शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!

By admin | Published: September 25, 2016 11:39 PM

राज्यात करवाढ करायची असेल तर सहसा ती अर्थसंकल्पीय अधिवेशनात करावी असे संकेत आहेत. पण वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या

राज्यात करवाढ करायची असेल तर सहसा ती अर्थसंकल्पीय अधिवेशनात करावी असे संकेत आहेत. पण वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या आठवड्यात मध्येच ती केली. राज्याच्या तिजोरीत भर पडावी म्हणून त्यांनी तसे केले असेलही; पण त्यामुळे अर्थसंकल्पाचे महत्त्व कमी झाले, हे नक्की. त्यानंतर काही दिवसात त्यांनी सरकारी जागा विकून किंवा त्यांची भाडी वाढवून महसूल गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा अर्थ राज्याच्या तिजोरीवरचे संकट वाढले आहे, असा निघतो. लोकांना आवडणाऱ्या, लोकप्रिय घोषणा करणे, त्यासाठी निधींची तरतूद करणे अशा गोष्टींकडे कल वाढला आणि राज्याच्या तिजोरीला अनेक बाजूंनी गळती सुरू झाली. महसूल वाढला पाहिजे याविषयी दुमत नाही, पण तो वाढत असताना ज्या योजना आपण राबवत आहोत त्यांची अवस्था काय आहे? त्यासाठी सरकार म्हणून आपली नेमकी जबाबदारी पाड पाडली जाते की नाही याचे आत्मपरीक्षण करण्याची मात्र एकाही विभागाची तयारी नाही, हे आजचे विदारक सत्य आहे. सरता आठवडा कुपोषणाच्या बातम्यांनी गाजला. अर्थमंत्र्यांनीच मध्यंतरी सांगितलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील आदिवासी कुपोषित बालकांची संख्या २३,००० आहे. शिवाय ५० हजार कुटुंंबे कुपोषणाच्या विळख्यात आहेत, तर १.९८ कोटी जनता उपाशी किंवा अर्धपोटी राहते आहे. १२५ तालुक्यांतील मानव विकास निर्देशांक खालावल्याचे समोर आले आहे. दोन कोटी नागरिकांची दिवसाला १२ रुपये खर्च करण्याचीही ऐपत नाही. हे एका विभागाचे चित्र आहे. आरोग्य विभागातही फार वेगळे चित्र नाही. ११ कोटी लोकसंख्या असणाऱ्या राज्यात शासकीय रुग्णालयांची संख्या ५१६ आहे. जागतिक आरोग्य सेवेच्या निकषानुसार ४० लोकसंख्येमागे एक बेड असणे अपेक्षित असताना आपल्याकडे ३५०० लोकसंख्येमागे एक बेड आहे. डिजिटल इंडिया असे सांगत असताना राज्यातल्या ५९,६३९ शाळांमध्ये संगणक नाहीत आणि ५२२ शाळांमध्ये साधे पिण्याचे पाणी देण्याची सोय नाही. आश्रमशाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना स्वेटर आणि बूटदेखील वेळेवर देता आलेले नाहीत. या आर्थिक वर्षाचे सहा महिने पूर्ण झाले आणि सर्व विभागांनी मिळून आत्तापर्यंत खर्च केलेला निधी आहे फक्त २२ टक्के!आकडेवारीच्या आघाडीवर अशी अवस्था असताना विकासकामे एकाच भागात केंद्रित करण्याचे प्रयत्न स्वार्थ जोपासण्यापलीकडे जात नाहीत. मुंबई-पुणे महामार्गावर आणखी तीन-चार हजार कोटी खर्च करून सध्याच्या कंपनीला २०३५ पर्यंत टोलवाढ कशी देता येईल याचा विचार करतानाच राज्यातील अन्य भागातले रस्तेही दुरुस्त झाले पाहिजेत, ते भागही महाराष्ट्रात येतात हे बहुधा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गावीच नसावे. ते स्वत:चे खिसे भरण्याच्या योजना मात्र पुढे रेटतानाचे चित्र आहे. मुंबईचे रस्ते खड्डेयुक्त झालेले असताना ते दुरुस्त करण्याचे सोडून ठेकेदार व बिल्डरांना अटक करण्यात धन्यता मानण्याचे राजकारण केले पण त्याचे पुढे काय झाले हा प्रश्न अनुत्तरित आहे. जगभरातील विविध महाविद्यालयांचे प्रवेश पूर्ण झाले आणि ती कॉलेजेस सुरूही झाली. पण अद्याप महाराष्ट्रात नीट परीक्षेचा घोळ न संपल्याने सप्टेंबर संपत आला तरी अनेक मेडिकल कॉलेजेस सुरू झालेली नाहीत. गृहनिर्माण विभागाने पाच वर्षात ११ लाख घरे बांधण्याचे आश्वासन दिले. येत्या नोव्हेंबरात सरकारला दोन वर्षे पूर्ण होतील, अद्याप एकही घर बांधून झालेले नाही. ही जंत्री सांगण्याचे कारण म्हणजे राज्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची जाणीव ठेवून काम करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सगळी लढाई एकाकी सुरू आहे. मुनगंटीवारांसारखे एक दोन मंत्री सोडले तर कोणीही त्यांच्या खांद्याला खांदा लावून राज्याचा डोलारा सावरतोय असे चित्र दुर्दैवाने दिसत नाहीे. अधिकारी गटबाजीत मग्न आहेत व मंत्री एकमेकांना उघडे पाडण्यात गुंतले आहेत. दुसरीकडे दोन्ही काँग्रेस आपापसातच भिडल्या आहेत. राज्याचे ‘जाणते राजे’ मात्र सामाजिक ऐक्य टिकले पाहिजे असे बोलत सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्यात मग्न आहेत.- अतुल कुलकर्णी