शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

'वाचेदयाळां'चा देश!

By admin | Published: September 21, 2016 7:53 AM

पाकिस्तानी लष्कराने ज्यांना पुरस्कृत केल्याचा भारताचा दावा आहे आणि जो नेहमीप्रमाणे पाकने फेटाळून लावला आहे

पाकिस्तानी लष्कराने ज्यांना पुरस्कृत केल्याचा भारताचा दावा आहे आणि जो नेहमीप्रमाणे पाकने फेटाळून लावला आहे, त्या दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे जम्मू-काश्मिरातील उरी येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्याचे आणि या हल्ल्यात हकनाक आपले प्राण गमवावे लागलेल्या सतरा जवानांच्या मृत्यूचे शल्य दीर्घकाळपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या मनाला टोचत राहील यात शंका नाही. जेव्हा केव्हा असे शल्य मनात दाटून येते तेव्हा संवेदनशील माणूस अंतर्मुख होतो, आत्मपरीक्षण करतो आणि भविष्यात पुन्हा तसे काही घडू नये यासाठी काय तजवीज करायची याचा शांतपणे विचार करतो; पण कोणत्याही स्थितीत तो वाचाळपणा मात्र करीत नाही. दुर्दैवाने आजवर जेव्हा जेव्हा पाकिस्तानने स्वत: किंवा पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतात येऊन आगळीक केली तेव्हा तेव्हा भारतात उफाळून आली ती वाचाळता. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे', या सुभाषितवजा म्हणीची मग प्रकर्षाने आठवण होते. पाकी दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला तेव्हा तो देशाच्या गंडस्थळावरील हल्ला मानला गेला. त्यानंतर मुंबई, पठाणकोट, उरी असे एकामागोमाग एक हल्ले झाले आणि देशाची एक नव्हे अनेक गंडस्थळे फोडली गेली. त्यावरील प्रतिक्रिया पुन्हा तीच, वाचाळवीरतेची. घातक्यांना त्यांच्या पापाची सजा दिली जाईल, ईट का जबाब पत्थर से दिया जायेगा, पाकिस्तानला हे खूप महागात पडेल, असे किंवा यासारखे इशारे पंतप्रधानांपासून निम्न स्तरावरील पुढार्‍यांपर्यंत सारे जणच जे देत असतात ते नेमके कोणाला उद्देशून असतात? आंतरराष्ट्रीय समुदायाला? आणि त्याचा लाभ काय? उलट असे इशारे किंवा अशी वक्तव्ये अकारण देशात एक उन्माद करतात आणि उन्मादात विवेक नेहमीच हरवून जात असतो. जे सतरा जवान मृत्युमुखी पडले त्यांच्या देहत्यागाचा पूर्ण आदर राखून जर असे म्हटले की, त्यांनी वास्तवात जे पत्करले ते वीरमरण नव्हते, तर तो अनास्थेने घेतलेला त्यांचा बळी होता, तर ते वावगे कसे ठरू शकेल? प्रत्यक्ष नियंत्रणरेषेपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या आणि म्हणूनच अत्यंत संवेदनशील मानल्या जाणार्‍या उरी येथील लष्करी तळाचा जर कडेकोट बंदोबस्त करण्यात लष्कर आणि लष्कराचे कर्तेकरविते अपयशी ठरत असतील तर 'आम्हाला सरकारने आता परवानगी द्यावी, आम्ही सीमा पार करून पाकवर हल्ला करू' ही लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांची भाषादेखील एक वाचाळताच ठरत असते. येथे प्रमोद महाजन संरक्षणमंत्री असतानाचा एक प्रसंग आठवतो. एका दूरचित्रवाणीवरील चर्चा कार्यक्रमात त्यांना एका विदेशी पत्रकाराने वारंवार 'पाकने हल्ला केला तर तुमची भूमिका काय राहाणार' हा एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यावर महाजन म्हणाले, 'कोणत्याही सार्वभौम देशाच्या संरक्षण सज्जतेची आणि धोरणात्मक बाबींची चर्चा अशी चावडीवर बसून होत नसते;' पण दुर्दैवाने आज तसेच सुरू आहे. पाकी लष्कराने अशा उघड परवानग्या मागून आणि घेऊन आजवरचे भारतावरील हल्ले केले होते काय? लष्करात सेवारत असलेल्या अधिकर्‍यांची ही तर्‍हा, तर नवृत्तांचे बोलायलाच नको. आता भारताने पाकिस्तानात 'फिदाईन' पाठविले पाहिजेत असे एक नवृत्त लष्करी जनरल म्हणतो, तर दुसरा मुलकी तथाकथित सुरक्षा सल्लागार सल्ला देतो की, टाकाच एकदा पाकिस्तानवर अणुबॉम्ब. फार तर काय होईल, पाकही टाकेल आणि मरतील भारतातील दहा-पाच कोटी लोक; पण प्रश्न तर कायमचा निकाली निघेल! युद्ध काय असते, त्याचे परिणाम काय संभवतात, आज समोरासमोरच्या युद्धाचा काळ राहिलेला नाही; पण तरीही संघर्ष सुरू करायचा म्हटला की, त्याचे गंभीर आर्थिक परिणाम जनतेला भोगणे भाग असते, प्रचंड महागाईचा सामना करणे क्रमप्राप्त ठरत असते; पण कांदा पन्नास रुपये झाला की, लगेच कासावीस होणारे व सरकारे उलथवून टाकणारे लोक समाजमाध्यमांमधून सल्ले देत असतात, बेचिराख करा पाकिस्तानला. आपले जपावे आणि दुसर्‍याला यश द्यावे, अशी मराठीत एक म्हण आहे; पण भारतावर आजतागायत जितके म्हणून अतिरेकी हल्ले झाले त्या प्रत्येक हल्ल्याच्या वेळी कोणत्या ना कोणत्या यंत्रणेचा गाफीलपणाच कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले; पण पठाणकोटच्या हवाई तळावरील हल्ल्यात तर केवळ गाफिलीच नव्हे, तर शत्रूशी हातमिळवणी करणार्‍यांची गद्दारी कारणीभूत असल्याचे दिसून आले; पण अशा प्रत्येक हल्ल्यानंतर कोणता धडा शिकला गेला आणि दक्षतेचे व सावधगिरीचे कोणते उपाय योजले गेले. संसदेवर हल्ला झाल्यानंतर तेथील सुरक्षाव्यवस्था अत्यंत चोख करण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगितले.