शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

भ्रष्टाचारमुक्तीचा ‘श्रीमंत’ विडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 7:26 AM

श्रीमंत पाटील. नावाप्रमाणेच मनाने आणि धनाने श्रीमंत असलेले कर्नाटक विधानसभेतील कॉंग्रेसचे एक मराठी आमदार.

श्रीमंत पाटील. नावाप्रमाणेच मनाने आणि धनाने श्रीमंत असलेले कर्नाटक विधानसभेतील कॉंग्रेसचे एक मराठी आमदार. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कर्नाटकातील कागवाड विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करीत आहेत. या मतदारसंघाला भ्र्रष्टाचारमुक्त करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. नागरिकांची कामे वरून अथवा टेबलाखालून जादा पैसे न देता झाली पाहिजेत, यासाठी त्यांनी मोहीम उघडली आहे. मतदारांच्या प्रबोधनाबरोबरच अधिकारी, पदाधिकाऱ्यांनाही याबाबत समजावून प्रसंगी दरडावून पैसे न घेता कामे करण्यास भाग पाडत आहेत. असे जर झाले तर केवळ कर्नाटकच नव्हे संपूर्ण भारतात हा मतदारसंघ आदर्श ठरेल.कर्नाटकात गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कागवाड मतदारसंघातून तब्बल ३३ हजार मताधिक्याने साखर कारखानदार असलेले श्रीमंत पाटील विजयी झाले. सलग १५ वर्षे आमदार असलेल्या भाजपच्या राजू कागे यांचा त्यांनी पराभव केला. प्रचारात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती कशी करता येईल, याचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी तसेच मतदारांचे आभार मानण्यासाठी ते सध्या मतदारसंघाचा दौरा करत आहेत. कागवाडजवळील लोकूर या छोट्या खेड्यातील त्यांची आभाराची सभा ऐकताना भ्रष्टाचारमुक्तीसाठीचा त्यांचा ध्यास शब्दा-शब्दांतून जाणवत होता. यादृष्टीने आपण काम सुरू केल्याचे सांगताना त्यांनी दोन उदाहरणेही दिली. सध्या सर्वत्र बदल्याचे वारे आहे. आपल्याला हव्या त्या ठिंकाणी बदली व्हावी यासाठी शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी नेत्यांची शिफारसपत्रे आणत असतात. या पत्रासाठी लाखो रुपये मोजायची त्यांची तयारी असते. श्रीमंत पाटील यांच्याकडेही अशा बदलीच्या शिफारस-पत्रासाठी अनेकजण आले. त्यासाठी हवे ते देण्याची त्यांची तयारी होती. पण तुम्ही केवळ तुमच्या पगारात भागवणार असाल, एक पैचीही वरकमाई करणार नसाल, तर मी पत्र देतो, अशी अट त्यांनी घातली. हे ऐकून अनेकांनी हळूच काढता पाय घेतला. मात्र, पगारातच भागवणारे काही प्रामाणिक अधिकारीही त्यात होते.दुसरे उदाहरण होते. विजेचे ट्रान्स्फॉर्मर बदलण्याचे. कर्नाटकात कृषीपंपांना वीज मोफत आहे. मात्र, या मतदारसंघात ट्रान्स्फॉर्मर क्षमतेपेक्षा जास्त कृषीपंप आहेत. त्यामुळे ट्रान्स्फॉर्मर वारंवार जळतात. ते बदलण्यासाठी कर्नाटक वीज मंडळाचे अधिकारी दहा हजार ते तीस हजार रुपयांच्या दरम्यान पैसे घेतात. अशाच एका गावातील दोन ट्रान्स्फॉर्मर बंद पडल्याचे आणि पैसे दिल्याशिवाय नवे ट्रान्स्फॉर्मर बसवणार नाही, असे अधिकारी सांगत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी श्रीमंत पाटील यांच्याकडे केली. त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाºयांना याबाबत जाब विचारला. त्याच दिवशी त्या गावातील दोन्ही ट्रान्स्फॉर्मर एकही पैसा न देता बसले. ही दोन्ही उदाहरणे उपस्थितांच्या टाळ्या मिळवून आणि आता खरंच हे आमदार आपला मतदारसंघ भ्रष्टाचारमुक्तीच्या दिशेने घेऊन जातील, असा विश्वास देऊन गेली. याचवेळी सरकारी कार्यालयात कुणीही लाच देऊनका, कुणी मागितलीच तर थेट मला सांगा, असे सांगतानाच काम लवकर व्हावे म्हणून तुम्हीही कुणाला जादा पैसे देऊ नका, अन्यथा माझ्या या मोहिमेला काही अर्थ राहणार नाही, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा ’ या आश्वासनाचे काय झाले, ते आपण पाहतोच आहोत. श्रीमंत पाटील यांच्या या निर्धाराचे काय होते, ते येणारा काळच सांगेल.- चंद्रकांत कित्तुरे

(chandrakant.kitture@lokmat.com)