शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

दिशादर्शकच हेलकावत आहेत

By admin | Published: March 31, 2016 3:33 AM

शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. विचारांचे अधिष्ठान देऊन समाजाला वाट दाखविण्याचे काम करावे. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले

- विजय बाविस्कर

शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. विचारांचे अधिष्ठान देऊन समाजाला वाट दाखविण्याचे काम करावे. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले, तर...समाजाच्या उन्नयनाची जबाबदारी असणारे शिक्षण-साहित्यासारखे क्षेत्र म्हणजे एक प्रकारचे दिशादर्शकच. समाजाला मार्ग दाखविण्याचे काम या क्षेत्रातून होते. मात्र, या संस्थांचीच दिशा हेलकवायला लागली की एकंदर लोकशाहीचा पायाच थरथरायला लागलाय का, अशी भीती वाटल्याशिवाय राहात नाही.पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण व साहित्यासारखी क्षेत्रे वेगळ्या कारणांनी गाजत आहेत. निवडणुकीच्या पारदर्शक इतिहासावर गटबाजी, वैयक्तिक हेवे-दावे आणि गैरप्रकारांच्या आरोपांनी डाग पडत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक नुकतीच झाली. तत्कालीन कारभारी असणारेच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मतभेद हे लोकशाहीचे व्यवच्छेदक लक्षण. त्यामुळे त्यातही गैर नाही. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने उठलेला धुरळा पाहिल्यावर साहित्य क्षेत्रातील राजकारणावर गांभीर्याने विचार करण्याची गरज प्रतीत होते. राज्यातील साहित्यविषयक कार्य करण्यासाठी निर्माण झालेल्या या संस्थेमध्ये साहित्यिक किती हा मुद्दाच अलाहिदा. एखादा किराणा दुकानदारही रसिक वाचक असू शकतो, हे मान्य करूनही एकंदर मतदारयादी साहित्यरसिकांचे सर्वसमावेशक प्रतिनिधित्व करते, हे कोणाला पटणे अवघडच जाते. मसापच्या या निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली. जणू काही बिहारमधील एखादी निवडणूक लढवली जात आहे, अशा पध्दतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कडक शिस्त लावावी लागली. अगदी मतपत्रिकेसोबत ओळखपत्रे जोडण्याची सक्ती करावी लागली. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पुण्यात घडलेला हा एक पराक्रमच म्हणायला हवा. एवढी शिस्त लावूनही अनेक आरोप झाले. पुण्याच्या साहित्यिक ओळखीपेक्षा अशी ओळख होणे, भूषणावह नाही. मसापच्या निवडणुकीतील चर्चेची धूळ खाली बसत नाही तोवर शिक्षण प्रसारक मंडळीचा प्रकार पुढे आला आहे. स.प. महाविद्यालयापासून अनेक प्रथितयश शिक्षण संस्था चालविणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळींच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी माजी अध्यक्षांना अटक होते. बोगस मतपत्रिका त्यांच्या कार्यालयात सापडतात, हा प्रकार धक्कादायक आणि क्लेशकारक आहे. अध्यक्षांना अटक करून अनेकांवर गुन्हे दाखल करून पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यातून सत्य काय ते उघडकीस येईल. मतदानाची प्रक्रियाही हा लेख सुरू असताना सुरू आहे. मतदार आपापल्या सद्सद्विवेकबुध्दीला स्मरून मतदानही करतील. जय-पराजयही त्याप्रमाणे निश्चित होतील. पण म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो, हेच याबाबत म्हणावे लागेल. त्यापेक्षाही लाखो विद्यार्थी ज्या संस्थेतून घडले आणि घडत आहेत. अभिमानाने आपल्या महाविद्यालयाचे नाव सांगतात. त्याच संस्थेची अशा प्रकारची बदनामी त्यांच्यासाठी किती वेदनादायक असेल? मुळात या निमित्ताने सामान्य माणसाला प्रश्न पडतो की या संस्थांमध्ये असे काय आहे की एनकेन प्रकारेण निवडणुका जिंकायच्याच. यासाठी कोणतेही गैरप्रकार करण्यास ही माणसं धजावतात. शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. सामाजिक, राजकीय गदारोळात विचारांचे, विवेकाचे अधिष्ठान देऊन समाजाला परिवर्तनाची वाट दाखविण्याचे काम त्यांनी करावे, ही रास्त अपेक्षा. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले, तर करायचे काय? प्रकाशासाठी कोणाकडे पाहायचे. एका संस्थेपुरते, एका निवडणुकीपुरते हे प्रकार मर्यादित राहात नाहीत. स्वच्छ, पारदर्शक आणि काटेकोर निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीची पहिली अट असते. सामाजिक क्षेत्रात काम करणारे जबाबदार विचार करणारे आणि संयत असावे लागात. ते घडले नाही तर मूल्यांचाच ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. खरी भीती तीच आहे...