शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

नववर्षात सृजनाचे नवगीत रचू या!

By विजय दर्डा | Published: December 31, 2018 5:42 AM

कोणाच्याही पाठीमागे त्याची निंदानालस्ती करू नये, अशी आपली संस्कृती व परंपरा आहे. म्हणूनच मावळत्या २०१८ या वर्षीसुद्धा तक्रार न करणे हे आपले कर्तव्य ठरते.

कोणाच्याही पाठीमागे त्याची निंदानालस्ती करू नये, अशी आपली संस्कृती व परंपरा आहे. म्हणूनच मावळत्या २०१८ या वर्षीसुद्धा तक्रार न करणे हे आपले कर्तव्य ठरते. सामाजिक आणि वैचारिक विघटनाच्या अनेक वाईट घटना सन २०१८ मध्ये पाहायला मिळाल्या, याची उजळणी आजच्या शेवटच्या दिवशी करून काय साध्य होणार? याच वर्षात या सामाजिक व वैचारिक विघटनाविरुद्ध जोरदार आवाजही उठविला गेला, ही सकारात्मक गोष्ट आपण पाहायला हवी. याचे श्रेय मी वर्ष २०१८ ला नक्कीच देईन. हा बुलंद आवाज सन २०१९ मध्ये अधिक कणखरपणे उमटत राहील आणि आपल्या सर्वांचे मार्गक्रमण उज्ज्वल भविष्याच्या दिशेने सुरू होईल, अशी मला आशा आहे.वर्ष २०१८ मध्ये अनेक अपेक्षा अपूर्ण राहिल्या, याची मात्र दखल जरूर घ्यावी लागेल. प्रत्येकाला काम मिळेल, शेतीमालाला रास्त भाव मिळेल, देश मालामाल होईल, या अपेक्षा घेऊन हे वर्ष आले होते. पण तरुणवर्ग रोजगाराची प्रतीक्षा करत राहिला व छोटे व्यापारी नोकरशाहीच्या जाचातून कधी सुटका होईल, याची वाट पाहत राहिले. भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे उद्योगपती चिंताक्रांत झाले व अर्थव्यवस्था दुबळी करणारे उद्योगपती मजेत निश्चिंत राहिले. लोकांची दिवाळी व होळी खराब झाली. देशाच्या रक्षणासाठी जवान बलिदान देत राहिले तर दुसरीकडे सीमेवरून राजकारण होत राहिले. देशाला पडलेला दहशतवादाचा विळखा काही सुटला नाही. तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी याचा राग व्यक्त केला. सन २०१९ तरी अपेक्षाभंगाचे वर्ष न ठरो, अशी आशा करू या!ज्या वेगाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण प्रगती करत आहोत त्याच वेगाने आपण सामाजिक समरसतेकडे परत फिरू, अशीही माझी सन २०१९ कडून अपेक्षा आहे. मी मुद्दाम ‘परत फिरू’ असे म्हटले, कारण सामाजिक समरसता ही आपली सांस्कृतिक ओळख आहे. याच सामाजिक समरसतेमुळे आपली संस्कृती हजारो वर्षे टिकून राहिली आहे. सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी आपल्या समाजाची जी घट्ट वीण आहे, त्यात याचे गमक आहे. धर्मनिरपेक्षता हा आपला स्थायीभाव आहे व तो नष्ट करण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, यावर माझा दृढविश्वास आहे. मावळत्या वर्षाने आपल्याला नवीन तंत्रज्ञानांची अनेक वरदाने दिली म्हणून मला या वर्षाचे आभार मानायला हवेत. ‘इस्रो’ने अंतराळात उपग्रह प्रक्षेपित करण्याचे नवे विक्रम याच वर्षात प्रस्थापित केले व पहिल्या भारतीयाला अंतराळात पाठविण्याच्या अभिमानास्पद ‘गगनयान’ योजनेलाही हेच वर्ष सरण्यापूर्वी मंजुरी मिळाली. अशा या देदीप्यमान वर्षाबद्दल तक्रार कशासाठी बरं करावी?आता आपण उद्याबद्दल, नववर्षाविषयी बोलू. आपण चांगले कुटुंब व चांगला समाज घडविला तर देशाची जडणघडणही उत्तम होईल, हे ओघाने आलेच. उत्तम समाजाच्या निर्मितीसाठी ज्यांचा आपण साधने म्हणून वापर करू शकतो, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यापैकी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाने स्वत:चे आरोग्य निरामय ठेवणे. आपल्या तरुण पिढीत उत्साह व बुद्धिमत्ता अफाट आहे, पण सुआरोग्याच्या बाबतीत ती कमी पडताना दिसते. शरीराला व्यायाम न देणे हे याचे सर्वात मोठे कारण आहे. परिणामी तरुण वयात मधुमेहासारखे आजार ही गंभीर समस्या होत आहे. त्यामुळे जीवन कितीही धावपळीचे असले तरी स्वत:च्या शरीरासाठी थोडा वेळ काढण्याचा संकल्प आपल्या तरुणाईला करावा लागेल.आरोग्याइतकीच स्वयंशिस्तही महत्त्वाची आहे. याची सुरुवात वेळेपासून होते. तुम्ही स्वयंशिस्त पाळली तर मनात निष्कारण बेचैनी व घबराट होणार नाही. मन स्थिर असेल तर तुम्ही रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविणार नाही. आपणास याची कल्पना आहे की, भारतात प्रत्येक तासाला सरासरी १६ लोक रस्ते अपघातात मृत्यू पावतात व यातील बहुतांश तरुण वयाचे असतात? तेव्हा नव्या वर्षात निर्धार करा की हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी व सीटबेल्ट बांधल्याशिवाय मोटार चालविणार नाही!आगामी वर्षात आणखी एक संकल्प जरूर करा. तुमचे वय कितीही असले तरी दररोज काही तरी वाचत राहा. वाचन हे मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. अनेक वाईट गोष्टी निरक्षरतेतून निर्माण होतात. तेव्हा आपल्या आसपास साक्षरतेच्या प्रसारासाठी नक्की काम करा. हे करत असताना संत कबीराचा हा दोहा कायम लक्षात ठेवा...पोथी पढ़ि पढ़ि जग मुआपंडित भया न कोय,ढाई आखर प्रेम कापढ़े सो पंडित होय!या दोह्याचा मथितार्थ असा की, आपल्या मनात प्रेम जागवा. निसर्गावर, पशू-पक्ष्यांवर, किडे-मुंग्यांवर आणि प्रत्येक माणसावर प्रेम करा! आपण प्रेम आणि स्नेहाच्या बंधनात बांधले गेलो, उत्तम समाजाचे नवनीत आपल्याला नक्कीच मिळेल. नव्या वर्षात प्रत्येकाचे व्यक्तिगत स्वातंत्र्य अबाधित राहो व माध्यमे लोकशाहीची रखवाली करत राहोत, अशी मी नव्या वर्षाकडून अपेक्षा करतो.आपणा सर्वांना नववर्षाच्या भरपूर शुभेच्छा!

टॅग्स :New Year 2019नववर्ष 2019