शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

भेदाभेद अमंगळ

By admin | Published: May 25, 2016 3:24 AM

अंत:करण विशाल असणाऱ्यांना वसुधा म्हणजे पृथ्वी एक कुटुंबासारखी आहे़ मी सुद्धा विशाल अंत:करणाचा आहे़ स्त्री-पुरुष, लहान-मोठा, जात-पात, गरीब-श्रीमंत, अडाणी-सुशिक्षित असले कुठलेच

- डॉ.गोविंद काळे‘उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम्।’ अंत:करण विशाल असणाऱ्यांना वसुधा म्हणजे पृथ्वी एक कुटुंबासारखी आहे़ मी सुद्धा विशाल अंत:करणाचा आहे़ स्त्री-पुरुष, लहान-मोठा, जात-पात, गरीब-श्रीमंत, अडाणी-सुशिक्षित असले कुठलेच भेद पाळले नाहीत़ सर्वांना समान वागणूक़ सर्वांचे स्वागत एकाच पद्धतीने़ सकलासी येथे आहे अधिकाऱ ‘दे धरू-सर्वांस पोटी’ अशी सर्वांना कवेत घेणारी माझी विशाल भावना़ भूत, भविष्य आणि वर्तमानातही मी बदललो नाही. मी खरेच बोलत आहे़ ज्या धर्मराजाची महती तुम्ही जगाला सांगता त्याने सुद्धा ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणून असत्याचा आधार घेतला. माझे मात्र एकच ब्रीद ‘सत्यमेव जयते’़ खोटे कशासाठी? काय साधणार त्यातून? मी म्हणजे थकलेल्या जीवाचे विश्रांतीस्थाऩ चिरकाल विश्रांतीसाठी लोक माझाच आश्रय घेतात. जीवनात सुखावलेले माझ्याकडे येण्यासाठी किंचित टाळाटाळ करतात; परंतु माझे स्थान त्यांनाही अपरिहार्य आहे़ कंटाळलेले मात्र माझ्याकडे येण्यासाठी आतुर असतात़ साऱ्या रंजल्या-गांजल्यांचा मी परमसखा आहे़ मैत्री मी जपली आहे आजपर्यंत़ ‘अहो जग पुढे गेले/आता सारे बदलले’ अशी कवनं माणूस करतो आणि बदलत्या जगाची दखल घेतो़ जो कधीच बदलत नाही, अशा माझ्यासारख्याची दखल घेणारा महामानव अजून तरी दृष्टिपथात नाही़ दु:ख काय माणसालाच होते? वेदना काय फक्त तुम्हालाच होतात? अंतिम यात्रेत सहभागी होणाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून माझे सुद्धा डोळे क्षणिक गहिवरतात़ उन्हाळ्यात उकाडा असतो म्हणून तुम्ही वैतागता़ पावसाळ्यात पावसाने कहर केला म्हणून ओरड तर थंडीत कुडकुडायला होते म्हणून तुमची तक्राऱ अरे! ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली त्याची सुद्धा तक्रार सांगता़ तुमचे रडगाणे संपणार कधी? कर्तव्याला जागणार कधी? मला कर्तव्य कर्मातून मुक्ती नाही़ भगवंताला रडकी लेकरं आवडत नाहीत़ त्याला मनापासून आवडतो तो स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञाची सारी लक्षणे केवळ माझ्या आणि माझ्याचकडे विद्यमान आहेत कायमस्वरूपी़ भगवंताला सुद्धा मीच प्रिय आहे़ स्वत:बद्दल इतके अभिमानपूर्वक बोलणे म्हणजे आत्मगौरव ठरतो; परंतु माझाही नाईलाज आहे़ माझ्याबद्दल गौरवोद्गार काढणारा अजूनपर्यंत जन्मास आला नाही म्हणून चार वाक्ये बोललो. क्षमस्व! अरे! नाव सांगायचे राहूनच गेले़ माझे नाव स्मशाऩ यो न दृश्यति न द्वेष्टिन शोचति न कांक्षति। शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य:स मे प्रिय:॥