शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

फाशीची शिक्षा : एक वास्तव

By admin | Published: December 29, 2014 3:22 AM

निर्घृण गुन्ह्यासाठी दिली जाणारी सर्वोच्च शिक्षा म्हणजे मृत्युदंड आणि मृत्युदंडाचा सर्वमान्य प्रकार म्हणून जागतिक पातळीवर फाशीचे प्रचलन आहे

अंजली जमदग्नी  (लेखिका लोकमतच्या औरंगाबाद (मराठवाडा) आवृत्तीच्या सहायक संपादक आहेत. )- निर्घृण गुन्ह्यासाठी दिली जाणारी सर्वोच्च शिक्षा म्हणजे मृत्युदंड आणि मृत्युदंडाचा सर्वमान्य प्रकार म्हणून जागतिक पातळीवर फाशीचे प्रचलन आहे. फाशीचा विषय समोर येण्याचे कारण आपला शेजार देश पाकिस्तान आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील पेशावर येथील लष्करी शाळेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात १३२ लहान मुलांसह १५० लोक मरण पावले. मृत्यूने थैमान घातले. या घटनेनंतर संपूर्ण जग हळहळले तर पाकिस्तानला जबर धक्का बसला. इतके दिवस भारतात दहशतवादी पाठवून त्यांनी केलेल्या घातपाताची वर्णने अगदी चवीने चघळणाऱ्या पाकिस्तानवर त्यांचेच बूमरँग आता उलटले आहे. त्यानेच व्यथित झालेले पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पेशावरच्या हल्ल्यानंतर लगेचच दहशतवाद्यांच्या फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठवली. ही बंदी उठताच पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा झालेले ५०० दहशतवादी मृत्यूच्या रांगेत उभे असल्याचे उघड झाले, तर ८००० इतर गुन्हेगार या रांगेत आहेत. त्यातील ६३ दहशतवाद्यांना येत्या काही दिवसांत फासावर चढविले जाईल. पाकिस्तानातील नागरिक सध्या दहशतवाद्यांवर प्रचंड संतापले आहेत, तर दहशतवादी आपल्या कृतीचे समर्थन करीत आहेत.दहशतवाद्यांना जाहीर फाशी द्या, या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरत आहेत, तर संयुक्त राष्ट्रे, जागतिक मानवी हक्क संघटना आणि पाकिस्तानातील मानवी हक्क संघटना फाशीच्या शिक्षेबद्दल नाराज आहेत. पाकिस्तानची न्यायालयीन यंत्रणा सदोष असल्याने यात एखादा निरपराध नागरिक फासावर जाऊ शकतो, असे या संघटनांचे म्हणणे आहे आणि ते अगदीच चुकीचे नाही. जगात मृत्युदंडाची शिक्षा मध्ययुगीन मानली जाते. कोणत्याही गुन्ह्यासाठी माणसाला मृत्यूची शिक्षा देऊ नये, हा एक विचारप्रवाह आहे आणि तो अनेक देशांना मान्य आहे. आज जगात ज्या देशात ही शिक्षा चालू आहे, असे देश हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत. फाशीच्या शिक्षेचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांत आघाडीवर चीन आहे. या शिक्षेचा वापर केवळ युद्धकैद्यांसाठी करणारे सात देश आहेत. फाशीच्या शिक्षेचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांत चीन, इराण, सौदी अरेबिया, अमेरिका, पाकिस्तान यांचा समावेश आहे. १०० देशांनी फाशीची शिक्षा रद्द केली आहे. भारतात फाशीच्या शिक्षा अभावानेच दिल्या जातात. गुन्हेगारावरील आरोप अत्यंत निर्घृण असेल तर, आणि दुर्मिळातील दुर्मिळ आरोपासाठी १९८३ पासून फाशीचा निर्णय घेतला जातो. महाराष्ट्रात १३ मुलांना ठार मारण्याचा आरोप असणाऱ्या रेणुका शिंदे व सीमा गावित या महिला मृत्युदंडाच्या रांगेत आहेत. या दोघी सावत्र बहिणी भारताच्या इतिहासातील फासावर जाणाऱ्या पहिल्या महिला ठरतील. आजपर्यंत भारतात फासावर चढलेल्या लोकांनी केलेले गुन्हे इतके निर्घृण आहेत, की त्यासाठी मृत्युदंड ही शिक्षाही कमी ठरावी. त्यातील दोन प्रमुख आरोपी म्हणून अजमल कसाब व अफजल गुरू यांचे नाव घ्यावे लागेल. अजमल कसाबचे नाव २००८ च्या मुंबई हल्ल्याशी जोडलेले आहे. पाकिस्तानातून जे दहशतवादी मुंबईवर हल्ला करण्यासाठी सागरी मार्गाने आले, त्यातील एक म्हणजे अजमल कसाब! १६६ जणांचा जीव घेणाऱ्या या हल्ल्यात बाकीचे नऊ दहशतवादी मारले गेले; पण अजमल कसाब जिवंत सापडला. मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी व कसाब हे आमचे नागरिक नव्हेतच, असा दावा पाकिस्तानने केला; पण लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असणाऱ्या कसाबच्या रूपाने या दाव्यातील पोकळपणा जगासमोर आला. प्राथमिक चौकशीत सर्व आरोप मान्य करणाऱ्या कसाबने नंतर आपले बोलणे फिरवले; पण त्याचे भवितव्य ठरलेले होते. २१ नोव्हेंबर २०१२ रोजी कोणताही गवगवा न करता कसाबला फाशी देण्यात आले. कसाब मरण पावल्यानंतर तासाभराने महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटीलयांनी कसाबच्या मृत्यूची घोषणा केली. फाशीची शिक्षा झालेला दुसरा महत्त्वाचा आरोपी म्हणजे, अफजल गुरू! १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला करणाऱ्या आरोपींचा प्रमुख. कोणतीही जाहीर प्रसिद्धी न देता, ९ फेब्रुवारी २०१३ रोजी अफजल गुरूला फाशी देण्यात आली. अफजल गुरू हा काश्मिरी नागरिक. त्याच्या फाशीविरोधात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. अफजलला फाशी देणार असल्याचे आम्हाला कळवलेच नाही, अशी तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी केली. ही बातमी स्पीड पोस्टने कळविल्याचा दावा गृहसचिव आर. के. सिंग यांनी केला; पण कुटुंबीयांचे त्याने समाधान झाले नाही. त्याचा मृतदेहही कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला नाही. हेतल पारेख या तेव्हा १४ वर्षांच्या असणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असणारा धनंजय चटर्जी १४ आॅगस्ट २००४ रोजी फाशी गेला. पश्चिम बंगालमधील अलीपोर तुरुंगात १९९३ नंतर प्रथमच फाशी दिली गेली. देशाविरुद्ध युद्ध छेडल्याचा आरोप असणारा हरजिंदरसिंग जिंदा हा खलिस्तानचा समर्थक. त्याच्या नावावर तीन मोठ्या हत्या. माजी लष्करप्रमुख जन. अरुण वैद्य, ललित माकन व अर्जनदास यांच्या हत्या व पंजाब नॅशनल बँकेत दरोडा घालून ५७ दशलक्ष रु.च्या चोरीत सहभाग, असे संगीन आरोप असणाऱ्या जिंदा याला ९ आॅक्टोबर १९९२ रोजी फाशी देण्यात आले. २०१४ मध्ये अमेरिकेत किमान २५ जणांना मृत्युदंड देण्यात आला असून, त्या सर्वांवर अमली पदार्थ बाळगल्याचा व विकल्याचा आरोप आहे. अमेरिकेत मृत्युदंड विषारी इंजेक्शनाने दिला जातो. चीनमध्ये या वर्षभरात २४०० लोकांना फाशी देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे भ्रष्टाचार हा मुख्य गुन्हा मृत्युदंडासाठी कारणीभूत ठरत असला तरीही इतरही अनेक गुन्हे चीनमध्ये फाशीच्या शिक्षेसाठी कारणीभूत आहेत. फाशी दु:खद असली तरीही ते एक वास्तव आहे; पण जगात फाशीवर बंदी घालणाऱ्या देशांची संख्या वाढत आहे. ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.