शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
2
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
3
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
4
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
5
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
6
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
8
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
9
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
10
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
11
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
12
Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!
13
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
14
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "कारवाई होणारच, हा लढा महिलांच्या सन्मानासाठी"; शायना एनसी यांचे रोखठोक प्रत्युत्तर
16
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
17
आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!
18
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
19
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
20
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

विकासामुळेच पृथ्वीवरील जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 6:07 AM

ग्रीनलँड, अंटार्क्टिका, अलास्काच्या बर्फाचे आवरण गेल्या दोन दशकांपूर्वीच्या तुलनेत तीन ते पाचपट जास्त वेगाने वितळत आहे. दक्षिण आॅस्ट्रेलियात काही भागांत तापमान ५० अंशांपर्यंत पोहोचत आहे.

- अ‍ॅड. गिरीश राऊत (पर्यावरणतज्ज्ञ)ग्रीनलँड, अंटार्क्टिका, अलास्काच्या बर्फाचे आवरण गेल्या दोन दशकांपूर्वीच्या तुलनेत तीन ते पाचपट जास्त वेगाने वितळत आहे. दक्षिण आॅस्ट्रेलियात काही भागांत तापमान ५० अंशांपर्यंत पोहोचत आहे. प्राणी, पक्षी, मासे, इत्यादी जीव हजारो, लाखोंच्या संख्येत नष्ट होत आहेत. तेथे कोळसा खाणींचा निषेध म्हणून मुलांनी शाळेत जाणे बंद केले. बेल्जियममध्ये सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण थांबवून निदर्शने सुरू केली. ‘निदर्शने करू नका, शाळेत जा,’ असा सल्ला देणाऱ्यांना, ‘मानवजातीचा अंत होत असताना शाळेत जाण्यात काही अर्थ नाही’, असे ते विद्यार्थी बजावत आहेत. न्यूझीलंड देशाने नवे तेल व वायूंचा शोध आणि उत्खनन बंद करण्याचा व बारा वर्षांत तेल वापर थांबवण्याचा निर्णय घेतला. स्वीडनच्या मुलीने तापमानवाढ रोखणारी कृती व्हावी म्हणून संसदेसमोर धरणे धरले आहे.औद्योगिकीकरणामुळे झालेल्या कार्बन उत्सर्जनाने सूर्याची उष्णता शोषली जाऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान, यंत्र येण्याच्या काळाच्या तुलनेत सुमारे १.५ अंश या धोक्याच्या पातळीवर गेले आहे. त्यामुळे महासागराचे पाणी व ध्रुव प्रदेशातील बर्फाची हजारो कोटी टन अधिकची वाफ दरवर्षी वातावरणात जात आहे. त्या वाफेचे पुन्हा पाणी वा बर्फ होऊन ती अवकाळी, अतिवृष्टी व हिमवृष्टीच्या रूपात कोसळत आहे. आपल्या देशात मध्य प्रदेश, विदर्भ व मराठवाड्यात दवाऐवजी बर्फवृष्टी होत आहे. पिके गेली आहेत. ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया मंगळवेढ्यात पीक आले नाही.हे संकट ओळखून, नाणार रिफायनरी, जैतापूर अणुऊर्जा व आता आंबोळगडसारख्या घातक प्रकल्पांना रास्त विरोध होत आहे. परंतु, हा विरोध करणारे देशाची प्रगती रोखतात, असा प्रचार होतो. भौतिक विकासाचे समर्थन करणाºयांनी लक्षात घ्यावे की, या विकासामुळेच मानवजात व जीवसृष्टीचे पृथ्वीवरून उच्चाटन सुरू झाले आहे. मानवजात व जीवसृष्टी वाचवण्यापेक्षा दुसरे महत्त्वाचे काही असू शकत नाही. पॅरिस कराराने नमूद केलेली दोन अंशांची तापमानवाढ फक्त येत्या पाच वर्षांतच होईल.येत्या दशकाच्या शेवटी म्हणजे फक्त बारा वर्षांत देशांच्या सीमा व राजकीय-आर्थिक विभागणी निरर्थक ठरणार आहे. कुठलीही सत्ता आणि बहुराष्ट्रीय कंपन्याही येऊ घातलेली ही भयानक परिस्थिती हाताळू शकणार नाही. जगभरात घटते अन्नउत्पादन व भूजल, नैसर्गिक स्वरूपात दिसणाºया परंतु मानवनिर्मित असणाºया वाढत्या दुर्घटना यामुळे करोडोंची स्थलांतरे व त्यातून याचे हिंसक घटनांमध्ये रूपांतर होईल. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील अनर्थ कमी करायचा असेल तर प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून सर्व जनतेने, विशेषत: विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांनी याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. लालसा, सुखी जीवनाची पृथ्वीच्या विरोधात जाणारी चुकीची कल्पना, तंत्रज्ञान व ते वापरणारी अर्थव्यवस्था यास कारण आहे.विदर्भ मराठवाड्याला तसेच किनारपट्ट्यांवरील जनतेला आपण येत्या दशकात उष्णता व बुडीत स्थिती यामुळे निर्वासित होणार याची माहिती नाही. उलट दोन्हीकडे हे संकट वाढवणारे औद्योगिक प्रकल्प नापिकीवर रोजगार देणारा उपाय म्हणून आणले जात आहेत. या परिस्थितीत मानवजातीची शेवटची पिढी ठरू शकणाºया उमलत्या पिढीची प्रतिनिधी स्वीडनची १५ वर्षे वयाची विद्यार्थिनी ग्रेटा थनबर्ग हिने स्वीडनच्या संसदेसमोर धरणे धरले आहे. युनोच्या सभेत केलेल्या भाषणात मानवजात वाचवण्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याबद्दल तिने जगभरातील सरकारांना दोष दिला.आपल्या देशात तर कमालीची चिंताजनक स्थिती आहे. मानवजातीचा अंत घडवणारे निर्णय रोज घेतले जात आहेत व असे निर्णय घेणाºयांना जनता विकासपुरुष म्हणून डोक्यावर घेत आहे. तुम्ही पुरोगामी, प्रतिगामी, डावे, उजवे, मध्यममार्गी कुणीही असा, तुमची घडण प्रचलित शिक्षणातून होते. ते औद्योगिकीकरणासाठी आणले आहे. तुमच्या नकळत तुम्ही त्यासाठी घडवले जाता. मग तुम्ही तुमची घडण करणाºया पृथ्वीच्या व निसर्गाच्या विरोधात जाऊन तिला उद्ध्वस्त करणाºया स्वयंचलित यंत्राची, विजेची, सिमेंट इ.ची बाजू केव्हा घेता हे तुम्हालाच कळत नाही. याला तुम्ही आधुनिकता म्हणू लागता.आर्थिक राजकीय दृष्टिकोन ही चूक आहे. तो पृथ्वी व जीवनकेंद्री असायला हवा. तरच सत्याचे आकलन होईल. औद्योगिकीकरण व शहरीकरण विसर्जित करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू व्हायला पाहिजे.आपणाला पृथ्वी जगवते, अस्तित्व देते, औद्योगिकीकरण व अर्थव्यवस्था नाही. प्रचलित विकास पृथ्वीची जीवनाची क्षमता रोज नष्ट करत आहे. भौतिक प्रगती व विकास या भ्रामक कल्पना आहेत. विकासाचे समर्थन हा मानवद्रोह व सृष्टीद्रोह आहे.

टॅग्स :Earthपृथ्वीNatureनिसर्ग