शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

बहिरेपणा : वेळीच उपचार लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 12:25 AM

आपली बदलत चाललेली जीवनशैली, प्रदूषण यामुळे कर्णबधिर किंवा बहिरेपणा असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हा मुख्यत: नैसर्गिक किंवा अपघाताने होणारा आजार म्हणून ओळखला जात असला तरी याची अनेकविध कारणे आहेत, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

- डॉ. शारदा तेलंग(कान, नाक, घसा विशेषज्ञ)आपली बदलत चाललेली जीवनशैली, प्रदूषण यामुळे कर्णबधिर किंवा बहिरेपणा असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हा मुख्यत: नैसर्गिक किंवा अपघाताने होणारा आजार म्हणून ओळखला जात असला तरी याची अनेकविध कारणे आहेत, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. कर्णबधिर रुग्णांच्या म्हणून काही वेगळ्याच समस्या नक्की असतात. त्यांच्या प्रश्नावर खºया अर्थाने २९ सप्टेंबर १९५१ पासून काम करण्यास सुरुवात झाली. याच दिवशी इटली देशातील रोम शहरात जागतिक कर्णबधिर महासंघाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा ‘आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवस’ म्हणून ओळखला जातो.यानिमित्ताने कर्णबधिरांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात तसेच त्यांच्या समस्यांवर चर्चा, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासोबतच बहिरेपणा टाळण्यासाठी विविध माध्यमांतून जागृती होणे गरजेचे असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कर्णबधिर रुग्णांचे जीवन सुसह्य करता येते तसेच बहिरेपणाचे प्रमाण कमी करण्यासाठीही अनेक उपचार उपलब्ध आहेत. आपल्या समाजात कर्णबधिरांचे प्रमाण लक्षणीय आहे. एखादी व्यक्ती अंध असल्यास ते सर्वांना माहीत असते. परंतु एखादी व्यक्ती बहिरी आहे, हे लगेचच जाणवत नाही.बहिरेपणा कधीच दुरुस्त होऊ शकत नाही, असा एक गैरसमज आहे. परंतु आधुनिक वैद्यकीय ज्ञानामुळे रुग्ण योग्य वेळीच डॉक्टरांकडे गेला, तर त्याला बहिरेपणा येणारही नाही. त्यातून एखाद्या व्यक्तीला बहिरेपणा आला असेल, तरीही त्यावर निश्चित उपचार उपलब्ध आहेत. दुसरा एक गैरसमज म्हणजे, बहिरी व्यक्ती कमी बुद्धिमत्तेची असावी. खरे तर त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल शंका घेणे चूक आणि अन्यायकारक आहे. फक्त कमी ऐकू येत असल्यामुळे त्या चर्चेत सहभागी होत नाहीत एवढेच.बºयाच व्यक्ती आपण हळूहळू बहिरे होत आहोत, आपणास कमी ऐकू येत आहे, हे सत्य लवकर स्वीकारत नाहीत. घरातील इतर लोक इतरांनाही लवकर सांगत नाहीत. उगीचच एक न्यूनगंड बाळगतात. तपासणी करून घेण्यासाठी टाळाटाळ करतात. ४० ते ५० टक्के बहिरेपणा आल्यानंतर डॉक्टरांकडे येतात आणि किंचित कमी ऐकू येते, असे सांगतात. खरे तर उपचार जेवढा लवकर सुरू होईल, तेवढा तो जास्त परिणामकारक आणि फायदेशीर. कारण बहिरेपणा वाढत गेल्यास रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होतोच, त्याशिवाय कौटुंबिक, सामाजिक जीवनात मर्यादा येतात. त्याशिवाय त्यांच्या व्यवसायावरही वाईट परिणाम होतो आणि नैराश्य येणे, चिडचिडेपणा वाढणे या गोष्टीही विशेषत: वयस्कर लोकांमध्ये आढळतात. त्यामुळे कमी ऐकू येत आहे असे लक्षात आले की, त्वरित ईएनटी सर्जनचा सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार करणे हितकारक ठरते.बहिरेपणावर उपचार हा रुग्णाचे वय, बहिरेपणाची कारणे, प्रकार आणि तीव्रता यावर अवलंबून असतो. त्यासाठी काही तपासणी आवश्यक असतात. कानाची मशीनद्वारे संपूर्ण तपासणी ट्युनिंग फौर्क टेस्ट, आॅडिओमेट्री इत्यादी. इलेक्ट्रॉनिक आॅडिओमीटरच्या साहाय्याने प्रत्येक कानाची श्रवण क्षमता मोजता येते. तसेच बहिरेपणाचे प्रकार आणि कारण समजते. ही तपासणी करूनच उपचार ठरवावे लागतात. ध्वनिवहन यंत्रणेत दोष असतील तर योग्य औषधीने ते कमी होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सnewsबातम्या