शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

‘कॉप २४ परिषद : थोडी कडू, थोडी गोड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 2:19 AM

- शैलेश माळोदे  (विज्ञान पत्रकार आणि लेखक) दरवर्षी वाढत जाणारे तापमान हे वास्तव आता स्वीकारल्याच्या स्थितीत ग्लोबल वॉर्मिंगचे संकट हे ...

- शैलेश माळोदे  (विज्ञान पत्रकार आणि लेखक)दरवर्षी वाढत जाणारे तापमान हे वास्तव आता स्वीकारल्याच्या स्थितीत ग्लोबल वॉर्मिंगचे संकट हे आता संकट राहिले नसून, हवामान बदलाच्या माध्यमातून हे आपले वास्तव जीवन बनलेय, याचा अर्थात पृथ्वीला खूप त्रास होणार आहे आणि माणूस नावाच्या या पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राण्याकडे ते वाचविण्याचे कंत्राट आहे. असले सगळे गुळगुळीत बोलणे करण्याची वेळ निघून गेल्याचे सर्वच राष्टÑांच्या नितीनिर्धारकांना पटले असले, तरी वळले मात्र नाही, अशी काहीशी भावना पोलंडच्या कॅडोव्हाइस इथे संपन्न झालेल्या कॉप २४ (कॉन्फरल आॅफ पार्टीज-२४) परिषदेच्या समाप्तीनंतर सर्वच मानव प्राण्यात निर्माण झाली असावी, अशी किमानपक्षी तशी अपेक्षा आहे. कॉप २४ या संयुक्त राष्टÑांच्या वार्षिक हवामान शिखर परिषदेचे यजमानपद भूषविलेले शहर खरे तर जुन्या, घाणेरड्या जगाकडून नव्या, स्वच्छ जगाचे प्रतीक म्हणायला हवे. आध्यात्मिकदृष्ट्या हे शहर पोलंडमधील खाण उद्योगांचे आणि कामगारांचे, पण ते सुटाबुटातील विविध व्यवस्थापन तज्ज्ञ आणि दाढीधारी कार्यकर्ते यांनी फुलले होते. विशेष म्हणजे, परिषदेचे स्थानच शहरातील केंद्रस्थानी असलेल्या एका बंद पडलेल्या खाणीवर होते.१५ डिसेंबरला खूप गाजलेल्या या परिषदेतील गलका थांबण्यापूर्वी अनेकांना वाटत होते की, या बैठकीत या स्थित्यांतरातील अनेक न सुटलेले विरोधाभास प्रामुख्याने ‘फोकस’ होतील़, पण सुदैवाने १९५ देशांतील १४ हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधींनी एक दिवस उशिरा का होईना, पण या परिषदेच्या मूळ कामात यश लाभले. ते काम म्हणजे, २०१८ सालचा पॅरिस करार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण जगाला औद्योगिक क्रांतीपूर्ती असलेल्या तपामानातील २ अंश सेल्सिअसनी कमी आणि दीड अंश कमी ग्लोबल वॉर्मिंग राखण्यास भाग पाडणाºया करारासाठी नियम तयार करणे.परिषदेची सुरुवात फारशी लक्षणीय ठरली नाही. पोलंडचे राष्ट्राध्यक्षांनी आपल्या भाषणातच २०० वर्षे पुरतील, इतक्या कोळशांच्या साठ्यावर तुळशीपत्र ठेवण्यास असमर्थता व्यक्त केली. फ्रान्सने विविध आंदोलनांच्या दबावामुळे इंधनावरील वाढीव कर मागे घेऊन परिवहनातील हरितगृह वायू उत्सर्जनाबाबत मागे पाऊल टाकले.या परिषदेआधीच ब्राझीलच्या नव्या राष्टÑाध्यक्षांनी जानेवारीत सत्ताग्रहण करण्याआधीच पुढच्या परिषदेचे यजमानपद नाकारले आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे ब्राझीलला पॅरिस करारातून बाहेर घेऊन जाण्याची इच्छा असणाºया नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांची धोरणे एक प्रकारे जाहीर केली. इतक्या अडचणीनंतरदेखील वाटाघाटीद्वारे परिषदपूर्व मसुद्यावरील २,८०० विरोधी मुद्दे सोडविण्यात आले. २०० विविध पक्षांची हितसंबंध जपणे सोपे नाही, त्यामुळे अर्थातच ‘कॉप २४’ परिषदेतून सर्व खूश होऊन बाहेर पडले असे नाही. विविध लहान बेटे राष्ट्रांची वाढत्या सागर पातळीवर खास काही चर्चा झाली नाही. निर्णय तर दूरच श्रीमंत राष्टÑांना वाटतेच की गरीब राष्टÑांना कार्बन उत्सर्जन वाढविण्याची मोकळीक आहे. ब्राझीलने दुहेरी मोजणीच्या अटकाव करणाºया प्रस्तावांत कोलादांडा घातला. त्यामुळे संपूर्ण मुद्दा मागे पडल्यासारखे झाले आहे. पॅरीस कराराचे नियम पुस्तक म्हणूनच पृथ्वीच्या मानवनिर्मित तापावर उपाय ठरत नाही. सर्व अर्थव्यवस्था पूर्णपणे कार्बनरहित होणे हेच खरे औषध आहे. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रान यांना हे जाणवतेय की, हे औषध नक्कीच कडू आहे. मग अमेरिका आणि भारत-चीनच्या राष्ट्रप्रमुखांनाही त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार मात्र नाही. हे निर्विवाद!

टॅग्स :weatherहवामान