दिल्लीवासीयांचा काँग्रेसला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 03:20 AM2020-02-21T03:20:56+5:302020-02-21T03:23:05+5:30

भाजपने आठ महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागा जिंकल्या होत्या

Delhikar people warn Congress in election | दिल्लीवासीयांचा काँग्रेसला इशारा

दिल्लीवासीयांचा काँग्रेसला इशारा

Next

डॉ. एस. एस. मंठा

दिल्लीच्या निवडणुकीच्या निकालांनी अनेकांना अनेक प्रकारचे धडे दिले. भाजपचे धोरण निश्चित करणाऱ्यांसाठी आपल्या धोरणाचा फेरविचार करण्याचे संकेत दिले आहेत. त्या पक्षाने ‘सबका साथ, सबका विकास’ हे धोरण घेऊन सुरुवात चांगली केली, पण तो पक्ष वाटेतच चुकीच्या मार्गाला लागला आणि त्याने स्वत:चाच घात करून घेतला. देशभक्तीचा हुंकार हा उपयुक्त ठरतो, पण तो नेहमीच कामाला येतो असे नाही. जेव्हा देशातील तरुण नोकरीच्या शोधात असतात आणि प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही, उदरनिर्वाह करणे कठीण होते, तेव्हा त्यांच्या दुर्दैवाला कोणते कारण झाले हे त्यांना जाणून घ्यायचे असते. रिकाम्या पोटाला देशभक्ती आणि धर्म यांचा काहीच उपयोग नसतो. लोकांना सर्व गोष्टी फुकट देण्याची प्रथा कुठेतरी थांबायला हवी. कारण त्यामुळे लोकांच्या आकांक्षा वाढतच जातात.

Image result for kejariwal wonभाजपने आठ महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागा जिंकल्या होत्या, त्या पक्षाला यावेळच्या विधानसभेत केवळ आठ जागा मिळाव्यात, याचे त्या पक्षाने आत्मचिंतन करायला हवे. त्या पक्षाने नकारात्मक प्रचार करण्याऐवजी विकासाच्या प्रचारावर भर दिला असता तर त्या पक्षाचे निकाल वेगळेच पाहावयास मिळाले असते, पण ते ‘देश बदला, अब दिल्ली बदलेगा’ याच घोषणा देत राहिले. वास्तव परिस्थिती काय आहे याकडे तो पक्ष दुर्लक्ष करीत राहिला. त्यामुळे दिल्लीच्या जनतेने त्या पक्षाला ‘देश भी बदला, दिल्ली भी बदली’ हे वास्तव दाखवून दिले. एखादी खोटी गोष्ट लाखो वेळा सांगितली म्हणजे ती सत्य ठरत नाही, हेही या निवडणुकीने दाखवून दिले. अर्धसत्य हे काही कामी येत नाही, हेही या निवडणुकीत पाहायला मिळाले. गेली २१ वर्षे भाजप दिल्लीमध्ये सत्तेपासून दूर आहे. तरीही त्या पक्षाने आपण काय काय केले हे सांगण्याचे टाळले आणि दुसऱ्यांनी काय केले नाही यावर ते भर देत राहिले. त्यांची एकूणच प्रचाराची मोहीम ही नकारात्मक होती. दिल्लीमध्ये त्या पक्षाने नेत्यांची दुसरी फळी तयार करायला हवी होती. गेल्या काही महिन्यात भाजपने काही राज्यांतील सत्ता गमावली असताना त्या पक्षाने सीएएसारख्या विषयांना चिकटून राहण्यात काय अर्थ होता? एकीकडे तेच म्हणत होते की, सीएएमुळे भारतीयांवर कोणताच वाईट परिणाम होणार नाही, मग तो विषय लोकांना जिव्हाळ्याचा का वाटावा? उलट जेएनयू, एएमयू आणि शाहीनबाग घटनांमुळे तो पक्ष स्वत: निर्माण केलेल्या उंचीवरून खाली कोसळला.

Image result for congressया निवडणुकीतील दुसरा राष्ट्रीय पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला या निवडणुकीत कोणतेच धोरण नव्हते. कोणताही खेळ हा जिंकण्यासाठीच खेळला जातो. खेळात राजा-राणी आणि वजीर असतात, आणि ते आपापली भूमिका बजावीत असतात. खेळात कोणतातरी एक पक्ष जिंकणारच असतो, पण काँग्रेसने जणू काही हरण्यासाठीच हा खेळ खेळला, आता निवडणूक हरणे हेच त्या पक्षाचे धोरण असेल तर भाग वेगळा! माझ्या शत्रूचा शत्रू तो माझा मित्र ही भूमिका कितपत उपयोगी पडणार होती? त्या पक्षाकडून मदतीची कुणी अपेक्षाच बाळगली नसताना मदत करण्याची काय गरज होती? या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळू नये, त्यांच्या मतांची टक्केवारीही घसरावी, हे शुद्ध हाराकिरीचे लक्षणच म्हणावे लागेल. सहा वर्षांपासून काँग्रेसचा एकही खासदार दिल्लीतून लोकसभेत गेलेला नाही आणि एकही आमदार विधानसभेत बसलेला नाही. त्या पक्षाचे धोरण ‘आप’शी मिळतेजुळते असताना त्या पक्षाने आपशी आघाडी तरी करायला हवी होती; पण अवघी साडेचार टक्के मते मिळवून आणि ७० पैकी ६६ उमेदवारांच्या अनामत रकमा गमावून त्या पक्षाने काय साध्य केले? भारतातील

Image result for congress rahul gandhiलोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी काँग्रेसवर आहे हे त्या पक्षाने विसरता कामा नये. काँग्रेसची या निवडणुकीतील कामगिरी अत्यंत निराशाजनक होती आणि त्या पक्षाने खडबडून जागे होण्याची गरज आहे! या निवडणुकीत पाणी, वीज, शिक्षण आणि महिलांची सुरक्षितता हेच आपचे प्रचाराचे मुद्दे होते. भाजपने आपवर व्यक्तिगत हल्ले चढवले. पण आपने भाजपच्या प्रचाराकडे दुर्लक्ष केले. या निवडणुकीत धार्मिक मतांचे धु्रवीकरण होऊन मुस्लिमांची मते आपला मिळाली. अरविंद केजरीवाल यांनी तरुणांच्या भावनांना हात घातला. आपण जे सांगतो आहोत ते करून दाखविण्याची जिद्द त्या पक्षाने व त्याच्या नेत्यांनी दाखविली. त्यामुळे भाजपवर संतापलेले लोक मोठ्या प्रमाणात आपकडे वळले. भविष्यातील निवडणुकांत द्वेषाच्या भावनेला लोक स्वीकारणार नाहीत, हा बोध या निवडणुकीने सर्वच राजकीय पक्षांना दिला आहे. या निवडणुकीने अनेकांना अनेक तºहेची शिकवण दिली. देशात द्विपक्षीय पद्धत असणे चांगले, हेही या निवडणुकीने दिसून आले. निवडणुकीपूर्वी आघाड्या करून द्विपक्षीय निवडणुका व्हायला हव्यात. एखादा दुबळा पक्ष आघाडीत आला नाही तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावे. या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली असती तर त्याचा फायदा भाजपला झाला असता हे खरे आहे. त्यादृष्टीने काँग्रेसचा पूर्णपणे नाश होणे हे एकप्रकारे आपच्या पथ्यावरच पडले असेच म्हणावे लागेल! पण ही निवडणूक काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरली असून त्याचा पक्षाने विचार करायला हवा.

(लेखक माजी चेअरमन, एआयसीटीई, सदस्य, कौशल्य विकास प्राधिकरण आहेत)

Web Title: Delhikar people warn Congress in election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.