शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Corona Vaccination: १०० कोटी लसींची मात्रा पूर्ण झाल्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 5:24 AM

लसीकरण क्षेत्रात भारताने केलेली कामगिरी लक्षणीय आहे. शंभर कोटी डोसच्या लसीकरणाचा टप्पा गाठताना देशाने इतर देशांनाही मदत केली आहे.

- डॉ. शशांक जोशी, सदस्य, कोरोना टास्क फोर्सवैश्विक पातळीवर लसीकरणाचा विचार करता, अन्य आजारांप्रमाणेच आता आपण कोरोना लसीकरणाबाबतही आत्मनिर्भर होऊन सुयश मिळविले आहे. यात दोन घटकांचा मोठा वाटा आहे. लसीच्या उत्पादन कंपन्या आणि लसीकरण मोहीम राबविण्यासाठी मनुष्यबळ तसेच अन्य यंत्रणांचे यात मोलाचे योगदान आहे. देशाची लोकसंख्या १३५ कोटी आहे, त्यानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या अखेरच्या टप्प्यात २०० कोटी लसी देण्यात येणार आहेत.देशात १६ जानेवारीला लसीचा पहिला डोस दिला गेला. त्यानंतर २७८ दिवसांनी शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा देशाने पार केला आहे. १०० कोटी डोस देणारा भारत हा जगातला दुसरा देश आहे. चीनने हा टप्पा जून महिन्यात पूर्ण केला होता. या वर्षाच्या शेवटापर्यंत लसीकरण पूर्ण करायचं असेल तर दिवसाला किमान १.२ कोटी लोकांना लस मिळायला हवी. ४५ पेक्षा अधिक वयाच्या सात कोटी लोकांना अजूनही लस मिळालेली नाही. लसीबाबत असलेली उदासीनता आणि तळागाळातल्या प्रत्येकाला लस मिळणे हे भविष्यातील मोठे आव्हान असणार आहे.

लसीकरणाचा वेग देशात सुरुवातीला अतिशय कमी होता. देशात ९६ कोटी लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. लसीच्या वितरणातील अडचणी, उत्पादनातील अडचणी, कोविडची दुसरी लाट यामुळे लसीकरणाची गती काहीशी मंदावली. देशातील पूर्ण लोकसंख्येचे  लसीकरण होण्यासाठी आणखी ९० कोटी डोसची गरज आहे. केंद्र सरकारचे उद्दिष्ट लक्षात घेतले, तर त्यासाठी आता फक्त दोन ते तीन महिनेच शिल्लक आहेत.  कोणत्याही विषाणूविरोधात जागतिक स्तरावर रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे जाऊ द्यावी लागतात. मात्र, रोगप्रतिबंधक लसीकरणातील स्थिर वाढ, नव्या लसींसाठी सातत्याने संशोधन आणि कृतिशील उपाययोजनांमुळे सकारात्मक भविष्याचे आश्वासनच मिळाले आहे. कोणतीही लसनिर्मिती करीत असताना चाचणी आणि संशोधनासाठी सामान्यतः काही वर्षे लागतात. कोविड-१९ च्या साथरोगामुळे सुरक्षित आणि प्रभावशाली लसनिर्मितीसाठी जागतिक स्तरावर अभूतपूर्व प्रयत्न करण्यात आले.
लसीकरण क्षेत्रात देशाने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. यापूर्वीही १९२०पासून म्हणजे गेल्या १०० वर्षांपासून भारताला लस बनवण्याचा अनुभव आहे. जगातील विविध आजारांवरील ७० टक्के लसी भारतात बनतात. भारतीय औषध कंपन्या जगातील विविध आजारांवरील ५० टक्के लसींची मागणी पूर्ण करतात. जगभरातल्या १५० देशांत भारताने बनवलेल्या लसी जातात. भारताने युरोप व अमेरिकेसारख्या विकसित देशांनाही कमी किमतीत विविध आजारांवरील लसी पुरवलेल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने आतापर्यंत विविध देशांतील आजार बरा करण्यासाठी भारताने बनवलेल्या लसी वापरलेल्या आहेत. भारत कमीत कमी ४० ते ५० पट स्वस्तात औषधं व लसी इतर देशांना देतो.
कोविडमुक्त भविष्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू असताना साथरोगावर जागतिक उपचार होणे अत्यावश्यक बनले आहेत. सध्या औषध व लसींच्या बाबतीत विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. शिवाय, लवकरच प्रतिबंधक गोळ्यांही चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात असल्याने ही दिलासादायक बाब आहे. याखेरीज, आता करोनाबाधित रुग्णांवर ‘अँटीबॉडी कॉकटेल’ उपचार पद्धती प्रभावी ठरत आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. कोरोनानंतर शासनाचा आरोग्यसेवा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. परिणामी, आरोग्याच्या अर्थसंकल्पापासून ते पायाभूत सेवा सुविधांपर्यंत यंत्रणा गांभीर्याने विचार करू लागली आहे. आपण आता प्रत्येक आजाराविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखत असून व्यवस्थापन व नियंत्रणावर बारकाईने लक्ष देत आहोत. भविष्यात आरोग्यसेवा क्षेत्राच्या दृष्टीने शासनाची यंत्रणा अद्ययावत आणि सक्षम असेल यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शब्दांकन : स्नेहा मोरे 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या