देशातील रेल्वेस्थानकांच्या स्वच्छतेबाबत क्वालिटी क ौन्सिलनेकेलेल्या सर्वेक्षणात वांद्रे टर्मिनसची लख्ख प्रगती दिसत असली, तरी घाणेरड्या स्थानक ांत आणखी वरचा क्रमांक पटक ावून क ल्याण स्थानक ाने तेथील गलिच्छ वातावरणात क शी भर पडली आहे, ते दाखवून दिले. प्रवाशांच्या मतांबरोबरच फ लाट, त्यावरील क चराकुंड्या, प्रतीक्षागृहे, मुख्य प्रवेशद्वारे, पार्किंगची जागा अशा वेगवेगळ््या निक षांच्या आधारेकेलेल्या पाहणीवर हा स्वच्छतेचा दर्जाठरतो. दररोज ७५ लाख प्रवाशांचा वावर असलेल्या मुंबईतील रेल्वेवाहतुक ीक डून प्रवाशांच्या फ ार अपेक्षा नाहीत. उपनगरी गाड्या वेळेत धावाव्या, गाड्यांत चढता यावे, स्थानक ांवर उभे राहण्यास पुरेशी जागा असावी, या अपेक्षाही पूर्णहोत नाहीत. अशा स्थितीत जेव्हा दहा-पंधरा मिनिटांपेक्षा अधिक क ाळ स्थानक ांत थांबण्याची वेळ येते तेव्हाच स्थानक ातील स्वच्छतेसह अन्य बाबींक डेप्रवाशांचेलक्ष जाते. लांब पल्ल्याच्या गाडीच्या प्रवाशांचा स्थानक ातील मुक्क ाम यापेक्षा अधिक असतो आणि मुंबईछत्रपती शिवाजी टर्मिनस, लोक मान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, क ल्याण या देशातील ४०७ स्थानक ांच्या स्पर्धेत उतरलेली ही सारी स्थानके लांब पल्ल्याच्या वाहतुक ीशी जोडलेली आहेत. त्यातहीछत्रपती शिवाजी टर्मिनस टिळक टर्मिनस, वांद्रे, दादर या स्थानक ांत ज्या पद्धतीनेस्वच्छता होते, त्या तुलनेत क ल्याणमधील स्वच्छतेक डेलक्ष दिले जात नाही, हे यातून समोर आले. याला रेल्वेचे प्रशासन जसेजबाबदार आहे, तितक्याच प्रवाशांच्या सवयीही क ारणीभूत आहेत. स्थानक ांतच प्रात:र्विधी उरक णे, तेथेच खाणे-पिणे, थुंक णे, क चरा क रण्याची सवय जोवर बदलली जात नाही, तोवर क ोणतेही स्थानक स्वच्छ होऊ शक त नाही. रेल्वेच्या धोरणातील विसंगतीही या अस्वच्छतेत भर घालते. प्रवाशांची सोय म्हणून खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यास परवानगी दिली जात असली; तरी अन्नपदार्थ तेथेच तयार क रणे, त्यासाठी पदार्थ साठवणे, खराब-उरलेले अन्न तसेच फेकून देणे यामुळे गलिच्छपणा- दुर्गंधी तर वाढतेच; पण उंदीर-झुरळांचा सुळसुळाट होतो. लांब पल्ल्याच्या गाड्या स्थानक ात थांबलेल्या असताना शौचालयांचा वापर केल्यास त्यातून अस्वच्छता पसरू नये यासाठी बायोटॉयलेटचा प्रस्तावही असाच रखडला आहे. रेल्वेने स्वच्छतेची कंत्राटे दिली आहेत. त्यानंतरही स्थानके अस्वच्छच राहिली. प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी न केल्यानेती वाढली. प्रसाधनगृहांतील गलिच्छपणा हा आणखी स्वतंत्र विषय. प्रवाशांक डून रक्क म आक ारू नही पुरेशी स्वच्छता ठेवली जात नाही. यासाऱ्याचा एक त्रित परिणाम स्थानक ांवर होतो. गेल्या चार वर्षांत रेल्वेने स्वच्छतेसंदर्भात भरपूर जाहिराती केल्या, पण त्यातील बºयाच गोष्टी त्याच्याक डूनच कृतीत न उतरल्यानेपालथ्या घड्यावर पाणी पडलेआणि तेच अहवालाच्या रू पानेरेल्वेला वाकुल्या दाखवतेआहे.
स्वच्छतेचा घडा पालथा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 6:29 AM