शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

डार्विन, माकड आणि माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:58 AM

मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे, हे केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचे विधान वाचून हायसे वाटले.

मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे, हे केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचे विधान वाचून हायसे वाटले. आपण मर्कंटवंशाचे दिवे आहोत, हे शालेय पाठ्यपुस्तकात वाचल्यापासून आमच्या लीलांना सुमारच उरलेला नव्हता. गुरुजींनी एकदा ‘वानर आणि टोपीविक्रेता’ या गोष्टीचे तात्पर्य काय, असे विचारले असता, ‘आपल्या पूर्वजांना अशी टोपी घालणे योग्य नव्हे’, असे उत्तर दिल्याने आम्हांस उठाबशाची शिक्षा मिळाली होती. रामायण काळात हनुमंतासह समस्त वानरसेना प्रभू रामचंद्रांच्या मदतीसाठी धावून आली, सीतेच्या शोधासाठी त्यांनी रामेश्वरमपासून लंकेपर्यंत रामसेतू बांधला. हे त्यांनी भक्तीपोटी नव्हे, तर पितृक प्रेमातून केलं असावं, असा आमचा डार्विन वाचल्यामुळं गैरसमज झाला होता. सत्यपालांनी खरं काय ते सांगून आमच्या मानगुटीवर बसलेलं हे डार्विनचं भूत उतरवून टाकलं ते बरंच झालं. सत्यपाल हे द्रष्टेपुरुष वाटतात. मानवी उत्पत्तीबरोबर भाषेच्या उगमावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, ‘पशू, पक्षी आणि प्राण्यांचे आवाज ऐकून मनुष्य भाषा शिकला हे मानववंश शास्त्रज्ञांचे विधान साफ खोटे आहे. ‘वस्तुत: चंद्र, सूर्य, पृथ्वीच्या निर्मितीनंतर भगवंतांची वेदवाणी झाली आणि मनुष्याच्या तोंडून पहिल्यांदा वेदोच्चारच बाहेर पडला!’ असं असेल तर मग वेदवाणी जाणणारे सप्तर्षी (सात ऋषी) हेच पृथ्वीवरचे प्रथम नागरिक आणि आपण वंशज ठरतो. त्यामुळे सत्यपालांच्या या संशोधनाची दखल घेऊन संयुक्त राष्टÑ संघाने समस्त भारतीयांना वैश्विक नागरिक मानून जगभरचा व्हिसा मंजूर करायला हरकत नाही!भाजपशासित प्रदेशातील अनेक मंत्री सध्या संशोधनकार्यात भलतेच मग्न दिसतात.भगवान गणेशाचे रूप हे अवयव प्रत्यारोपाचे उत्कृष्ट उदाहरण आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानवरून प्रेरणा घेत राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनीही एक संशोधन समोर आणले आहे. त्यांच्या मते, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनच्याही हजारो वर्षे आधी द्वितीय ब्रह्मगुप्ताने मांडला होता. न्यूटनने फक्त कॉपी केली! हे खरं असेल तर नजीकच्या काळात याच देशी तंत्रज्ञानावर आधारित ब्रह्मगुप्त नावाने उपग्रहांची मालिकाच ‘इस्रो’ने अवकाशात सोडली तर जगाला आश्चर्य वाटायला नको!विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला हेही तसे मिथकच. कारण, जगद्गुरू तुकारामांच्या वैकुंठ गमनासाठी आलेल्या पुष्पक विमानावरूनच राईट बंधूंना विमानाची कल्पना सुचली, असा दावा उ.प्र.तील एका मंत्र्याने केला आहे. हा तर सरळ सरळ कॉपीराईट कायद्याचा भंगच की! राईट बंधूंवर दावा ठोकायला काय हरकत? हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी केलेले संशोधन तर नोबेलच्या तोडीचे आहे. त्यांच्या मते, गाय ही एकमेव अशी पशू आहे, जी श्वासोच्छवास घेताना आॅक्सिजन सोडते आणि कार्बनडायआॅक्साईड शोषून घेते. शिवाय, गोमूत्र प्याल्याने मुनष्यास कुठलीही व्याधी उद्भवत नाही! तर मग बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे शुद्ध गोमूत्र दवाखान्यात ठेवूया का? भारतातील या नवसंशोधनाच्या वार्ता ऐकल्यानंतर खात्रीच पटते की, डार्विनचा सिद्धांत पूर्णत: खरा नसावाच. अन्यथा, सगळीच वानरं माणसाळली असती!- नंदकिशोर पाटीलNandu.patil@lokmat.com 

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगMonkeyमाकडscienceविज्ञान