, ऊठसूट राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांनाही आत्मपरीक्षणाची संधी आहे. ती त्यांनी गमावू नये.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळती