शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

राष्ट्रवाद ही कपोलकल्पित संकल्पना, जाणून घ्या काय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 6:22 AM

राष्ट्रीय आणि प्रादेशिक ओळख ही कल्पनानिर्मिती आहे. हिंदुत्व आणि काश्मिरियत या दोन्हींचा शोध लावण्यात आलेला आहे.

गुरचरण दास

जम्मू-काश्मीरचा राजकीय दर्जा बदलण्यात आल्याने काश्मिरी जनता दुखावली आहे. तेथील जनतेत संताप, भय आणि परकीयपणाची आणि आत्मसन्मान गमावल्याची भावना बळावली आहे. कायदेशीर मार्गाने किंवा इतिहासाच्या दृष्टिकोनातून अनेकांनी काश्मिरी जनतेच्या या व्यथेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; परंतु गरज आहे ती राष्ट्रीय ओळखीसंदर्भातील तात्त्विक समंजसपणाची.

राष्ट्रीय आणि प्रादेशिक ओळख ही कल्पनानिर्मिती आहे. हिंदुत्व आणि काश्मिरियत या दोन्हींचा शोध लावण्यात आलेला आहे. यातून संताप काही प्रमाणात शांत करण्यास मदत होईल. याबाबत विशेषत: काश्मिरी जनता आणि भारतीयांची प्रशंसा करायला हवी. अनुच्छेद ३७० मधील बव्हंशी तरतुदी ज्या पद्धतीने सरकारने रद्द केल्या, ते दुर्दैवी आहे. काश्मिरी जनतेची संमती कशा प्रकारे मिळवायला हवी होती, यावरील गुणदोषावरील विवेचन नाही; परंतु काश्मिरी जनतेला राहण्यासाठी भारत हेच अपेक्षित स्थान असल्याची जाणीव झाल्यानंतर काळाच्या ओघात त्यांच्या संतापाची भावना दूर होईल. देशात राहण्याची इच्छा प्रबळ होणे, हीच खरी जनतेची संमती होय.याचा अर्थ असा की, फक्त काश्मिरी लोकांसाठीच नव्हे, तर सर्व भारतीयांसाठी भारत हे राहण्यासाठी इच्छित स्थान बनले पाहिजे. तेव्हा राहण्यासाठी भारत देश कसे इच्छित स्थान होईल? हा प्रश्न आहे. विविध ओळख असलेला भारत हे केंद्रीय संघराज्य आहे. काही वर्षांपूर्वी निम्मे राज्य गमावलेल्या आंध्रच्या जनतेच्या दु:खापेक्षा काश्मिरी जनतेचे दु:ख वेगळे आहे, असे काही म्हणत असतील. काहींचा असा युक्तिवाद आहे की, काश्मीर हे सीमावर्ती राज्य असून, विशिष्ट इतिहासाने ते अद्वितीय आहे; परंतु पंजाबसारख्या अन्य सीमावर्ती राज्यांतील जनतेला फाळणीच्या वेळी आपली घरेदारे गमवावी लागली. त्यांचे दु:खही हृदयविदारक आहे. नंतर पंजाबचे विभाजन करून हरियाणा आणि हिमाचल प्रदेशची निर्मिती करण्यात आली. पंजाब आणि आंध्रमधील जनतेने असा बदल करण्यास सांगितला होता का?काही उदारमतवाद्यांचे म्हणणे आहे की, सार्वमत, स्वयंनिर्णय हाच संमतीचा एकमेव योग्य मार्ग आहे. तेव्हा काश्मिरी जनतेलाही स्वयंनिर्णय या तत्त्वाच्या आधारे बाहेर पडण्याचा पर्याय द्यायला हवा. हे खरे असेल, तर आपल्यावर आंध्र प्रदेशात स्वयंनिर्णय घेण्याचे बंधन नाही का? १९४७ आधीचा विचार केल्यास ब्रिटिश गेल्यानंतर भारताचा ४० टक्के भाग बळकावणाऱ्या ५६५ संस्थानांतील जनतेसाठी या तत्त्वाचा अवलंब करायला नको होता का? काश्मीर हे त्यापैकी एक संस्थान होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते भारत ३ हजार जातींचा देश आहे. मग तेथे ३,००० सार्वमत घ्यायला हवे होते का? राजेशाहीत ब्रिटिश आणि भारतीयांकडून शासन करण्यासाठी एकही पर्याय दिला गेला नाही. ब्रिटिशांनी जाऊ नये, अशी पुरेशा संख्येने भारतीयांची इच्छा असती, तर भारत या नावाने स्वतंत्र राष्टÑ निर्माण होऊ शकले नसते. जसे की ब्रिटनने ब्रेक्झिटनंतर शोधलेला सार्वमत हा एक मार्ग होऊ शकतो. समान वंश, भाषा व सामायिक संस्कृतीवर आधारित राष्टÑ-राज्याच्या संकल्पनेचा शोध अलीकडील काळातील आहे. ही संकल्पना वेस्टफालियाच्या करारात (१६४८) जन्माला आली असली तरी १९ व्या शतकापर्यंत ती प्रसृत झाली नव्हती. १८१५ मध्ये नेपोलियनचा पाडाव होईपर्यंत युरोपात बहुतांश राजे-महाराजे होते. त्यानंतर युरोपियनांनी जाणीवपूर्वक राष्टÑ-राज्याची संकल्पना साकारली. या ठिकाणी नैसर्गिक एकत्रितपणाची भावना साहजिकच नसली तरी त्यांच्या नेत्यांनी ती तयार केली व इतिहासाच्या शालेय पाठ्यपुस्तकांमधून लोकांपर्यंत पोहोचवली. हिंदू राष्टÑवादीही आज हेच करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

धोकादायक राष्टÑवादामुळे उद्भवलेल्या पहिल्या जागतिक युद्धाच्या भीषण अनुभवानंतर जगाने १९२० मध्ये नैतिक विचारांवर आधारलेली राष्टÑीय स्वयंनिर्णयाची संकल्पना आणली. आपला भारत हे राष्टÑ असल्याचे सिद्ध करण्यावर आपला स्वातंत्र्य मिळवण्याचा दावा अवलंबून आहे, हे स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनाही जाणवले होते. ही भावना अत्यंत महत्त्वाची होती. कारण ब्रिटिश राजवटीत अनेक वसाहतवाद्यांना वाटत होते की, भारत ही एक भौगोलिक अभिव्यक्ती आहे. (हे विन्स्टन चर्चिलचे शब्द आहेत.) अशा प्रकारे महात्मा गांधी हे आमचे प्रमुख उद्गाते बनले. या सर्व प्रकरणाचा धुरळा बसल्यानंतर काश्मीर उदास मनाने भारतात मिसळून गेल्याचा मुद्दा गौण होईल. सर्वसामान्य काश्मिरींच्या डोळ्यांना भारताचे कसे स्वरूप दिसते, यावर या एकत्रीकरणाचे यश अवलंबून आहे. येथे भारतीय सरकारची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. उत्तम शासन, कायद्यासमोर सर्व समान असल्याची खात्री देणे, लोकांना त्यांचे नियम बदलण्याची संधी देणे, शिक्षण व आरोग्याच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांना भरभराट साधण्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून द्यावे लागेल. यामुळेच तेथील प्रत्येक जण भारतात राहण्यास पसंती देईल. जगात देशांचा शोध लावला जातो आणि राष्टÑवाद कपोलकल्पित आहे, हीच खरी मान्यता आहे.
(लेखक आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत