शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

मुका मार... बुक्का मार...!

By सचिन जवळकोटे | Published: January 13, 2019 10:04 AM

लगाव बत्ती मोदी आले. गेले. अनेकांवर ‘मुका वार’ करून गेले. जखम नाही अन् सहनही होत नाही, अशी अवस्था संबंधितांची ...

लगाव बत्ती

मोदी आले. गेले. अनेकांवर ‘मुका वार’ करून गेले. जखम नाही अन् सहनही होत नाही, अशी अवस्था संबंधितांची झाली; मात्र याच मोदी रंगमंचावर काहीजणांनी ‘बुक्का मार’ प्रयोगही सक्सेस करून दाखविला. दोन देशमुखांनी उगाच तोंड देखलं गोडऽऽ गोडऽऽ हसून जनतेचा फुल्ल टाईमपास केला. हे कमी पडलं की काय म्हणून मास्तरांनीही दोन नेत्यांना हरभºयाच्या झाडावर चढविण्यासाठी थेट ‘क्रेन’चाच वापर केला.

‘इज्जत का फालुदा’ होऊ नये म्हणून ‘मस्का’ सोलापूरचे खासदार वकील हे तसे मूळचे अ‍ॅक्टर. मात्र मोदींच्या सभेत तेही दोन देशमुखांची अ‍ॅक्टींग बघून चाट पडले. सोलापुरात आपल्यापेक्षाही माहीर असे एक से एक कलाकार आहेत, याचा त्यांना शोध लागला. ‘बापू’ अन् ‘मालक’ एकमेकांकडं बघून स्टेजवर नेमकं काय बोलले, याचा शोध आजही दोघांचे कार्यकर्ते घेताहेत; पण या दुर्मिळ अन् ऐतिहासिक घटनेचे एकमेव जिवंत साक्षीदार असलेले महाशय नेहमीप्रमाणं गायब झालेत. त्यामुळं साºयांचीच गोची झालीय. मात्र, मंडळी.. ‘लगाव बत्ती’च्या वाचकांसाठी खास आतली बातमी सांगणं, ही आम्हा पामराची ड्युटीच की.स्टेडियमच्या बाहेर उभारलेले ‘खाकी’वाले कार्यकर्त्यांना आत सोडत नव्हते. बाहेर रस्त्यावर गर्दी वाढत चालली होती. रेटा वाढू लागला होता. कुणाला आत सोडावं अन् कुणाला बाहेर थोपवावं, याचा गोंधळ काही ‘सोलापुरी खाकी’ला सुटत नव्हता. मोदी यायची वेळ झाली होती. बाहेर खचाखच गर्दी असली तरी आतलं मैदान निम्म्याहून रिकामं होतं. ही सारी परिस्थिती पाहून स्टेजवरचे दोन्ही देशमुख फुल्ल टेन्शनमध्ये आले. मोदींसमोर ‘इज्जत का फालुदा’ होऊ नये म्हणून पटकन् दोघांनी एकमेकांना ‘मस्का’ मारण्याचा निर्णय घेतला. दोघेही माईकवर आले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना आत सोडण्याचं आवाहन त्यांनी केलं. ‘खाकी’ही गालात हसली.. कारण ठाण्यात परस्परांवर केस करणाºया पार्ट्या नंतर बाहेर जाऊन परस्पर केस मिटवितात, हा अनुभव त्यांना नवा नव्हता.

दोन्ही देशमुखांच्या कार्यकर्त्यांना पटाऽऽपटाऽऽ आत सोडण्यात आलं. पाहता-पाहता रिकाम्या खुर्च्या भरल्या. मैदान हाऊसफुल्ल झालं. हे पाहून ‘बापू’ अन् ‘मालक’ खुश झाले. आपण दोघं एकत्र आल्यामुळंच हे सारे झालं, असं कौतुकानं एकमेकांना सांगू लागले. हे पाहून खासदार वकिलांनी आ वासला. आपला नवाकोरा कोट सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यांची ती प्रतिक्रिया पाहून या दोघांनाही अजून हसू आलं...अन् हा सारा प्रसंग दूरवरून अनुभवणारे हजारो सोलापूरकर क्षणभर का होईना कृत-कृत्य पावले.. धन्य-धन्य जाहले.

 अंदर की बात !  मोदींचं हेलिकॉप्टर निघून गेल्यानंतर मात्र या देशमुखांंनी पुन्हा एकमेकांकडे पाहिल्याचं ऐकिवात नाही. बोलणं सोडाच, हसल्याचंही कुणी छातीठोकपणे    सांगू शकला नाही.     लगाव बत्ती...

मी बाशनात मोदींचं नाव कुटं गेतलो ? ‘अ‍ॅक्टिंगमद्ये दोन्ही देशमुक स्वत:ला स्टार समजत असले तरी आमचं मास्तर लय सुपरस्टार हायती.. तेलच्चिंद्या ?’ असं पूर्वभागातला एक कट्टर कार्यकर्ता आपल्या सहकाºयाला मैदानावर सांगत होता... विशेष म्हणजे याचं प्रत्यंतरही तत्काळ तिथंच आलं. स्टेजवर आपल्या भाषणात मास्तरांनी मोदींकडं बोट करून अस्सल सोलापुरी-हैदराबादी मिक्स हिन्दीत सांगितलं होतं की, ‘२०२२ मध्ये या घरांचं उद्घाटन पंतप्रधानांच्याच हस्ते करणार’...

 सभा संपल्यावर मोदी निघून गेले. नंतर मीडियावाले बूम घेऊन घाई-घाईनं स्टेजजवळच्या नेत्यांकडं आले. इथं एका कॅमेºयासमोर बोलताना याच मास्तरांनी एक नवा बॉम्ब टाकला, ‘मी बाशनात मोदींचं नाव कुटं गेतलो ? मी तर पक्त पंतप्रदान एवडंंच मनालो. मग ते कोनबी असतील..’  हे ऐकून बाईट घेणारा चाट. समोरच्या कॅमेºयाचीही लागली पुरती वाट.. त्यामुळं ‘या सोलापुरात आपणच भारी राजकारण करतो,’ असं राहू नये इतरांनी भ्रमात. लगाव बत्ती...

‘जनवात्सल्य’वर  स्टेट फॉरवर्ड  तरुणाई अन् डिप्लोमॅटिक तजुर्बा..

 सोलापूरचे लाडके सुपुत्र मुंबईत बसून मोदींच्या सभेवर बारीक लक्ष ठेवून होते. या ‘इव्हेंट’ला आपण जास्त महत्त्व देऊन विनाकारण त्यांचा टीआरपी वाढवायला नको, ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. या भूमिकेमागे त्यांचा दांडगा अनुभव होता. मोठा तजुर्बा होता; मात्र शहरातील त्यांच्या काही तरूण कार्यकर्त्यांनी वेगळाच पवित्रा घेतला. मोदींना ‘काळे झेंडे’ दाखविण्याच्या नादात स्वत:चा ‘पांढरा कुर्ता’ पुरता खराब करून घेतला. ‘खाकी’च्या सळसळणाºया हातांना स्वत:हून पाठीची संधी दिली. त्यांच्या लाथांचेही चोचले चांगलेच पुरविले.

 याचा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला. कुणी म्हणालं, ‘हुकूमशाहीचा कडेलोट झाला,’ कुणी तोंड वेंगाडलं, ‘हात दाखवून अवलक्षण झालं,’ असो. लोक काही का बोलेना; मात्र गेल्या काही वर्षांपासून या ‘स्टेट फॉरवर्ड आक्रमक तरुणाई’मुळं ‘जनवात्सल्य’वरची ‘अनुभवी डिप्लोमॅटीक राजनीती’ अधून-मधून विनाकारण गोंधळात पडण्याचीच चिन्हं अधिक दिसू लागलीत. जुन्या मंडळींना हे सारं कळतंय, उमगतंय; पण सांगणार कोण..बोलणार कोण ? लगाव बत्ती...तीळगूळ घ्या, कधी तरी गोड बोला...

 ‘व्हॉट्सअ‍ॅप’ अन् ‘फेसबुक’वर आजपासून ओसंडून वाहू लागतील तीळगूळ.. बिन चवीचे अन् बिन स्पर्शाचे़ आयुष्यभर एकमेकांना शिव्या देणारी मंडळी आता करतील तीळगुळाच्या पोस्ट फॉरवर्ड़ म्हणू लागतील ‘तीळगूळ घ्या़़़आतातरी गोड बोला,’.. हे लक्षात येताच ‘लगाव बत्ती’तलं लाडकं  पात्र ‘बिट्टी’ हाही अनेक नेत्यांना भेटायला निघाला़ सुरुवातीला ‘प्रणितीताई’ भेटल्या; मात्र त्या नवा विश्वकोश प्रसिद्ध करण्यात बिझी होत्या़ ‘बेवडा खासदार’ अन् ‘पडीक आमदार’ यानंतर मराठी भाषेत पुढचा नवा शब्द कोणता असावा, यावर त्यांच्या यंग ग्रुपमध्ये चर्चा रंगलेली़ ते पाहून ‘बिट्टी’ ‘दीपकआबां’कडं निघाला खरा; परंतु पंढरपूर रस्त्यावर ‘प्रशांत मालक’ भेटले़ त्यांनाही थोडं तीळगूळ देऊन ‘बिट्टी’ पुढं सरकला़ तेवढ्यात बार्शीहून ‘दिलीपरावां’चा कॉल आला़ आपले तीळगूळ इथच संपणार, हे ओळखून त्यानं यू टर्न घेतला़़ अन् थेट अक्कलकोटच्या ‘सिद्धाराम अण्णां’ना भेटून तीळगुळावा चॅप्टर क्लोज केला़ आता हा मॅटर कोणाला समजला तर ठीक़़.. नायतर लगाव बत्ती !

 - सचिन जवळकोटे( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदीSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख