शहरं
Join us  
Trending Stories
1
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
2
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
3
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
4
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
5
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
7
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
8
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
9
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
10
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
11
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
12
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
13
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
14
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
15
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
16
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
17
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
18
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
19
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
20
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट

वाचनीय लेख - गवत हरीण खाईल, हरणाला चित्ता खाईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 10:11 AM

आपण गवताकडे फारसे लक्ष देत नाही. गवत असतेच.. असे आपण गृहीत धरतो. पण हे विसरतो, की अन्नसाखळी अविरत राहायची, तर गवत हवेच हवे!

प्रा. डॉ. गजानन मुरतकर

देशातून नामशेष झालेला चित्ता भारतात नुकताच परतला आहे. त्याचे पाऊल हिरव्यागार नैसर्गिक गवताच्या मुलायम गालिचावर पडावे, यासाठी दीर्घकाळ काम चालू होते. २०१३ पासून मध्य प्रदेशातील कुनोच्या अभयारण्यात सिंहांसाठी  सोयीचे असे कुरणक्षेत्र तयार व्हावे, यासाठी आम्ही धडपडत होतो. सिंहांसाठी केलेली ही तयारी आता नामिबियातून आपल्याकडे पाहुण्या आलेल्या चित्त्यासाठी उपयुक्त ठरली आहे.

एरवी आपण गवताकडे फारसे लक्ष देत नाही. गवत ही गोष्ट आपण गृहीत धरतो. पण हे विसरतो, की गवत ही संवर्धनासाठी अत्यंत कठीण वनस्पती आहे.  पर्यावरणाचा समतोल राखण्यात गवत मोठी भूमिका बजावत  असते. शिवाय, निरनिराळ्या वन्यप्राण्यांच्या अधिवासासाठीही गवत हा घटक अत्यंत संवेदनशील आहे. भारतात पाच हजारांहून अधिक वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक असतील, परंतु गवत या विषयावर काम करणारे मोजकेच! याचे कारण सरसकट दुर्लक्ष आणि मुख्य म्हणजे गवत या प्रजातीवरच्या अभ्यासातली गुंतागुंत! मेळघाटातील गवत प्रजातीचा अभ्यास करत असताना ही गुंतागुंत मी अनुभवलेली आहे. पण हेही खरे, की या अभ्यासातून हाती लागलेले निष्कर्ष आणि वन्यजीवांच्या अधिवासावर सकारात्मक परिणाम करण्याची त्यांची क्षमता हे एक विलक्षण समाधान आहे. मध्य भारतीय भूभागातील अमूल्य गवताळ प्रदेश संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये मी दीर्घकाळ सहभागी आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या वैराट, कोहा, बोरी, धारगड, गुल्लरघाट, अमोना या गावांच्या जमिनीवर अतीव प्रयत्नांती आम्ही तयार केलेले कुरण क्षेत्र हे त्याचे उदाहरण! गवताची गुणवत्ता वाढताच या भागात त्यानंतर तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली आणि त्यामागोमाग मेळघाटातील  वाघांची संख्याही वाढली!

गवतामध्ये ८६ प्रकारच्या प्रजाती आहेत. त्यापैकी ४२ प्रजातींचे गवत वन्यजीव सर्वाधिक आवडीने खातात. मारवेल या गवताच्या प्रजातीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबर याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे हे गवत  तृणभक्षी प्राण्यांना विशेष आवडते. या गवताला ‘रसगुल्ला गवत’ असेही एक गोड नाव आहे.तृणभक्षी प्राणी कडक आणि मुलायम अशा दोन्ही प्रकारचे गवत खातात. कडक गवत खाणाऱ्यांमध्ये हत्ती, रानगवा, नीलगाय आदींचा समावेश आहे, तर  हरीण, काळवीट, चिंकारा अशा तृणभक्षी प्राण्यांना मऊ पोताचे गवत अधिक आवडते.  या जीवसृष्टीमध्ये गवत हा निसर्गानेच निर्मिलेला एक इंजिनिअर आहे असे मी नेहमी म्हणतो. गवतामुळे जमिनीची धूप थांबते, पावसाचे पाणी जमिनीच्या पोटात राखून ठेवायला मदत होते आणि माती वाहून जात नाही. गवत खाऊन तृणभक्षी प्राणी जगतात आणि तृणभक्षी प्राणी खाऊन मांसभक्षी प्राण्यांचा उदरनिर्वाह होतो, अशी ही अन्नसाखळी अविरत सुरू राहते. या जीवसृष्टीतील ही अन्नसाखळी अविरत चालती राहण्यासाठी गवत हा सर्वांत महत्त्वाचा, अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवाने सर्वात दुर्लक्षित  असा घटक आहे. या गवताच्या संवर्धनासाठी कुरण विकास तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न मी गेला दीर्घकाळ करतो आहे. त्यासाठी बियाणे बँक तयार करणे, मदर बेड तयार करणे आणि स्थानिक गवतांची ओळख करून देण्यासाठी क्षेत्रस्तरीय वन कर्मचाऱ्यांना सामावून घेणे अशी पद्धती वापरली जाते आहे. हे तंत्र  भारतातील सर्वांत जुन्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २०१२ मध्ये विकसित केले गेले आहे.महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, तामिळनाडू, उत्तराखंड आणि केरळ अशा बारा राज्यांमधल्या संरक्षण क्षेत्रांमध्ये गवताची कुरणे विकसित व्हावीत आणि आमच्या भाषेत ‘पूर्ण क्षेत्र उगवावे’ यासाठी दशकापासून परिश्रम सुरू आहेत.आम्ही वाघांबरोबर काम केले, सिंहांसाठी सोयीची अशी कुरणे विकसित व्हावीत म्हणून धडपडलो, आता आम्हाला चित्त्याचा उत्तम पाहुणचार करायचा आहे.(शब्दांकन - नरेंद्र जावरे, अमरावती)

टॅग्स :forestजंगल